मागेल त्याला विहीर अनुदान योजना 4 लाख रुपये मिळणार | Magel Tyala Vihir Yojana Maharashtra 2024

महाराष्ट्र सरकार ने नुकताच मागेल त्याला विहीर योजना 2024 (Magel Tyala Vihir Yojana Maharashtra 2024) जाहीर केली आहे त्यानुसार पात्र शेतकर्‍यांना 4 लाख रुपये अनुदान मिळणार आहे. या पोस्ट मधून आम्ही तुम्हाला मागेल त्याला विहीर अनुदान योजना बद्दल संपूर्ण माहिती सांगणार आहोत जसे की Maharashtra Vihir Anudan Yojana काय आहे?, विहीर अनुदान योजनेसाठी पात्रता काय आहे, कागदपत्रे कोणती लागतात, ऑनलाइन अर्ज कसा करायचा, इत्यादि. तुम्हाला जर Vihir Anudan Yojana 2024 चा लाभ घ्यायचा असेल तर विनंती आहे की आमची ही पोस्ट शेवट पर्यंत नक्की वाचावी.

Vihir Anudan Yojana Maharashtra 2024

मनरेगा अंतर्गत राज्य सरकार लवकरच राज्यात विहीर अनुदान योजना राबविणार आहे. नुकताच झालेल्या भूजलच्या सर्वेक्षणाप्रमाणे राज्यात अजून सुद्धा 3,90,000 विहिरी खोदणे शक्य आहे. Vihir Anudan Yojana Maharashtra 2024 साठी अर्ज करण्यास सुरवात झाली असून राज्यातील सर्व शेतकरी विहीर अनुदान योजनेसाठी अर्ज करून या योजनेचा फायदा घेऊ शकतात. आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की Vihir Anudan Yojana 2024 अंतर्गत पात्र शेतकर्‍यांना विहीर खोदण्यासाठी 4 लाख रुपये आर्थिक मदत सरकार कडून केल्या जाणार आहे.

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत (मनरेगा) सिंचन विहिरींची कामे करतांना अधिनस्त कार्यालयास येत असलेल्या अडचणी दूर करण्याच्या अनुषंगाने सिंचन विहिरींसंदर्भात पुढील सुधारित मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत.

लाभ धारकाची निवड प्रक्रिया

मनरेगा अधिनियमाच्या परिशिष्ट 1 कलम 1(4) मधील तरतुदीनुसार खालील प्रवर्गासाठी प्राधान्यक्रमाने सिंचन सुविधा म्हणून विहिरीची कामे राज्य सरकार कडून अनुज्ञेय आहेत.

  • अनुसूचीत आणि भटक्या जमाती
  • दारिद्र्य रेषेखालील लाभार्थी
  • विमुक्त जाती आणि जमाती
  • स्त्री प्रमुख असलेली कुटुंबे
  • विकलांग शेतकरी कुटुंब
  • इंदिरा गांधी आवास योजनेखालील लाभार्थी
  • सर्व सीमान्त शेतकरी (2.5 एकर पेक्षा कमी क्षेत्रफळ असलेले कुटुंब)
  • अल्प भूधारक शेतकरी ( 5 एकर पेक्षा कमी क्षेत्रफळ असलेले )

विहीर अनुदान योजनेसाठी पात्रता

  • Vihir Anudan Yojana 2024 चा लाभ घेणार्‍या शेतकर्‍याकडे किमान 0.40 हेक्टर क्षेत्र सलग असावे.
  • आधीच अस्तीत्वात असलेल्या पेयजल स्त्रोतच्या 500 मीटर च्या परिसरात विहीर घेण्यास प्रतिबंध घालण्यात आलेले आहेत.
  • लाभ घेणार्‍या शेतकर्‍या कडे एकूण क्षेत्रफळाचा सातबारा असावा.
  • लाभ घेणारा शेतकरी जॉब कार्ड धारक असावा.
  • विहीर अनुदान योजनेचा लाभ घेणारा शेतकरी महाराष्ट्र राज्याचा कायमचा रहिवासी असावा.

विहीर अनुदान योजना आवश्यक कागदपत्रे

  • संपूर्ण क्षेत्रफळाचा सातबारा
  • पासपोर्ट आकाराचा फोटो
  • जॉब कार्ड
  • मोबाइल क्रमांक

Vihir Anudan Yojana Online Application

शेतकरी मित्रांनो, सरकारने अजून Magel Tyala Vihir Yojana Maharashtra 2024 साठी अर्ज प्रक्रिया ही ऑनलाइन केलेली नाही त्यामुळे जर विहीर अनुदान योजना 2024 चा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला संबंधित कार्यालयाशी संपर्क साधावा लागेल.

दररोज नवनवीन सरकारी योजनांची सविस्तर माहिती मिळवण्यासाठी आम्हाला टेलिग्राम वर फॉलो करा. Instagram Photo आणि Video डाऊनलोड करण्यासाठी आमच्या Downloadgram आणि Saveinsta या वेबसाइट ला नक्की भेट द्या.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.