ट्रॅक्टर अनुदान योजना 2023: ऑनलाइन अर्ज, कागदपत्रे | MahaDBT Tractor Yojana Maharashtra 2023

ट्रॅक्टर अनुदान योजना महाराष्ट्र 2023 | ट्रेक्टर सब्सिडी ऑनलाइन फॉर्म महाराष्ट्र | महाराष्ट्र शासन कृषि योजना 2023 | tractor anudan yojana maharashtra 2023 | Tractor Subsidy Scheme 2023 | Tractor Scheme Mahadbt | Mahadbt Tractor Yojana 2023 | पंतप्रधान ट्रॅक्टर योजना  | ट्रॅक्टर अवजारे अनुदान | नानाजी देशमुख ट्रॅक्टर योजना

कृषि यांत्रिकीकरणास प्रोत्साहन देणे व शेती मधील उर्जेच्या वापराचे प्रमाण हे २ किलोवॅट प्रती हेक्टर पर्यंत वाढविणे या उद्देशाने महाराष्ट्र सरकार दरवर्षी नवनवीन योजना MahaDBT Portal च्या माध्यमातून राबवित असते. त्या पैकीच एक महत्वाची योजना म्हणजे ट्रॅक्टर अनुदान योजना 2023 (Tractor Yojana Maharashtra) होय, आज आम्ही तुम्हाला Tractor Anudan Yojana 2023 बद्दल संपूर्ण माहिती जसे की ऑनलाइन अर्ज कसा करायचा, कोण-कोणती कागदपत्रे या योजनेसाठी लागतात तसेच पात्रता काय असावी. तरी विनंती आहे की आमची ही पोस्ट शेवटपर्यंत वाचावी.

कृषी योजना महाराष्ट्र

Tractor Anudan Yojana 2023 Maharashtra

कृषी क्षेत्रात यांत्रिकीकरण वाढावे या उद्देशाने महाराष्ट्र सरकार कडून नवनवीन योजना ह्या दरवर्षी राबविल्या जात असतात. या योजनांच्या माध्यमातून शेतकर्‍यांना महाराष्ट्र सरकार कडून कृषी औजारांवर तसेच यंत्रांवर अनुदान उपलब्ध करून दिल्या जाते. शेतकर्‍यांना जर या योजनेचा लाभ मिळवायचा असेल तर त्यांना MahaDBT पोर्टल च्या माध्यमातून ऑनलाइन अर्ज करावा लागतो. ट्रॅक्टर अनुदान योजना 2021 च्या माध्यमातून शेतकर्‍यांना १) ट्रॅक्टर २) पॉवर टिलर ३) ट्रॅक्टर/ पॉवर टिलर चलित अवजारे ४) बैल चलित यंत्र/अवजारे ५) मनुष्य चलित यंत्र/अवजारे ६) प्रक्रिया संच ७) काढणी पश्च्यात तंत्रज्ञान ८) फलोत्पादन यंत्र/अवजारे ९) वैशिष्ट्यपूर्ण यंत्र अवजारे १०) स्वयं चलित यंत्रे इत्यादि गोष्टींवर सरकार कडून अनुदान मिळते.

हे नक्की वाचा:   अतिवृष्टी नुकसान भरपाई चा नवीन GR आला | Ativrushti Nuksan Bharpai Maharashtra New GR

जेथे शेतीमधील उर्जेचा वापर कमी आहे अशा क्षेत्रामध्ये व अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांपर्यंत कृषि यांत्रिकीकरणाचा लाभ पोहोचविणे तसेच प्रात्याक्षिके व मनुष्यबळ विकासाद्वारे सहभागीदारमध्ये जागरुकता निर्माण करणे. हा ट्रॅक्टर अनुदान योजना 2023 चा उद्देश आहे.

Tractor Subsidy Scheme 2023

योजना ट्रॅक्टर अनुदान योजना 2023
विभाग कृषि विभाग महाराष्ट्र
लाभार्थी महाराष्ट्रातील शेतकरी
अधिकृत वेबसाइट येथे क्लिक करा

अनुदान

Tractor Anudan Yojana Maharashtra 2023 योजनेतून खालील दिलेल्या कृषि यंत्र / अवजारे यांच्या खरेदीसाठी महाराष्ट्र सरकार कडून अर्थसहाय्य देण्यात येईल.

१) ट्रॅक्टर

२) पॉवर टिलर

३) ट्रॅक्टर/ पॉवर टिलर चलित अवजारे

४) बैल चलित यंत्र/अवजारे

५) मनुष्य चलित यंत्र/अवजारे

६) प्रक्रिया संच

७) काढणी पश्च्यात तंत्रज्ञान

८) फलोत्पादन यंत्र/अवजारे

९) वैशिष्ट्यपूर्ण यंत्र अवजारे

१०) स्वयं चलित यंत्रे

कुक्कुट पालन योजना -ऑनलाइन अर्ज

भाडे तत्वावरील सुविधा केंद्र

१) कृषि अवजारे बँकेची स्थापना

२) उच्च तंत्रज्ञान , उत्पादन सेवा सुविधा केंद्राची स्थापना

ट्रॅक्टर अनुदान योजना 2021-22 नुसार आणखी कोणकोणते लाभ मिळतात या बद्दल अधिक माहिती साठी खाली दिलेली pdf फाइल तुम्ही डाऊनलोड करू शकता.

Download

ट्रॅक्टर अनुदान योजना 2023 पात्रता

 • शेतकऱ्याचे आधार कार्ड असणे अनिवार्य आहे.
 • शेतकऱ्याकडे ७/१२ उतारा व ८ अ असावा.
 • शेतकरी अनु. जाती , अनु.जमाती मधील असल्यास जातीचा दाखला आवश्यक.
 • फक्त एकाच औजारासाठी अनुदान देय राहील म्हणजेच ट्रॅक्टर किंवा यंत्र/ अवजार.
 • कुटुंबातील व्यक्तीच्या नावे ट्रॅक्टर असल्यास , ट्रॅक्टरचलित औजारासाठी लाभ मिळण्यास पात्र असेल परंतु ट्रॅक्टर असल्याचा पुरावा सोबत जोडणे आवश्यक.
 • एखाद्या घटकासाठी / औजारासाठी लाभ घेतला असल्यास त्याच घटक/ औजारासाठी पुढील १० वर्षे अर्ज करता येणार नाही परंतु इतर औजारासाठी अर्ज करता येईल. उदा. एखाद्या शेतकऱ्याला सन २०१८-१९ मध्ये ट्रॅक्टरसाठी लाभ देण्यात आला असेल तर पुढील १० वर्षे ट्रॅक्टरसाठी लाभ मिळण्यास पात्र ठरणार नाही सन २०१९-२० मध्ये इतर औजारासाठी लाभापात्र राहील.
हे नक्की वाचा:   पीक नुकसान भरपाई अर्ज आणि यादी 2023: Pik Nuksan Bharpai Form 2023

आवश्यक कागदपत्रे

 • आधार कार्ड
 • ७/१२ उतारा
 • ८ अ दाखला
 • खरेदी करावयाच्या अवजाराचे कोटेशन व केंद्र शासनाच्या मान्यताप्राप्त तपासणी संस्थेने दिलेला तपासणी अहवाल
 • जातीचा दाखला ( अनु. जाती व अनु. जमाती साठी )
 • स्वयं घोषणापत्र
 • पूर्वसंमती पत्र

Tractor Anudan Yojana 2023 Online Application

तुम्हाला जर ट्रॅक्टर अनुदान योजना 2021 साठी अर्ज करायचा असेल तर तो ऑनलाइन पद्धतीने तुम्ही करू शकता महाराष्ट्र सरकारच्या MahaDBT पोर्टल च्या माध्यमातून ट्रॅक्टर अनुदान योजना 2023 साठी ऑनलाइन अर्ज करण्याची पद्धत आम्ही पुढे दिली आहे.

 • सर्वात आधी तुम्हाला महाराष्ट्र सरकार च्या महाडीबीटी पोर्टल वर जावे लागेल, नंतर तुमच्या समोर मुखपृष्ठ उघडेल.
 • मुखपृष्ठावर तुम्हाला नवीन अर्जदार नोंदणी किंवा New Registration या लिंक वर क्लिक करावे लागेल.
 • नोंदणी करतांना तुम्हाला तुमचे पूर्ण नाव, मोबाइल क्रमांक, ई-मेल, पासवर्ड इत्यादि टाकून Register या बटन वर क्लिक करावे लागेल.
 • नंतर तुमचे Registration प्रक्रिया पूर्ण होईल.
 • ऑनलाइन अर्ज करण्यासाठी तुम्हाला LogIn या बटन वर क्लिक करावे लागेल आणि तुमचा यूजरनेम आणि पासवर्ड टाकून लॉगिन करावे लागेल.
 • लॉगिन झाल्यानंतर तुम्हाला My Scheme या बटन वर क्लिक करावे लागेल.
 • My Scheme मध्ये तुम्हाला Tractor Anudan Yojana 2023 या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
 • नंतर Apply Now या बटन वर क्लिक करावे लागेल.
 • पुढील पृष्ठावर तुमच्या समोर एक अर्ज उघडेल या अर्जा मध्ये विचारलेली संपूर्ण माहिती तुम्हाला भरून Apply या बटन वर क्लिक करावे लागेल. या नंतर तुम्ही अॅप्लिकेशन प्रक्रिया पूर्ण होईल.

Important Downloads

शेतकरी मित्रांनो, माहिती आवडली असेल तर नक्कीच शेअर करा आणि अश्याच प्रकारे नवनवीन माहिती दररोज मिळवण्यासाठी आम्हाला टेलिग्राम वर जॉइन करा.Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.