Monsoon 2021 | आनंदाची बातमी : मान्सून अंदमानात दाखल

हवामान विभागाने सांगितल्याप्रमाणे मान्सूनचा पाऊस अंदमान निकोबार येथे  दाखल झाला आहे. | Monsoon 2021

Monsoon 2021

शुक्रवारी अंदमान आणि निकोबार बेटावर (Andaman and Nicobar Islands) मान्सूनच्या सरी बरसल्या. नैऋत्य मोसमी वारे म्हणजेच मान्सून पुढील तीन दिवसात 21 मे म्हणजेच शुक्रवारपर्यंत अंदमान बेटावर दाखल होईल असं हवामान विभागाने सांगितलं होतं. त्यानुसार मान्सूनने अंदमान आणि निकोबार बेटावर एण्ट्री केली आहे.

हवामान खात्याचे वरिष्ठ अधिकारी के. एस. होसाळीकर यांनीही ट्विट करुन मान्सून अंदमानात दाखल झाल्याची माहिती दिली होती. मोसमी पाऊस आज अंदमानात पोहोचला अश्या प्रकारचे ट्वीट त्यांनी केले होते.

नैऋत्य मोसमी वाऱ्यांना भारतात मान्सून म्हटलं जातं. भारतीय हवामान विभागानं हे वारे 1 जूनला केरळमधील दाखल होतील, असा अंदाज व्यक्त केला आहे. सध्या हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार 21 मे रोजी नैऋत्य मोसमी वारे हे अंदमान बेटांवर पोहोचतील, असा अंदाज वर्तवण्यात आला होता. हवामान विभागाचा हा  अंदाज तंतोतंत खरा ठरला आहे.

मान्सून चे 1 जून ला केरळ मध्ये आगमन

यंदा मान्सून 1 जून रोजी केरळात दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. सध्या मान्सूनच्या प्रगतीसाठी वातावरण खूपच पोषक आहे. त्यामुळे जूनच्या पहिल्याच आठवड्यात केरळात मान्सून दाखल होईल. तर 10 जूनपर्यंत मान्सून कोकण किनारपट्टीवर दाखल होईल. त्यानंतर 15 ते 20 जून दरम्यान उर्वरित महाराष्ट्र व्यापून टाकेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

यंदा मान्सून चे आगमन वेळेतच होईल

भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या दोन वर्षात अरबी समुद्रातील वादळामुळे महाराष्ट्रात मान्सून लांबणीवर पडला होता. मात्र यंदा अशी कोणतीही शक्यता नाही. त्यामुळे केरळात जर मान्सून वेळेवर दाखल झाला तर महाराष्ट्रातही वेळेवर दाखल होण्याचा अंदाज आहे.

तर शेतकरी मित्रांनो पोस्ट आवडली असल्यास नक्कीच आपल्या मित्रांबरोबर शेअर करा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.