PM किसान सन्मान निधि 9 वा हप्ता: Pm Kisan 9th Installment Status

 PM Kisan Status Check 2021 9th Installment Date | PM Kisan 9 kist kab aayegi | Pradhanmantri Kisan Sanman Nidhi Yojana 2021 Marathi | PM Kisan Yojana Status Check 2021 Marathi | प्रधानमंत्री किसान सन्मान निधि योजना मराठी यादी | पीएम किसान सन्मान निधि 9 किस्त

pm kisan

{tocify} $title={Table of Contents}

शेतकरी मित्रांनो, हा प्रश्न बऱ्याच काळापासून तुमच्या मनात चालू असेल की प्रधानमंत्री किसान सन्मान निधि चा 9 वा हप्ता कधी येणार? केंद्र सरकार ने नुकताच प्रधानमंत्री किसान सन्मान निधि  योजनेचा 9 वा हप्ता (किस्त) शेतकर्‍यांच्या खात्यात जमा करण्याची तारीख जाहीर केली आहे. नवीन आलेल्या अपडेट नुसार PM Kisan Nidhi Yojana 2021 चा 9 वा हप्ता हा दिनांक 9 ऑगस्ट ला दुपारी 12.30 ला सरकार कडून शेतकर्‍यांच्या खात्यात जमा केल्या जाणार आहे. या पोस्ट मध्ये आम्ही तुम्हाला प्रधानमंत्री किसान सन्मान निधि योजना 9 वी किस्त बद्दल महत्वाची माहिती सांगणार आहोत, तरी विनंती आहे की आमची ही पोस्ट शेवट पर्यंत वाचावी.

PM Kisan Sanman Nidhi 9th Installment

प्रधानमंत्री किसान सन्मान निधि योजनेचा 8 वा हप्ता शेतकर्‍यांच्या खात्यात जमा होताच, शेतकर्‍यांना 9 व्या हप्त्याची चाहूल लागली होती. आणि बरेच शेतकरी 9 वी किस्त ची खूप दिवसापासून वाट बघत होते परंतु आता तुम्हाला वाट बघण्याची गरज नाही कारण नवीन आलेल्या अपडेट नुसार प्रधानमंत्री किसान सन्मान निधि योजनेचा 9 वा हप्ता हा दिनांक 9 ऑगस्ट 2021 रोजी दुपारी 12.30 ला प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदीजी शेतकर्‍यांच्या खात्यात जमा करणार आहेत. प्रधानमंत्री किसान सन्मान निधि योजनेसाठी जवळपास 12 कोटी शेतकर्‍यांनी अर्ज केले आहेत आणि त्या सर्वांच्याच खात्यात ही रक्कम केंद्र सरकार कडून दिनांक 9 ऑगस्ट रोजी जमा केली जाईल.

पीएम किसान सन्मान निधि योजना

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना 2018 मध्येच जाहीर करण्यात आली असली तरी ती अधिकृतपणे 2019 मध्ये सुरू करण्यात आली आणि आतापर्यंत देशातील लाखो शेतकऱ्यांना पंतप्रधान किसान योजनेचा लाभ देण्यात आला आहे, जगातील पीएम किसान. योजना ही एकमेव योजना आहे जी थेट बँक खात्याद्वारे शेतकऱ्यांना जास्तीत जास्त लाभ देते. या योजनेअंतर्गत, देशातील प्रत्येक शेतकऱ्याला पात्र मानले गेले आहे आणि त्यांना केंद्र सरकारकडून प्रतिवर्ष 6000 ची आर्थिक मदत तीन समान हप्त्यांमध्ये मिळते. 

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना या योजनेअंतर्गत प्राप्त झालेली रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर पाठवली जाते म्हणजेच ही एक पारदर्शक योजना आहे जी सर्व प्रकारच्या भ्रष्टाचारापासून दूर आहे. या अंतर्गत, 6000 ची रक्कम शेतकऱ्यांना ₹ 2000 च्या 3 समान हप्त्यांमध्ये दिली जाते, जेणेकरून शेतकरी त्याचा वापर त्यांच्या शेतीमध्ये करू शकतील, आतापर्यंत केंद्र सरकार म्हणजेच मोदी सरकारने पीएम किसान योजनेअंतर्गत शेतकर्‍यांना 8 हप्ते पाठवले आहेत आणि काही दिवसात म्हणजे दिनांक 9 ऑगस्ट ला 9 व्या हप्त्या सुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यात पाठवला जाईल. 

किसान सन्मान निधि सर्व हप्त्यांची आकडेवारी

हप्ता कालावधी एकूण लाभार्थी
9 वा ऑगस्ट-सप्टेंबर 2021 सध्या उपलब्ध नाहीत
8 वा एप्रिल-जून 2021 10,47,75,063
7 वा डिसेंबर 2020 96,816,001
6 वा ऑगस्ट 2020 102,135,359
5 वा एप्रिल 2020 104,893,914
4 था डिसेंबर 2019 89,497,023
3 रा ऑगस्ट 2019 87,579,244
2 रा एप्रिल 2019 66,317,083
1 ला डिसेंबर 2018 31,605,060

Pm Kisan 9th Installment Status check

प्रधानमंत्री किसान सन्मान निधि योजना 2021 चा 9 वा हप्ता तुमच्या बँक खात्यात जमा झाला का हे तपासण्यासाठी तुम्हाला खालील पद्धतीचे अनुसरण करावे लागेल.
  • सर्वात आधि तुम्हाला पीएम किसान च्या अधिकृत वेबसाइट वर जावे लागेल.
  • नंतर तुमच्या समोर मुखपृष्ठ उघडेल.
  • मुखपृष्ठावर तुम्हाला खाली स्क्रोल करून Beneficiaries Status या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
  • पुढील पृष्ठ उघडल्यावर तुमच्या समोर 9 व्या हप्त्याचे स्टेटस चेक करण्यासाठी 3 पर्याय असतील 1) आधार कार्ड नंबर टाकून 2) मोबाइल नंबर टाकून 3) बँक खाते नंबर टाकून.
  • तुम्हाला तीन पैकी कोणत्याही एका पर्यायावर क्लिक करावे लागेल.
  • आणि जो पर्याय निवडला त्याची माहिती खाली टाकावी लागेल. 
  • आणि सबमिट बटन वर क्लिक करावे लागेल.
  • नंतर नवीन पृष्ठ उघडेल, या वर तुम्हाला तुमच्या 9 वी किस्त बद्दल माहिती मिळेल.

FAQ Pm Kisan Installment 9th 2021

Q.1 प्रधानमंत्री किसान सन्मान निधि योजनेचा 9 वा हप्ता कधी जमा होईल?

प्रधानमंत्री किसान सन्मान निधि योजनेचा 9 वा हप्ता हा दिनांक 9 ऑगस्ट ला दुपारी 12.30 ला शेतकर्‍यांच्या बँक खात्यावर जमा केल्या जाईल.

Q.2 प्रधानमंत्री किसान सन्मान निधि योजनेचे पेमेंट स्टेटस कसे चेक करावे?

प्रधानमंत्री किसान सन्मान निधि योजना 2021 चे पेमेंट स्टेटस तपासण्यासाठी तुम्हाला अधिकृत वेबसाइट वर जावे लागेल.

शेतकरी मित्रांनो, माहिती आवडली असल्यास नक्कीच शेअर करा. आणि नवनवीन माहिती दररोज मिळवण्यासाठी आम्हाला टेलिग्राम वर जॉइन करा. {alertInfo}

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.