डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना 2026: PDF अर्ज, मराठी माहिती | Swadhar Yojana Maharashtra

WhatsApp ग्रुप Join Now
टेलिग्राम ग्रुप Join Now
Facebook पेज Follow

स्वाधार योजना माहिती मराठी | Swadhar Yojana 2026 Last Date | समाज कल्याण योजना महाराष्ट्र 2021 | Swadhar Yojana Application Form Pdf | स्वाधार योजना फॉर्म pdf | स्वाधार योजना 2026 मंजूर यादी | समाज कल्याण योजना 2026

महाराष्ट्र सरकारने अनुसूचित जाती (एससी) आणि नव बौद्ध प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी स्वाधार योजना 2021 (Swadhar Yojana Maharashtra 2026) सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना दहावी, बारावी, पदवी, पदविका आणि व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी सरकारकडून दरवर्षी 51,000 रुपयांची आर्थिक मदत मिळेल. ही मदत त्यांच्या राहण्या-खाण्याच्या आणि इतर खर्चासाठी दिली जाईल. एससी आणि एसटी समाजातील गरीब आणि वंचित उमेदवारांच्या कल्याणासाठी महाराष्ट्र समाज कल्याण विभाग महाराष्ट्र स्वाधार योजना राबवत आहे. या पोस्ट मध्ये आम्ही तुम्हाला स्वाधार योजना 2021 संपूर्ण माहिती जसे की- स्वाधार योजनेचा उद्देश, महाराष्ट्र स्वाधार योजनेअंतर्गत मिळणारे अनुदान, डॉ बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेअंतर्गत मिळणारा लाभ आणि फायदे, तसेच अर्ज प्रक्रिया या बद्दल संपूर्ण माहिती सांगणार आहोत. तुम्हाला जर स्वाधार योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर विनंती आहे की आमची ही पोस्ट शेवटपर्यंत वाचावी.

हे वाचा – रोजगार योजना

महाराष्ट्र स्वाधार योजनेचा उद्देश

आपल्या सर्वांना माहित आहे की आर्थिक अडचणींमुळे समाजातील गरीब वर्गातील विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणात अडथळ्यांना सामोरे जावे लागते. अशा आर्थिकदृष्ट्या मागास विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी खूप अडचणी येतात. त्यामुळे राज्य सरकारने महाराष्ट्र स्वाधार योजना सुरू केली आहे. या योजनेमध्ये राज्य सरकार इयत्ता 10 वी, 12 वी, पदवी, डिप्लोमा आणि व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये शिक्षण घेण्यासाठी 51,000 रुपयांची आर्थिक मदत करेल. स्वाधार योजनेचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी आणि त्यांचे भविष्य उज्ज्वल करण्यासाठी आर्थिक सहाय्य प्रदान करणे हा आहे.

स्वाधार योजना पात्रता

तुम्हाला जर स्वाधार योजना 2026 साठी अर्ज करायचा असेल तर खाली दिलेल्या पात्रता तुमच्याकडे असाव्या.
  • अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.
  • अर्जदार हा एसटी किंवा एससी प्रवर्गातील असावा.
  • अर्जदारच्या कुटुंबाचे आर्थिक उत्पन्न हे 25000 पेक्षा कमी असावे.
  • अर्जदारकडे बँक खाते असावे.
  • दहावीनंतर व्यावसायिक अभ्यासक्रम करण्यासाठी विद्यार्थ्यांनी त्या अभ्यासक्रमाला प्रवेश घ्यायला हवा. आणि अभ्यासक्रमाचा कालावधी हा 2 वर्षांपेक्षा कमी नसावा.
  • मागील वर्षीच्या परीक्षेत अर्जदारला 60% पेक्षा कमी गुण नसावे.
  • अपंग गटातील अर्जदारला कमीत कमी 40% गुण मागील परीक्षेत असावे.

स्वाधार योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे (Documents)

  • आधार कार्ड
  • रहिवासी दाखला
  • बँक खाते
  • जातीचे प्रमाणपत्र
  • उत्पन्नाचे प्रमाणपत्र
  • मोबाइल क्रमांक
  • पासपोर्ट आकाराचा फोटो

स्वाधार योजनेअंतर्गत मिळणारे अनुदान

सुविधा अनुदान
बोर्डिंग 28,000
निवास 15,000
मेडिकल आणि इंजीनीरिंग अभ्यासक्रमासाठी 5,000 अतिरिक्त
इतर खर्च 8,000
इतर शाखांसाठी 2,000 अतिरिक्त
एकूण 51,000

स्वाधार योजनेचे लाभ

  • Swadhar Yojana Maharashtra 2026 चा लाभ फक्त अनुसूचीत जाती आणि जमाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना घेता येईल. इतर जातीतील विद्यार्थी या योजनेसाठी पात्र नाहीत.
  • या योजनेअंतर्गत महाराष्ट्र सरकार कडून विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी 51,000 ची आर्थिक मदत उपलब्ध करून दिल्या जाते.
  • या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना राहण्याची आणि खाण्याची सुविधा मोफत उपलब्ध करून दिल्या जाते.
  • विद्यार्थ्यांना दरवर्षी स्कॉलरशिप सुद्धा दिल्या जाते.

Swadhar Yojana Application Form

महाराष्ट्र सरकार कडून स्वाधार योजना 2026 साठी कोणत्याही प्रकारची ऑनलाइन अर्ज प्रणाली उपलब्ध करून देण्यात आलेली नाही. लाभर्थ्यांना जर स्वाधार योजना 2026 साठी अर्ज करायचा असेल तर तो ऑफलाइन पद्धतीने करावा लागेल.  Swadhar Yojana Application Form Pdf 2026 तुम्हाला Download करावा लागेल. डाऊनलोड लिंक आम्ही खाली दिलेली आहे. अर्ज डाऊनलोड केल्यावर तुम्हाला त्याची प्रिंट काढून आवश्यक सर्व माहिती भरून कागदपत्रे अर्जाला जोडावी लागतील. आणि नंतर तुमच्या समाज कल्याण विभागामध्ये तो अर्ज जमा करावा लागेल.

PDF Form Download 

Helpline

तुमच्या मनात जर महाराष्ट्र स्वाधार योजना 2026 (Maharashtra Swadhar Yojana 2026) बद्दल काही शंका असतील तर तुम्ही खाली दीलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता.

  • फोन – 020-26127569
  • ईमेल – swadhar.swho@gmail.com

Important Downloads

मित्रांनो, माहिती आवडली असेल तर नक्कीच शेअर करा, आणि दररोज नवनवीन माहिती साठी आम्हाला टेलिग्राम वर जॉइन करा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.