महाराष्ट्रात पुढील दोन दिवस राज्यात काही ठिकाणी मेघगर्जनेसह हलक्या पावसाचा इशारा पुणे वेधशाळेने दिला आहे.
महाराष्ट्रात पुढील दोन दिवस राज्यात काही ठिकाणी मेघगर्जनेसह हलक्या पावसाचा इशारा पुणे वेधशाळेने दिला आहे. पुण्यासह ,मध्य महाराष्ट्र, कोकण,मराठवाडा आणि विदर्भात हलक्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. यासोबतच राज्याला तापमानवाढीचा चटका सोसावा लागत आहे. अकोला इथं सर्वाधिक तापमानाची नोंद झाली आहे.
पुणे वेधशाळेच्या अंदाजानुसार पुणे, मध्य महाराष्ट्र, कोकण, मराठवाडा आणि विदर्भात पुढील दोन दिवसात हलक्या स्वरुपाचा पाऊस होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या भागात हवामान ढगाळ राहण्याची शक्यता आहे. दुसरीकडे तापमानदेखील वाढत आहे. पुणे वेधशाळेने पावसाचा अंदाज वर्तवताना झारखंड आणि पश्चिम बंगाल या राज्यावर हवेची चक्रीय स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील या भागांमध्ये ढग साचण्याची शक्यता असल्याचं सांगितलं आहे.
विदर्भातील जिल्ह्यांमध्ये 11 एप्रिलपर्यंत पावसाची शक्यता
नागपूर वेधशाळेने 11 एप्रिलपर्यंतचा हवामानाचा अंदाज जारी केला आहे. त्यानुसार विदर्भातील जिल्ह्यांमध्ये 9 ते 11 एप्रिल दरम्यान हलक्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. विदर्भात वाढलेल्या तापमानापासून मिळणार थोडा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. नागपूर वेधशाळेने हिट वेव्हचा अलर्ट हटवला आहे. 9 ते 11 एप्रिलच्या कालावधीत हवामानात मोठा बदल होण्याचा अंदाज आहे. 9 ते 11 एप्रिल च्या दरम्यान तापमानात घट होऊन विदर्भात ढगांच्या गडगडाट सह हलक्या पावसाचा अंदाज वर्तवला गेला आहे. 9 तारखेला पूर्व विदर्भात तर 10 आणि 11 ला संपूर्ण विदर्भात पावसाची शक्यता आहे.
नागपूर वेधशाळेचे ट्विट