कुक्कुट पालन योजना मराठी | kukut palan mahiti | Kukut Palan Yojana Maharashtra | अंडी उत्पादन व्यवसाय | पोल्ट्री व्यवसाय माहिती | कोंबडी पालन योजना | कुक्कुट पालन कर्ज योजना | कुक्कुट पालन शेड
नमस्कार मित्रांनो, आज आम्ही कुक्कुट पालन योजना 2023 (Kukut Palan Yojana) विषयी महत्वाची माहिती घेऊन आलो आहे. आपल्या सर्वांना माहित आहे की सरकार. भारतातील रहिवाशांना स्वावलंबी बनविण्यासाठी विविध योजना राबवित आहे. भारत सरकारने ज्याप्रमाणे पशुधन व मत्स्यपालन व्यवसायाला प्रोत्साहन दिलेआहे, त्याचप्रमाणे कुक्कुटपालना संबंधीत महत्वाच्या योजना राबवण्याचा निर्णय सरकार ने घेतला आहे. (Kukut Palan Yojana)
अंडी आणि कोंबड्यांची मागणी बाजारात सतत वाढत आहे, मागणी वाढल्यामुळे कोंबडी पालन देखील एक महत्वाचा उद्योग म्हणून उदयास आला आहे. मागणीतील ही वाढ पाहिल्यानंतर महाराष्ट्र सरकारने कुक्कुट पालन योजना 2023 (Kukut Palan AnudanYojana 2023) देखील सुरू केली असून त्याद्वारे ते राज्यातील लोकांना कोंबडी पालनासाठी प्रोत्साहित करत आहेत. योजनेसंबंधी सर्व महत्वाची माहिती या लेखात आम्ही दिली आहे. म्हणून सर्व वाचकांना विनंती आहे की हा लेख शेवटपर्यंत वाचा.
Kukut Palan Yojana 2023
कुक्कुट पालन किंवा पोल्ट्री योजनेस भारतात नाबार्डने पूर्ण पाठिंबा दर्शविला आहे. या योजनेंतर्गत राज्यात नवनवीन पोल्ट्री फार्मची स्थापना केली जात आहे. राज्य सरकार राज्यातील लोकांना कुक्कुट पालन (kukkut palan) करण्यास प्रोत्साहित करण्यासाठी आर्थिक सहाय्य देखील करते.
या योजनेच्या मदतीने राज्यात बेरोजगारीचे दर कमी होण्यास मदत होईल. सर्वांना ठाऊक आहे की मास मिळवण्याच्या उद्देशाने ब्रोयलर्स कोंबड्यांना वाढविले जाते तर अंडी देण्याच्या उद्देशाने लेअर्स कोंबड्या पाळल्या जातात.
कुक्कुट पालन योजना 2023 ची उद्दिष्टे
राज्यातील बेरोजगारीचे प्रमाण कमी करणे हा या योजनेचा मुख्य हेतू आहे. या योजनेमुळे महिलांना आणि बेरोजगारांना रोजगार मिळेल. म्हणूनच या योजनेंतर्गत बेरोजगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात कमी होईल. या योजनेमुळे राज्यातील ग्रामीण आणि शहरी दोन्ही भागात रोजगार निर्मिती होईल.
कुक्कुट पालन योजना 2023 चे फायदे
- पोल्ट्री पालन सुरू करण्यासाठी खूपच कमी व्याजदराने कर्ज मिळते.
- कुक्कुटपालनामुळे केवळ व्यक्तींनाच रोजगार मिळाला नाही तर राष्ट्रीय उत्पन्नातही हातभार लागला आहे. भारतात सुमारे 3000 दशलक्ष शेतकरी आहेत जे कुक्कुट पालन (Kukut Palan Yojana Maharashtra) करतात. आणि ते राष्ट्रीय उत्पन्नात सुमारे 26000 कोटींचे योगदान देत आहेत.
- कुक्कुट पालन हा उत्पन्नाचा एक चांगला स्त्रोत आहे.
- या व्यवसायात पाण्याची फारच कमी गरज आहे. त्यामुळे यामध्ये पाण्याचीही बचत होऊ शकते.
- कोंबडी पालन व्यवसायात अतिशय कमी वेळात चांगल्या प्रकारे नफा होऊ शकते.
- पोल्ट्री हा एक अत्यंत सोपी व्यवसाय आहे.
- कुक्कुटपालनासाठी परवाना देखील आवश्यक नाही.
- कुक्कुटपालनात कोणत्याही प्रकारची देखभाल आवश्यक नसते.
हे पण वाचा – नानाजी देशमुख कृषि संजीवनी योजना
Kukut Palan Yojana Maharashtra 2023 साठी आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्डाची प्रत
- कायमचा रहिवासी पुरावा
- मतदार ओळखपत्र
- रेशन कार्ड
- जमीन नोंद (सातबारा)
- बँकेचा तपशील (पासबूक ची झेरॉक्स)
- बँक स्टेटमेन्टची प्रत
- प्रकल्प अहवाल
Kukut Palan Yojana 2023 साठी पात्रता
- या योजनेंतर्गत महाराष्ट्रातील कायमस्वरूपी रहिवासी अर्ज करू शकतात.
- या योजनेंतर्गत केवळ शेतकरीच अर्ज करण्यास पात्र आहेत.
- महाराष्ट्रातील सहकारी संस्था पात्र आहेत.
- संघटित आणि असंघटित क्षेत्रांचे गट पात्र आहेत.
- अशासकीय संस्था देखील पात्र आहेत.
- अर्जदार हा महाराष्ट्राचा उद्योजक असणे आवश्यक आहे.
- ज्या कोणालाही हा व्यवसाय करायचा आहे त्याला या व्यवसायात पुरेसा अनुभव असावा.
- हा व्यवसाय सुरू करण्यासाठी अर्जदाराकडे पुरेशी जमीन असावी.
Business loan from SBI for Poultry Farm
- एसबीआय कडून कुक्कुटपालनासाठी कर्ज घ्यायचे असल्यास काही मान्यताप्राप्त संस्थेकडून प्रशिक्षण प्रमाणपत्र सादर करा.
- आपण ज्या ठिकाणी आपला व्यवसाय सुरू करू इच्छिता त्या ठिकाणी बँक अधिकारी भेट देतील.
- आणि नंतर ते आपले कर्ज मंजूर करेल.
- आपल्या गुंतवणूकीवर बँक 75% कर्ज आपल्याला दिले जाईल.
- बँका 9 लाखांपर्यंत कर्ज देऊ शकतात परंतु तुम्हाला ते कर्ज 5 वर्षांच्या कालावधीत परत करावे लागेल.
Loans and Subsidy for Poultry Scheme 2023 Maharashtra
- कुक्कुटपालनासाठी शासनाकडून 25% पर्यंत अनुदान दिले जाते.
- अनुसूचित जाती / जमाती प्रवर्गातील लोकांना कुक्कुटपालनासाठी शासनाकडून 35% पर्यंत अनुदान दिले जाते.
हे पण वाचा – महाराष्ट्र दिव्यांग योजना
नेहमी विचारल्या जाणारे प्रश्न
महाराष्ट्र कुक्कुट पालन योजना 2023 काय आहे?
या योजनेंतर्गत महाराष्ट्र सरकार कुक्कुट पलांनासाठी राज्यातील लोकांना प्रेरित करते कारण कोंबडीची अंडी व मास यांची मागणी वाढत आहे आणि लोकांना व्यवसाय म्हणून देखील कुक्कुट पालन उपयोगी पडते.
कुक्कुट पालन योजनेचे लाभार्थी कोण आहेत?
ज्यांच्याकडे शेती आहे असे महाराष्ट्रातील सर्व नागरिक
या योजनेला कोणता विभाग पाठिंबा देत आहे?
NABARD
मित्रांनो माहिती आवडली असल्यास नक्कीच शेअर करा, आणि अश्याच नवनवीन योजनांची माहिती दररोज मिळवण्यासाठी आताच आमच्या टेलिग्राम चॅनल ला जॉइन करा.
At post amabhora
Tal ashti dis beed
Mala kukkut palan cha form bharayach aahesarakari yojnet
मला कुक्कुट पालन चा फॉर्म भरायचा आहे सरकारी योजनेचा लाभ मिळण्याबाबत अर्ज करीत आहे
Mala kukkut palan cha form bharayach aahesarakari yojnet
Aapan Bharu Shakata
1]गावरान अंड्यासाठी ब्रिडर सेड
2] खाद्य तयार करणे मशीन
3] गावरान मांसासाठी सेड
4] कोंबडी खरेदी विक्री व्यवस्थेसाठी वाहनांची पूर्तता
5] गावरान पिल्ले तयार करण्याठी 30240 एवढी अंडी ठेवुन पिल्ले काढण्याचे इन्क्युबेटर ही सर्व व्यवस्था असतानाही शासनाकडुन सबसिडी कर्ज व्यवसाय वाढीसाठी घेण्याच्या हिशोबाने खुप प्रयत्न केले आणि आय डी बी आय बँकेत माझा करोडो रुपयांचा टर्नवर असतानाही बँक अधिकारी कसलीही दखल घेत नसल्याने ज्ञानदिप को ऑप लिमीटेड या बँकेकडुन पंचवीस लाख रुपये 14% टक्के व्याजदराने घेऊन माझा व्यवसाय अडचणीत आला होता
नवीन व्यवसाय चालू करायचा आहे.गावठी कोंबडी
काय माहिती पाहिजे तुम्हाला?
माझी कुक्कुटपालन चालू आहे माझे आत्ता गावठी कोंबड्याचे साठ फूट लांबीचे 60 बाय 30 लांबीचे गावठी कोंबड्याचे शेड आहे मला अजूक माझ्या व्यवसायात वाढ करायची आहे मला या योजनेतून हातभार हवा आहे
लिज वर जमीन असेल तर कुक्कटपालन करीता शासकीय योजना राबविता येईल का