फळबागेची करा लागवड | सरकार कडून मिळत आहेत सवलती

 नमस्कार शेतकरी मित्रांनो, सरकारतर्फे शेतकऱ्यांसाठी विविध प्रकारच्या योजना दरवर्षी राबविल्या जात असतात. यामागे सरकार चा उद्देश आहे की शेतकर्‍यांचे उत्पन्न वाढावे आणि शेतकऱ्यांचे जीवन सुकर व्हावे. यासाठी शासनातर्फे फळबाग लागवड, संरक्षित शेती, शेडनेटमध्ये भाजीपाला पिकांच्या लागवडीचे विविध प्रकारच्या योजना आहेत. त्यापैकी काही योजनांची माहिती या लेखात आपण पाहू…  | Falbag Lagwad Yojana

falbag lagwad yojana

एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान अंतर्गत राष्ट्रीय फलोत्पादन अभियान

संरक्षित शेती योजना

शेतकऱ्यांना उच्च दर्जाच्या व उच्च प्रतीच्या निर्यातक्षम पिकांच्या लागवडीसाठी आर्थिक सहाय्य करणे. तसेच ग्रामीण भागातील बेरोजगार युवकांना कृषी विषयक क्षेत्रात रोजगार उपलब्ध करून देणे. त्याबरोबरच फलोत्पादन क्षेत्रातबिगर हंगामी पिके घेण्यासाठी व उच्च तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने सरकार कडून ही योजना राबविली जाते.

हे पण वाचा – भाऊसाहेब फुंडकर फलबाग लागवड योजना

संरक्षित शेती योजनेसाठी पात्रता

  • जर शेतकऱ्यांना या योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर त्यांच्या स्वतःच्या मालकीची जमीन असणे म्हणजे जमीन स्वताच्या नावावर असणे आवश्यक आहे.
  • स्वतःच्या मालकीची जमीन नसेल तर आपापसातील भाडेपट्टा करार या योजनेत ग्राह्य धरता येत नाही.

  • शेतकऱ्याने शासकीय किंवा निमशासकीय घेतलेल्या जमिनीवर हरितगृह व शेडनेट गृह उभारायचे झाल्यास दीर्घ मुदतीचा म्हणजे कमीत कमी पंधरा वर्षाचा भाडेकरार या योजनेत ग्राह्य धरण्यात येतो. महत्वाचे म्हणजे तो भाडे करार दुय्यम निबंधकांकडे नोंदणीकृत असणे गरजेचे असते.
  • हरित गृह आणि शेडनेट गृहामध्ये फलोत्पादन पिकांची लागवड करणे बंधनकारक आहे.
  • या शासकीय योजनेअंतर्गत नोंदणीकृत गटातील एकाच गावातील पाच किंवा पाचपेक्षा अधिक शेतकरी हरितगृह शेडनेट गृहामधील लागवड साहित्य तसेच पूर्वशीतकरण गृह, शितल खोली किंवा शीतगृह व शी त वाहन या घटकांसाठी हॉर्टनेट प्रणालीवर अर्ज केल्यास जिल्ह्यात दिलेल्या लक्ष अंकाच्या मर्यादित सदर शेतकऱ्यांना लाभार्थी निवड मध्ये प्राधान्य देण्यात येते.
  • या योजने अंतर्गत वैयक्तिक शेतकरी, शेतकऱ्यांच्या सहकारी संस्था, शेतकऱ्यांच्या उत्पादक कंपन्या, शेतकरी समूह व बचत गटांना लाभ देण्यात येतो.

संरक्षित शेती योजना ऑनलाइन अर्ज

या योजनेसाठी इच्छुक असणार्‍या शेतकर्‍यांनी होर्टनेट (महाडीबीटी) या पोर्टल वर नोंदणी करावी लागेल. या बद्दल नवीन पोस्ट आम्ही लवकरच घेऊन येऊ त्या साठी आमच्या टेलिग्राम चॅनल ला लवकर जॉइन करा.

संरक्षित शेती योजना आवश्यक कागदपत्रे

  • सातबारा उतारा
  • 8 अ उतारा
  • आधार कार्डची छायांकित प्रत 
  • आधार संलग्न बॅंक खात्याच्यापासबुक च्या प्रथम पानाची छायांकित प्रत. 
  • अनुसूचित जाती व जमाती असलेल्या शेतकऱ्यांसाठी संवर्ग प्रमाणपत्र, 
  • पासपोर्ट आकाराचा फोटो 
  • विहित नमुन्यातील हमीपत्र इत्यादी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत फळबाग लागवड कार्यक्रम( शंभर टक्के केंद्र पुरस्कृत)

संरक्षित शेती योजना महत्व आणि उद्देश

फलबाग लागवडीच्या माध्यमातून शाश्वत रोजगार निर्मिती करणे तसेच या योजनेच्या माध्यमातून पूरक व्यवसायात वाढ करणे तसेच उत्पादन वाढविणे. सध्या महाराष्ट्रातील 34 जिल्ह्यांमध्ये ही योजना कार्यरत आहे.

लाभर्थ्यांसाठी पात्रता

  • लाभार्थी शेतकर्‍यांच्या नावे जमीन असणे अतिशय महत्वाचे आहे.
  • जमीन जर कुळ कायद्याखाली येत असेल व सातबाराच्या उताऱ्यावर जर कुळाचे नाव असेल तर संबंधित योजना कुळाच्या संमतीने राबवण्यात येते.
  • लाभार्थी हा जॉब कार्ड धारक असावा
  • या योजनेसाठी प्रवर्गातील कोणतीही व्यक्ती वैयक्तिक लाभार्थी म्हणून लाभ घेण्यास पात्र राहील जसं की अनुसूचित जमाती, जाति,भूसुधार योजनेचे लाभार्थी, इंदिरा आवास योजनेचे लाभार्थी, कृषी कर्ज माफी योजना 2008 नुसार अल्पभूधारक व सिमांत शेतकरी, अनुसूचित जमातीचे व अन्य परंपरागत वननिवासी अधिनियम 2006 नुसार पात्र व्यक्ती, महिलाप्रधान कुटुंबे.
  • या योजनेचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे योजनेतील लाभार्थ्यांना लागवड केलेली फळझाडे दुसऱ्या व तिसऱ्या वर्षी बागायती पिके 90 टक्के आणि कोरडवाहू पिके 75% जिवंत ठेवतील अशाच लाभार्थ्यांना दुसऱ्या व तिसऱ्या वर्षाचे अनुदान देय राहील.
  • लाभार्थ्यांना दोन हेक्‍टर क्षेत्राच्या मर्यादेत फळझाड लागवड करता येते.
शेतकरी मित्रांनो माहिती आवडली असल्यास नक्कीच तुमच्या इतर शेतकरी मित्रांसोबत शेअर करा 

हेही वाचा – महाभूलेख । अश्या प्रकारे पाहता येईल ऑनलाइन डिजिटल ७/१२

 हेही वाचा – शेतातून जाणारे रस्ते रोकल्यास होऊ शकते कारवाई

 हेही वाचा – महाभूलेख । अश्या प्रकारे पाहता येईल ऑनलाइन डिजिटल ७/१२


Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.