बेटी बचाओ बेटी पढाओ योजना 2023: ऑनलाइन अर्ज आणि संपूर्ण माहिती | Beti Bachao Beti Padhao Yojana Maharashtra

बेटी बचाओ बेटी पढाओ योजना 2023 | Beti Bachao Beti Padhao Yojana In Marathi | बेटी बचाओ बेटी पढाओ ऑनलाइन अर्ज 2023 | Beti bachao beti padhao online apply | मुलींसाठी सरकारी योजना | एका मुलीसाठी सरकारी योजना | दोन मुलींसाठी सरकारी योजना महाराष्ट्र

मुलींच्या जीवनाची गुणवत्ता सुधारण्यासाठी आणि त्यांचे भविष्य उज्ज्वल करण्यासाठी या बेटी बचाओ बेटी पढाओ योजना १२ जानेवारी २०१५ रोजी माननीय पंतप्रधानांनी देशातील सर्व मुलींसाठी सुरू केली आहे. या लेखामधून आम्ही तुम्हाला बेटी बचाओ बेटी पढाओ योजने बद्दल संपूर्ण माहिती सांगणार आहोत. जसे की- या योजनेची पात्रता, लाभ, कागदपत्रे, आणि अर्ज करण्याची प्रक्रिया तरी विनंती आहे की आमचा हा लेख शेवटपर्यंत वाचावा.

बेटी बचाओ बेटी पढाओ योजना 2023

Beti Bachao Beti Padhao योजनेअंतर्गत मुलीचे बँक खाते कोणत्याही सरकारी बँकेत उघडता येते. तुम्ही जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन देखील मुलीचे बँक खाते उघडू शकता. बेटी बचाओ बेटी पढाओ योजनेंतर्गत तुम्हाला मुलीच्या जन्मापासून मुलगी १४ वर्षाची होई पर्यंत पैसे जमा करावे लागतील आणि बेटी बचाओ बेटी पढाओ योजनेंतर्गत, मुलीच्या शिक्षणासाठी 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर आपण 50% रक्कम काढू शकता आणि मुलीच्या लग्नाच्या वेळी उर्वरित सर्व रक्कम बँकेतून काढू शकता.

Beti Bachao Beti Padhao Yojana 2023

योजना बेटी बचओ बेटी पढाओ
कोणी सुरू केली श्री नरेंद्र मोदी
केव्हा सुरू केली 22 जानेवारी 2015
उद्देश मुलींचे जीवनस्तर उंचावणे
विभाग सरकारी योजना
अधिकृत वेबसाइट येथे क्लिक करा

बेटी बचाओ बेटी पढाओ योजना मराठी

  •  राज्यातील  बालक लिंग गुणोत्तर वृध्दीगंत करण्याच्या प्रमुख उद्देशाने राज्याच्या महिला आणि बालकं विकास विभागाने केंद्र शासनाची बेटी बचाओ बेटी पढाओ योजना बीड, जळगाव, अहमदनगर, बुलढाणा, औरंगाबाद, वाशिम, कोल्हापूर, उस्मानाबाद, सांगली आणि जालना या दहा जिल्ह्यांमध्ये कार्यान्वित केली आहे.
  • दि.१५ जून २०१६ पासून हिंगोली,सोलापूर, पुणे , परभणी , नाशिक, लातूर या अतिरिक्त जिल्हयांचा समावेश सदर योजनेत करण्यात आला आहे.
  • शासन निर्णय दि. ६ ऑगस्ट ,२०१८ नुसार उर्वरित १९ जिल्हयात  सदर योजना  करण्यात आली आहे.
  • देशात महाराष्ट्र हे असे राज्य आहे कि , त्यामधील जळगाव आणि उस्मानाबाद जिल्हयांना प्रभावी समुदाय प्रतिबद्धता ,प्रसूती पूर्व  लिंग निदान परिरक्षण ,पूर्वसंकल्पनेची अंमलबजावणी ,तसेच मुलींना बाळ शिक्षणात सक्षम बनविणे  या क्षेत्रात उल्लेखनीय कार्यबद्दल  विशेष पुरस्काराने माननीय मंत्री महिला व  बाळ विकास मंत्रालय  (भारत सरकार)  यांच्या  हस्ते दि. २४ जानेवारी ,२०१७ रोजी ,राष्ट्रीय बालिका दिवशी सन्मानित करण्यात आले आहे

बेटी बचाओ बेटी पढाओ योजनेचा उद्देश

आपणा सर्वांना ठाऊक आहे की स्त्री भ्रूणहत्या प्रमाण खूप वाढत आहे कारण या समाजात मुलींना ओझे समजले जाते. त्यांना पुढे जाणे आणि आपल्या योग्यतेनुसार शिक्षण घेणे समाजाला मान्य नाही, आणि त्यामुळे मुलांच्या तुलनेत मुलींची संख्या कमी होत आहे. या सर्व अडचणी सोडविण्यासाठी बेटी बचाओ बेटी पढाओ योजना सुरू केली आहे जेणेकरुन मुलींचे भविष्य उज्ज्वल होईल आणि त्यांना शैक्षणिक क्षेत्रात पुढे नेले जाईल, हे या योजनेचे मुख्य उद्दीष्ट आहे.

  • या योजनेनुसार स्त्रिभृण हत्या थांबवण्यास मदत होईल.
  • मुलींना शैक्षणिक क्षेत्रात प्रगति करण्यास मदत होईल.
  • मुली देखील स्वतंत्रपणे जगू शकतात आणि मुले करू शकतील अशा सर्व गोष्टी करू शकतात.

बेटी बचाओ बेटी पढाओ योजनेचा लाभ

खाली आम्ही सांगितले आहे की किती पैसे जमा केले म्हणजे किती रक्कम मिळेल.

1000 रुपये प्रती महिना जमा केल्यावर

तुम्ही जर बेटी बचाओ बेटी पढाओ योजने अंतर्गत मुलीच्या बँक खात्यात प्रती महिना 1000 रुपये आणि वर्षाला 12000 रुपये जमा केले तर मुलगी 14 वर्षाची पूर्ण झाल्यानंतर एकूण 1,68,000 रक्कम जमा होईल आणि मुलीचे वय 21 वर्ष पूर्ण झाल्यानंतर तुम्ही मुलीच्या बँक अकाऊंट मधून 6,07,128 रुपये काढू शकता. परंतु तुम्हाला या रकमेचा उपयोग मुलीच्या फायद्यासाठीच करावा लागेल.

1.5 लाख रुपये प्रती वर्ष जमा केल्यावर

तुम्ही जर Beti Bachao Beti Padhao Yojana 2023 अंतर्गत प्रती वर्षाला 1.5 लाख रुपये मुलीच्या बँक खात्यात जमा करत असाल तर मुलगी 14 वर्षाची पूर्ण झाल्यानंतर एकूण 21,00,000 लाख रुपये रक्कम बँक खात्यात जमा होईल आणि मुलीचे वय 21 वर्ष पूर्ण झाल्यानंतर तुम्ही मुलीच्या बँक खात्यातून 72,00,000 रुपये काढू शकता.

  • बेटी बचाओ बेटी पढाओ योजनेचा लाभ घेण्यासाठी मुलगी 10 वर्षाची होई पर्यंत तुम्ही मुलीचे बँक खाते उघडू शकता.
  • शिक्षण आणि मुलींची सुरक्षा सुधारण्यासाठी या योजनेचा शुभारंभ केल्या गेला.
  • भ्रूण हत्या थांबवण्यासाठी Beti Bachao Beti Padhao Yojana Maharashtra सुरू केल्या गेली.
  • मुलींच्या शिक्षण आणि लग्नासाठी मिळालेल्या रकमेचा उपयोग होईल. त्यामुळे पालकांना मुलींची जास्त काळजी राहणार नाही.
  • मुले आणि मुलींमधील भेदभाव कमी होईल.

बेटी बचाओ बेटी पढाओ योजना आवश्यक कागदपत्रे

  • अर्जदार हा भारताचा नागरिक असावा.
  • फक्त मुलींना या योजनेचा लाभ घेता येईल.
  • आधारकार्ड.
  • मुलीचे जन्मप्रमाणपत्र.
  • रहिवासी दाखला.
  • मोबाइल क्रमांक.
  • पासपोर्ट आकाराचा फोटो.
  • आई वडलांचे ओळखपत्र.
  • मुलीचे बँक खाते.

वरील कागदपत्रे बेटी बचाओ बेटी पढाओ योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक आहेत.

Beti Bachao Beti Padhao Yojana Online Registration

तुम्हाला जर बेटी बचाओ बेटी पढाओ योजना 2023 चा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला ऑनलाइन अर्ज करावा लागेल त्यासाठी खाली दिलेली प्रोसेस फॉलो करा.

  • सर्वात आधी तुम्हाला अधिकृत वेबसाइट वर जावे लागेल त्यासाठी येथे क्लिक करा.
  • वेबसाइट वर गेल्यानंतर तुमच्या समोर मुखपृष्ठ उघडेल.
  • मुखपृष्ठावर तुम्हाला “Women Empowerment Scheme” या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
  • नंतर तुमच्या समोर नवीन पृष्ठ उघडेल.
  • तुम्हाला beti bachao beti padhao yojana या ऑप्शन वर क्लिक करावे लागेल.
  • नंतर तुमच्या समोर beti bachao beti padhao yojana बद्दल काही सूचना दिल्या जातील.
  • सर्व सूचनांचे पालन करा आणि संगीलत्या प्रमाणे अर्ज प्रक्रिया पूर्ण करा.

Beti Bachao Beti Padhao Yojana Offline Registration

बेटी बचाओ बेटी पढाओ योजनेसाठी तुम्ही ऑफलाइन पद्धतीने सुद्धा अर्ज करू शकता त्यासाठी खाली दिलेल्या स्टेप्स फॉलो करा.
  • सर्वात आधी तुम्हाला जवळच्या पोस्ट ऑफिस किंवा बँकेत जावे लागेल.
  • तुम्हाला आवश्यक असलेले संपूर्ण कागदपत्रे दाखवावे लागतील.
  • बेटी बचाओ बेटी पढाओ योजनेचा अर्ज भरावा लागेल आणि त्या अर्जाला सर्व कागदपत्रे जोडावे लागतील.
  • आणि तो अर्ज बँक किंवा पोस्ट ऑफिस मध्ये जमा करावा लागेल.
  • अश्या प्रकारे तुमची ऑफलाइन अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.

Beti Bachao Beti Padhao Form PDF

मित्रांनो, तुम्हाला जर बेटी बचाओ बेटी पढाओ योजना 2023 साठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा असेल तर तुम्हाला Beti Bachao Beti Padhao Form PDF Download करावा लागेल. अर्ज डाऊनलोड करण्यासाठी तुम्ही खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून अर्ज डाऊनलोड करू शकता.

Click Here

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.