पोकरा योजना 2024 ऑनलाइन अर्ज सुरू | POCRA Yojana 2024 Maharashtra Online Application

mahapocra.gov.in login | DBT PoCRA LOGIN | mahapocra.gov.in village profile | Hted mahapocra gov in | पोखरा ॲप | पोखरा योजना यादी | POCRA Yojana 2024 Maharashtra

नानाजी देशमुख कृषि संजीवनी योजना अंतर्गत POCRA (पोकरा) ही योजना राज्य सरकार कडून राबविण्यात येते. पोकरा योजना शेतकर्‍यांच्या फायद्याची ठरत आहे कारण महाराष्ट्रातील बरेच शेतकरी या योजनेचा फायदा घेत आहेत. पोकरा योजना 2024 अंतर्गत शेतकर्‍यांना सरकार कडून अनुदान देण्यात येत असते. पोकरा योजना अंतर्गत किती टक्के अनुदान सरकार कडून देण्यात येते आणि पोकरा योजनेमध्ये कोण कोणते घटक समाविष्ट आहेत हे आम्ही तुम्हाला या पोस्ट मधून सांगणार आहोत तरी विनंती आहे की आमची ही पोस्ट शेवट पर्यंत नक्की वाचावी.

POCRA Yojana 2024 Maharashtra

POCRA Yojana Maharashtra 2024 गरजू शेतकर्‍यांसाठी खूप फायद्याची ठरत आहे. बरेच शेतकरी या योजनेचा लाभ घेऊन सरकार कडून अनुदान मिळवत आहेत. पोकरा योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्यातील 15 जिल्ह्यांचा समावेश होतो. आही हे जिल्हे म्हणजे – जळगाव, बुलढाणा, अकोला, वाशिम, वर्धा, यवतमाळ, हिंगोली, परभणी, नांदेड, बीड, लातूर, उस्मानाबाद, जालना, लातूर, अमरावती.

POCRA योजनेमध्ये साधारणत: राज्यातील 155-156 या तालुक्यांचा समावेश आहे. आणि तसेच राज्यातील 3755 ग्रामपंचायतीं पोकरा योजनेमध्ये येतात या योजनेचा लाभ साधारणपणे राज्यातील 17 लाख शेतकऱ्यांना होतो. नानाजी देशमुख यांनी कृषी विभागामध्ये अतिशय महत्त्वाची कामगिरी केलेली आहे आणि म्हणूनच भारतरत्न नानाजी देशमुख यांचे नाव या प्रकल्पाला दिलेले आहे.

पोकरा योजना महाराष्ट्र 2024

जर एखादा अल्पभूधारक शेतकरी असेल आणि त्याच्या कडे शेतीसाठी पाण्याची सुविधा नसेल तर त्याला पोकरा योजनेअंतर्गत (POCRA Yojana Maharashtra 2024) पाण्यासाठी विहिरीची अनुदान योजना दिली जाते. जर एखाद्या शेतकर्‍याला आपल्या शेतात शेततळे खोदायचे आणि त्याच्या कडे पुरेसे पैसे नाही त्याला नानाजी देखमुख कृषि संजीवनी योजनेअंतर्गत शेततळे अनुदान दिले जाते. तसेच शेतात लागणार्‍या पाइप लाइन साठी सुद्धा Pocra Yojana 2024 अंतर्गत राज्य सरकार कडून अनुदान दिल्या जाते.

तसेच तुषार ठिबक सिंचन वर सुद्धा पोकरा योजनेअंतर्गत अनुदान देण्यात येत असते. या प्रकल्पाच्या माध्यमातून सामाजिक लाभ सुद्धा मिळू शकतो जसे की, शेतकऱ्यांना उत्पादन काढल्यानंतर साठवणुकीची कुठलीच व्यवस्था नसल्यामुळे बाजार कमी असतानाही ते उत्पादन विकावं लागतं त्यासाठी या योजनेमार्फत गोडाऊनची सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात येते म्हणून Pocra Yojana शेतकर्‍यांच्या खूप फायद्याची आहे.

पोकरा अनुदान योजना 2024

पोखरा योजनेसाठी राज्य सरकार कडून एक समिती देखील नेमण्यात आलेली आहे आणि या समितीचे नाव ग्राम कृषी संजीवनी समिती असे आहे. या समितीमध्ये गावातील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, गावातील प्रगत शेतकरी, अनुसूचित जातीतील एखादा सदस्य, महिला बचत गटाचे प्रतिनिधी असे कार्यकारी सदस्यग्राम कृषि संजीवनी समितीमध्ये असतात. तसेच अकार्यकारी समितीमध्ये कृषी सहाय्यक, ग्रामसेवक इत्यादी अधिकारी समाविष्ट असतात.

Pocra Yojana Online Application 

नानाजी देखमुख कृषि संजीवनी योजना 2024 (POCRA) साठी ऑनलाइन अर्ज तुम्ही http://www.mahapocra.gov.in/ या संकेतस्थळावर जाऊन करू शकता त्यासाठी तुमच्या कडे खालील कागदपत्रे असणे अनिवार्य आहे.

महत्वाची कागदपत्रे

  • सातबारा आणि आठ अ
  • अर्जदार अनुसूचीत जाती मधील असल्यास जातीचा दाखला
  • अर्जदार अपंग असेल तर अपंग असण्याचे प्रमाणपत्र

पोकरा योजनेअंतर्गत खालील घटक समाविष्ट आहेत

  • हवामान अनुकूल कृषी परिस्थिति प्रोत्साहनपरअनुदान देणे आणि यामध्ये शंभर टक्के अनुदान दिले जाते.
  • हवामान अनुकूल कृषि पद्धतीमध्ये 100% अनुदान देण्यात येते.
  • जमिनीचे कर्ब ग्रहणाचे प्रमाण वाढविणे यासाठी शंभर टक्के अनुदान दिले जाते.
  • एकात्मिक शेती पद्धत या मध्ये 50% पर्यंत अनुदान देण्यात येते.
  • जमिनीचे आरोग्य सुधारणे या मध्ये 50% पर्यंत अनुदान देण्यात येते.
मित्रांनो, माहिती आवडली असल्यात नक्की शेअर करा आणि दररोज नवनवीन सरकारी योजनांची माहिती मिळवण्यासाठी आम्हाला टेलिग्राम आणि फेसबूक वर नक्की फॉलो करा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.