व्हॉट्सअ‍ॅप बंद पडणार? व्हॉट्सअ‍ॅप नवीन पॉलिसी लागू करणार? जाणून घ्या सर्व

नव्या प्रायव्हसी पॉलिसीमुळे प्रचंड टीका झाल्यानंतरही व्हॉट्सअ‍ॅपकडून नवीन पॉलिसीबाबत युजर्सना पुन्हा एकदा नोटीफिकेशन पाठवले जात आहे. 


त्यानुसार 15 मे पर्यंत पॉलिसी स्वीकारण्यास सांगण्यात आले आहे. मात्र जर तुम्ही पॉलिसी स्वीकारली नाही तर काय होईल? याबाबत जाणून घेऊयात... 

अकाउंट डिलीट होणार नाही
पॉलिसी न स्वीकारल्यास तुमचे व्हॉट्सअ‍ॅप अकाउंट तातडीने डिलीट करणार नाही. मात्र जोपर्यंत पॉलिसी स्वीकारत नाहीत तोपर्यंत तुम्हाला व्हॉट्सअ‍ॅपचे सर्व फिचर्स वापरता येणार नाहीत.

'हे' करता येणार नाही
काही कालावधीसाठी युजर्सना कॉल्स आणि नोटिफिकेशन्स येतील, पण मेसेज वाचता किंवा पाठवता येणार नाहीत.

   

डिलीट अकाउंट पुन्हा वापरता येणार नाही
एकदा डिलीट झालेले अकाउंट पुन्हा ते वापरता येणार नाही. कारण व्हॉट्सअ‍ॅपकडून कायमस्वरुपी अकाउंट डिलीट केले जाते. 

सर्व ग्रुपमधून बाहेर
पॉलिसी न स्वीकारणाऱ्यांना सर्व ग्रुपमधूनही आपोआप हटवले जाणार आहे.

व्हॉट्सअ‍ॅप बॅकअप डिलीट होणार 
पॉलिसी न स्वीकारणाऱ्या युजर्सचा पूर्ण व्हॉट्सअ‍ॅप बॅकअप देखील डिलीट होईल. मात्र 15 मेपूर्वी जर तिम्ही बॅकअप एक्सपोर्ट केला तर तुमचा डेटा सुरक्षित राहू शकतो.

   

चॅटिंग हिस्ट्रीचे काय होणार? 
15 मे आधी युजर त्याची चॅटिंग हिस्ट्री अँड्रॉइड किंवा आयफोनवर एक्सपोर्ट करु शकतात.

कधी पर्यंत पॉलिसी स्वीकारता येणार?  
तुम्ही 15 मे नंतरही नवीन प्रायव्हसी पॉलिसी स्वीकारु शकतात. मात्र त्यावेळी निष्क्रिय वापरकर्त्यांशी संबंधित धोरण लागू होईल.

   

नवीन पॉलिसी बिजनेस युजर्ससाठी 
 व्हॉट्सअ‍ॅपकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे कि, पॉलिसीमध्ये बदल झाल्याने मित्र किंवा कुटुंबियांसोबत केलेल्या तुमच्या चॅटिंगच्या गोपनियतेवर कोणताही परिणाम होत नाही. तसेच नवीन पॉलिसी केवळ बिजनेस युजर्ससाठी आहे. 

दरम्यान वादग्रस्त प्रायव्हसी पॉलिसीला स्थगितीनंतरही येत्या 15 मे पासून व्हॉट्सअ‍ॅपने पुन्हा एकदा तिच पॉलिसी लागू करण्याची पूर्ण तयारी केली आहे. यावर युजर यावर कशी प्रतिक्रिया देतात? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने