पीएम किसान योजनेचा ८ वा हप्ता खात्यात कधी येणार? | PM KISAN YOJANA STATUS

कोरोना महामारीमुळे सर्वांचेच आर्थिक बजेट बिघडलेले आहेत. अशातच केंद्र सरकार पीएम किसान योजनेचा ८ वा हप्ता आपल्या बँक खात्यात जमा करून मोठा दिलासा देईल, अशी शेतकऱ्यांना आशा आहे. 

पंतप्रधान किसान सम्मान निधी योजनेचे लाभार्थी सध्या आठव्या हप्त्याची प्रतिक्षा करीत आहेत. केंद्र सरकार कोणत्याही दिवशी या योजनेचा आठवा आणि चालू आर्थिक वर्षातील पहिला हप्ता जारी करू शकते. त्यामुळे समस्त शेतकरी वर्गाचे केंद्र सरकारकडे लक्ष लागले आहे. या योजनेमुळे देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांना कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेदरम्यान आर्थिक मदत मिळणार आहे. महामारीमुळे सर्वांचेच आर्थिक बजेट बिघडले आहे. अशातच केंद्र सरकार पीएम किसान योजनेचा हप्ता आपल्या बँक खात्यात जमा करून मोठा दिलासा देईल, अशी शेतकऱ्यांना आशा आहे. 

Must Read :- शेतकऱ्यांसाठी खूशखबर | एका पैशाचीही गुंतवणूक न करता मिळणार 36 हजार | KISAN MANDHAN YOJANA


पोर्टल किंवा अॅपवर चेक करु शकता स्टेटस

केंद्र सरकार प्रत्येक आर्थिक वर्षात एप्रिल ते जुलैदरम्यान योजनेचा पहिला हप्ता, पुढे ऑगस्ट ते नोव्हेंबर महिन्यांच्या दरम्यान दुसरा हप्ता आणि डिसेंबर ते मार्चदरम्यान तिसरा हप्ता जारी करते. अशा प्रकारे केंद्र सरकार प्रत्येक वित्त वर्षात तीन समान हप्त्यांमध्ये (प्रत्येकी दोन हजार रुपयांच्या) एकूण सहा हजार रुपयांची रक्कम देशभरातील पीएम किसान योजनेसाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करते. जर तुम्हीही पीएम किसान योजनेचे लाभार्थी असाल तर या योजनेच्या हप्त्याचा स्टेटस घरबसल्या चेक करू शकता. पीएम किसान योजनेचे पोर्टल किंवा अ‍ॅपच्या माध्यमातून तुम्हाला अत्यंत सोप्या पद्धतीने हा स्टेटस चेक करता येईल.

चला तर मग जाणून घेऊया ‘स्टेप बाय स्टेप प्रोसेस’

– पीएम किसान योजनेच्या https://pmkisan.gov.in/ अधिकृत वेबसाईटवर लॉग इन करा

– येथे तुम्हाला ‘Farmers Corner’ मध्ये ‘Benefeciary Status’ वर क्लिक करावे लागेल.

– त्यानंतर तुम्हाला आधार नंबर, अकाऊंट नंबर आणि मोबाईल नंबर यापैकी कोणताही एक पर्याय निवडावा लागेल.

– आता तुम्ही जो पर्याय निवडला आहे, तो नंबर नोंदवा

– त्यानंतर ‘Get Data’ वर क्लिक करा

Must Read :- मृदा आरोग्य कार्ड योजना 2021 | मृदा आरोग्य कार्ड योजना काय आहे? (Soil Health Card Scheme)

 

जर तुम्ही दिलेली माहिती खरी म्हणजेच कागदोपत्री जुळणारी असेल तर तुमच्यासमोर एक पेज उघडले जाईल. या पेजवर तुम्हाला तुमचे नाव, मोबाईल नंबरचे शेवटचे चार अंक, आधार नंबरचे शेवटचे चार अंक पाहायला मिळतील. त्याचबरोबर जिल्हा, गाव, अकाऊंट नंबरचे शेवटचे अंक आणि आयएफएससी कोड, रजिस्ट्रेशन नंबरबरोबर इतर तपशील बघायला मिळेल. त्याचबरोबर प्रत्येक हप्त्याचा स्टेटस, बँकेचे नाव, ज्या बँक खात्यात पैसे जमा झाले आहेत, त्या खात्याचे शेवटचे चार अंक, पैसे जमा झाल्याची तारीख आणि यूटीआर नंबर पाहायला मिळेल.

पंतप्रधान किसान योजनेअंतर्गत स्टेटस तपासल्यानंतर तुम्हाला अलिकडेच जारी केलेल्या हप्त्याच्या स्टेटसमध्ये एफटीओ जनरेट झाला आहे आणि पेमेंट कन्फर्मेशन प्रलंबित आहे, असा मेसेज वाचायला मिळेल. याचाच अर्थ सरकारने सर्व तपशीलाची पडताळणी करून पेमेंट ऑर्डर जारी केली आहे आणि लवकरात लवकर आपल्या बँक खात्यात पीएम किसान योजनेची रक्कम जमा होणार आहे. 

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.