कृषी सेवा केंद्र लायसन्स काढण्याची प्रक्रिया | Krushi Seva Kendra Licence Online Registration Maharashtra

Krushi Seva Kendra Licence Registration: आज शेतक-यांसाठी सर्वात महत्त्वाची सेवा असलेल्या कृषी सेवा केंद्राचा ट्रेंड आता छोट्या गावांमध्येही दिसून येतो, त्याला Krushi Kendra असेही म्हणतात. अनेक सुशीक्षित युवा शेतकरी Krushi Seva Kendra चे Licence काढून आपल्या गावातच कृषी सेवा केंद्र उघडून पैसे कमविण्याचा विचार करत आहेत. परंतु कृषी सेवा केंद्र परवाना मिळवण्यासाठी तुमच्या कडे पदवी किंवा डिप्लोमा असणे आवश्यक आहे तरच तुम्हाला कृषी सेवा केंद्राचा परवाना मिळू शकतो. त्यासाठी या पोस्ट मधून आम्ही तुम्हाला Krushi Seva Kendra उघडण्यासाठी काय प्रक्रिया आहे पात्रता आणि कागदपत्रे काय लागतात तसेच कृषी सेवा केंद्रासाठी परवाना कसा काढायचा याबद्दल सविस्तर माहिती देणार आहोत. तुम्हाला जर Krushi Seva kendra Licence काढायचे असेल आणि परवाना काढायची प्रक्रिया माहिती नसेल तर विनंती आहे की आमची ही पोस्ट अगदी शेवट पर्यंत नक्की वाचावी.

Krushi Seva Kendra Maharashtra

कृषी सेवा केंद्र, ज्याला Agricultural Service Center म्हणूनही ओळखले जाते, ही एक अशी सुविधा आहे जी शेतकऱ्यांना सर्वसमावेशक कृषी सेवा आणि कृषी साहित्य उपलब्ध करून देते. कृषी सेवा केंद्रांचा उद्देश कृषी उत्पादकता वाढवणे, शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारणे आणि शाश्वत शेती पद्धतींना प्रोत्साहन देणे हा आहे. कृषी सेवा केंद्रांद्वारे ऑफर केल्या जाणार्‍या विशिष्ट सेवा लक्ष्य क्षेत्राच्या गरजेनुसार बदलू शकतात, परंतु त्यामध्ये सामान्यत: खालील गोष्टींचा समावेश होतो:

 • शेती सल्लागार सेवा पुरविणे: कृषी सेवा केंद्रे शेतकऱ्यांना शेतीच्या विविध पैलूंवर तज्ञ मार्गदर्शन आणि सल्ला देतात, ज्यात पीक निवड, लागवडीचे तंत्र, कीड आणि रोग व्यवस्थापन, मातीचे आरोग्य, जलसंधारण आणि काढणीनंतरच्या पद्धतींचा समावेश असतो.
 • कृषी साहित्य आणि वितरण: Krushi Seva केंद्रे शेतकऱ्यांना दर्जेदार कृषी साहित्य, जसे की बियाणे, खते, कृषी रसायने आणि पशुखाद्याची उपलब्धता करून देतात. ते हे सर्व साहित्य विश्वसनीय स्त्रोतांकडून घेतात आणि परवडणाऱ्या किमतीत शेतकऱ्यांना वितरित करतात.
 • प्रशिक्षण आणि क्षमता निर्माण: कृषी सेवा केंद्रे शेतकऱ्यांचे ज्ञान आणि कौशल्ये वाढवण्यासाठी प्रशिक्षण कार्यक्रम, कार्यशाळा आणि प्रात्यक्षिके आयोजित करतात. ते आधुनिक कृषी पद्धती, शेती यंत्रांचा वापर, मूल्यवर्धन, विपणन धोरणे, आर्थिक व्यवस्थापन आणि उद्योजकता यावर प्रशिक्षण देतात.

कृषि केंद्र लायसन्स साठी पात्रता (Krushi Kendra Licence Qualification)

कृषी केंद्राचा परवाना काढण्यासाठी लागणार्‍या पात्रतेबद्दल सांगायचे तर, हा Krushi Kendra Licence बीएससी (अ‍ॅग्री) पदवी घेतलेल्या किंवा रसायनशास्त्र विषय म्हणून सामान्य बीएससी केलेल्या व्यक्तीला घेता येतो. बीएससी (अॅग्री) लोकांना परवाना मिळणे खूप सोपे आहे. ते तिन्ही कृषी परवाने ज्यामध्ये खते, कीटकनाशके आणि बियाणे एकत्र घेऊ शकतात.

तुमच्या कडे कृषि सेवा केंद्र परवाना नसेल तर तुम्ही तुमच्या पदवीधारक मित्राचे किंवा नातेवाईकाच्या नावावर Licence काढू शकता. Krushi Seva Kendra परवाना दुसर्‍याच्या नावावर राहील पण तुम्ही दुकाण चालवाल, त्यात कोणतीही अडचण येणार नाही. बरेचसे लोक असे करतात, अनेक ठिकाणी कृषी डिप्लोमा झालेल्या लोकांना सुद्धा कृषी केंद्र परवाना मिळतो. अधिक महितीसाठी तुम्ही तुमच्या जवळच्या कृषी विभागात चौकशी करू शकता.

Krushi Seva Kendra Require Document (आवश्यक कागदपत्रे)

Krushi Seva Kendra Licence काढण्यासाठी खाली आवश्यक कागदपत्रे दिलेली आहेत:

 • अर्जदाराचे 2 पासपोर्ट आकाराचे फोटो
 • Licence Form
 • आधार कार्ड
 • मतदान कार्ड
 • तुमच्या डिग्री किंवा डिप्लोम्याची प्रत
 • दुकानाच्या नकाश्याची ब्ल्यु प्रिंट
 • NOC प्रमाणपत्र (सरपंच किंवा नगरपालिका यांचे)
 • Principal Certificate
 • जमिनीचे प्रमाणित प्रमाणपत्र

आता तुम्हाला कृषी सेवा केंद्र कागदपत्रे माहिती मिळाली असेलच. नंतर तुम्हाला ठरवायचे आहे की तुम्हाला कुठला परवाना काढायचा आहे. तुमच्याकडे BSC (Agri) पदवी असेल तर तुम्ही तिन्ही परवाने काढू शकता (बियाणे, खाते आणि रासायनिक औषधी). जर तुमच्या कडे ही डिग्री नसेल तर तुम्ही बियाणे आणि खाते यांचा परवाना काढू शकता डिप्लोमा झालेल्या लोकांना रासायनिक कीटकनाशक औषधीचा परवाना मिळत नाही.

वरील Licence काढण्यासाठी अर्ज भरतांना तुम्हाला फी भरावी लागेल तिन्ही परवण्यासाठी वेगवेगळी फी आहे.

परवानाफी
बियाणे1000 रुपये
खते1250 रुपये
रासायनिक कीटकणाशके1500 रुपये

वरील तिन्ही परवाने काढण्यासाठी तुम्हाला एकूण 3750 रुपये फी भरावी लागेल.

Krushi Kendra Licence Online Application

वरील सर्व कागदपत्रे जमा झाल्यानंतर तुम्ही Krushi Seva Kendra Licence साठी ऑनलाइन अर्ज करू शकता. ऑनलाइन अर्ज तुम्ही CSC Center वर जाऊन भरू शकता. किंवा कृषी विभागाच्या अधिकृत वेबसाइट वर जाऊन तुम्हाला अर्ज भरता येईल त्यासाठी:

 • महाराष्ट्र कृषी विभागाच्या अधिकृत वेबसाइट वर जा.
 • मुखपृष्ठावर तुम्हाला Krushi kendra licence हा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा.
 • नंतर तुमच्या समोर Registration Form उघडेल.
 • या अर्जामध्ये विचारलेली संपूर्ण माहिती बरोबर भरा.
 • माहिती भरून झाल्यानंतर आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
 • कोणता परवाना काढायचा आहे ते निवडा
 • तुमच्या कडे बीएससी agri ची डिग्री असेल तर वर सांगितल्या प्रमाणे तुम्ही तिन्ही परवण्यासाठी अर्ज सादर करू शकता.
 • नंतर आवश्यक फी भरा.
 • वरील सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुमचा अर्ज ‘Submit‘ बटन वर क्लिक करून सबमिट करा.

ऑनलाइन अर्ज भरतांना अडचण येत असेल तर तुम्ही तुमच्या जवळच्या कृषी विभागात जाऊन आणि तुमचे सर्व कागदपत्रे प्रमाणित करून अर्ज सादर करू शकता.

अर्ज भरल्या नंतर तुमच्या अर्जाची कृषी विभागाच्या अधिकार्‍यांकडून तपासणी केल्या जाईल आणि सर्व माहिती आणि तुमचे कागदपत्रे यांची पडताळणी केल्या जाईल आणि बरोबर असेल तर तुमच्या कृषी सेवा परवाना ला मान्यता दिल्या जाईल.

नेहमी विचारल्या जाणारे प्रश्न (Faqs)

 • 🤔 कृषी डिप्लोमा असलेल्यांना परवाना मिळेल का?

  होय 1 किंवा 2 वर्षाचा कृषी डिप्लोमा असलेल्यांना परवाना मिळेल

 • 🤔 कीटकनाशकांसाठी परवाना कसा मिळवायचा?

  यासाठी जिल्हा स्तरावर कृषी विभाग परवाना उपलब्ध करून देतो.

 • 🤔 खत बियाण्यांसाठी परवाना मिळविण्यासाठी काय करावे लागेल?

  खत बियाणांच्या परवान्यासाठी, तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या किंवा तहसीलच्या कृषी विभागाशी संपर्क साधावा लागेल

 • 🤔 कृषी केंद्र उघडण्यासाठी काय करावे?

  कृषी केंद्र उघडण्यासाठी खते, बियाणे, कीटकनाशकांसाठी स्वतंत्र परवाना काढावा लागेल.

मित्रांनो, माहिती आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि दररोज नवनवीन माहिती मिळवण्यासाठी आमच्या Krushi Yojana या वेबसाइट ला भेट देत रहा. इंस्टाग्राम वरुण फोटो डाऊनलोड करण्यासाठी आमच्या Saveinsta या वेबसाइट ला नक्की विजिट करा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.