पंजाब डख हवामान अंदाज: 13 ऑगस्ट पासून समाधानकारक पाऊस

राज्यातील  दि 3 ऑगस्ट व 4,5,6,7, ऑगस्ट या तारखेत विदर्भ, पूर्वविदर्भ , उत्तर महाराष्ट्रातील काही तालुक्यात  तुरळक भागात रिमझिम पावसाचा अंदाज . हा पाउस सर्वदूर नाही.

Punjab Dakh

राज्यातील उर्वरीत भागात तुरळक भागात हलक्या सरी येतील व रिमझिम पाउस पडेल. तसेच काही भाग निरंक राहील.

राज्यात तिन तारखे पासून 7 ऑगस्ट या दरम्याण विदर्भ. पूर्वविदर्भ व उत्तर महाराष्ट्रीतील काही तालुक्यात हा पाउस पडणार आहे. हा पाउस पिकांसाठी. निर्णायक असेल. नागपूर वर्धा अकोला शेगाव नांदूरा जळगाव यावल  धुळे साक्री . चाळीसगाव कन्नड जाफ्राबाद औरंगाबाद . जालना  या भागात पडेल  सध्या तरी राज्यात मोठा पाउस नाही .8 ऑगस्ट पासून 12 ऑगस्ट पर्यंत हवामान कोरडे राहील. 13 ऑगस्ट पासून राज्यात समाधानकारक पाउस पडण्यास सुरवात होइल व कोकनपट्टी व सागंली जिल्हात पावसाचे प्रमाण चालू राहील.

देशातील अंदाज

ओडीसा, झारखंड प.बंगाल, बिहार, छत्तीसगड, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, राजस्थान, हरयाणा या राज्यात पाउस मुसळधार अतिमुसळधार पडणार आहे.

नोट – वर दिलेले अंदाज विभागनूसार आहेत गावानुसार नाहीत माहीत असावे.

नोट – शेवटी हे अंदाज आहे. वाऱ्यात बदल झाला कि वेळ ठिकाण बदलते.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.