मुख्यमंत्री फेलोशिप योजना महाराष्ट्र: ऑनलाइन अर्ज, पात्रता, कागदपत्रे आणि संपूर्ण माहिती

सन 2015-16 ते 2019-20 या कालावधीत महाराष्ट्र राज्यात Mukhyamantri Fellowship Yojana Maharashtra 2023 हा कार्यक्रम राबविण्यात आला होता. या पोस्ट मधून आम्ही तुम्हाला मुख्यमंत्री फेलोशिप योजना 2023 काय आहे, या योजनेसाठी पात्रता आणि कागदपत्रे कोणती हवी आहेत तसेच ऑनलाइन अर्ज कसा करायचा या बद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत तरी विनंती आहे की आमची ही पोस्ट शेवट पर्यंत नक्की वाचावी.

Mukhyamantri Fellowship Yojana Maharashtra 2023

राज्यातील विकास प्रक्रिया व त्यातील टप्पे जाणून घेता यावेत व ते समजून घेत असताना शासकीय यंत्रणेतील कामकाज, त्यातील घटकांचा ताळमेळ व निर्णय प्रक्रियेचा अनुभव तरुणांनी मिळवावा त्यातून समर्पित वृत्तीने समाजसेवा करण्यासाठी प्रामाणिक, ध्येयवादी, सुजाण नागरिक तयार व्हावेत या करीता मुख्यमंत्री फेलोशिप योजना 2023 {Mukhyamantri Fellowship Yojana Maharashtra} राज्य सरकार कडून राबविण्यात आला होता.

“मुख्यमंत्री फेलोशिप योजना” (Mukhyamantri Fellowship Yojana Maharashtra) या कार्यक्रमाच्या माध्यमातून राज्यातील तरुणांना राज्य प्रशासनासोबत काम करण्याचा अनुभव मिळाला व त्या सोबतच त्यांच्या ज्ञानाच्या, अनुभवाच्या कक्षा रुंदावण्यास सुद्धा मदत झाली. तरुणांमधील कल्पकता व वेगळा विचार मांडण्याची क्षमता याचा उपयोग प्रशासनास झाला आणि तरुणांमधील उत्साह, तंत्रज्ञानाची आवड या माध्यमातून प्रशासकीय प्रक्रियांना गती मिळाली. Mukhyamantri Fellowship Yojana Maharashtra 2023

दिनांक 30 जानेवारी 2020 च्या राज्य शासन निर्णयानुसार “मुख्यमंत्री फेलोशिप योजना” संपुष्टात आणण्यात आला. परंतु “मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम” पुन्हा सुरु करण्याबाबत होत असलेली आग्रही मागणी लक्षात घेता सदर कार्यक्रम पुन्हा सुरु करण्याची तसेच फेलोना भविष्यातील वाटचालीस उपयुक्त ठरेल या दृष्टीने सदर कार्यक्रमास शैक्षणिक कार्यक्रमाची जोड देण्यासाठी देशातील नामांकित शैक्षणिक संस्थांना सहभागी करून घेण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. म्हणून दिनांक 20 जानेवारी 2023 रोजी नवीन शासन निर्णय काढून ही योजना पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याबाबतचा शासन निर्णय खालील प्रमाणे आहे.

हे नक्की वाचा:   दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजना 2023: PDF अर्ज आणि संपूर्ण माहिती | Alpbhudharak Shetkari Yojana 2023

मुख्यमंत्री फेलोशिप योजना 2023 शासन निर्णय

 • “मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम” पुन्हा सुरु करण्याचा निर्णय नुकताच राज्य शासनाने घेतला आहे. सदर कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यासाठी आणि त्या अनुषंगाने फेलोंच्या निवडीचे निकष, अटी व शर्ती निश्चित करण्याच्या दृष्टीने तसेच नामांकित शैक्षणिक संस्थांमार्फत राबविण्यात येणाऱ्या शैक्षणिक कार्यक्रमाची रूपरेषा ठरविण्याच्या दृष्टीने सदर शासन निर्णय निर्गमित करण्यात येत आहे.
 • “मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम” (Mukhyamantri Feloship Karyakram) करिता फेलोंच्या निवडी संदर्भातील निकष, फेलोंच्या नियुक्ती संदर्भातील अटी व शर्ती तसेच शैक्षणिक संस्थांमार्फत राबविण्यात येणाऱ्या शैक्षणिक कार्यक्रमाची रूपरेषा व अंमलबजावणी बाबत शासन निर्णयात नमूद बाबींनुसार कार्यवाही करण्यात यावी.
संपूर्ण शासन निर्णय पहाण्यासाठी येथे क्लिक करा.

Feloship Yojana Eligibility 2023

मुख्यमंत्री फेलोशिप योजना 2023 हा कार्यक्रम राज्यातील युवकांना सरकार मध्ये सहभागी होण्याची संधि देतो. युवकांच्या नावीन्यपूर्ण कल्पनांची शासनाला खूप मदत होते. युवकानांचा उत्साह आणि तंत्रज्ञानाची आवड या मुळे शासनाचा खूप फायदा होतो. Mukhyamantri Feloship Yojana Maharashtra 2023 साठी पात्रता खालील प्रमाणे आहे.

 • अर्जदार हा भारत देशाचा नागरिक असावा.
 • कोणत्याही शाखेतील पदवी असावी (किमान 60% गुणांसह उत्तीर्ण)
 • भाषा आणि संगणक यांचे ज्ञान असावे.
 • अर्जदाराचे वय किमान 21 वर्ष व कमाल 26 वर्ष असावे.

Feloship Yojana Maharashtra Documents

 • आधार कार्ड
 • पासपोर्ट आकाराचा फोटो
 • शैक्षणिक कागदपत्रे
 • मोबाइल क्रमांक आणि ईमेल आयडी

Feloship Yojana निवड प्रक्रिया

फेलोशिप योजना महाराष्ट्र साठी निवड प्रक्रियाचे दोन टप्पे आहेत.

टप्पा 1

 • ऑनलाइन परीक्षा
 • सर्वाधिक गुणांच्या आधारे 210 उमेदवार शॉर्टलिस्ट करणे

टप्पा 2

 • शॉर्टलिस्ट केलेले 210 विद्यार्थी निबंध अपलोड करतील
 • नंतर त्यांची मुलाखत घेतल्या जाईल
 • नंतर अंतिम निवड झालेल्या उमेदवाराची यादी जाहीर करण्यात येईल
फेलोशिप योजनेची अधिकृत वेबसाइट विजिट करण्यासाठी येथे क्लिक करा. मित्रांनो, दररोज नवनवीन माहिती मिळवण्यासाठी आम्हाला टेलिग्राम वर नक्की फॉलो करा. Instagram Photo आणि Video डाऊनलोड करण्यासाठी आमच्या Downloadgram आणि Saveinsta या वेबसाइट ला नक्की भेट द्या.

हे नक्की वाचा:   ह्या योजनेसाठी जिल्हा परिषद देत आहे ७५% अनुदान - लवकर अर्ज करा


Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.