बियाणे अनुदान योजना 2024: बियाणे खरेदीवर मिळणार 50% अनुदान | Biyane Anudan Yojana 2024 Maharashtra

Biyane Anudan Yojana 2024: पावसाळा सुरू होत असल्याने शेतकरी शेतीच्या कामात मोठ्या प्रमाणात गुंतलेले आहेत. अनेक शेतकरी पेरणी साठी बियाण्यांच्या उपलब्धतेबद्दल चिंतेत आहेत, परंतु तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे सरकार कडून बियानांच्या खरेदीवर 50% अनुदान मिळत आहे. तुम्ही ऑनलाइन अर्ज करून Biyane Anudan Yojana 2024 चा लाभ घेऊ शकता आणि 50% पर्यंत अनुदान मिळवू शकता.

या योजने नुसार तुम्ही सोयाबीन, कापूस, वाटाणा, मसूर किंवा यादीत नमूद केलेल्या इतर कोणत्याही बियाण्यांसाठी ऑनलाइन अर्ज करू शकता. ऑनलाईन अर्ज सबमिट करून तुम्ही बियाणे अनुदान योजना 2024 चा लाभ देखील घेऊ शकता. या पोस्ट मधून आम्ही तुम्हाला Biyane Anudan Yojana 2024 Maharashtra साठी ऑनलाइन अर्ज कसा करायचा तसेच या योजनेचे फायदे आणि वैशिष्टे इत्यादि बद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत, विनंती आहे की आमची ही पोस्ट शेवट पर्यंत नक्की वाचावी.

Biyane Anudan Yojana 2024

पेरणी साठी अत्यंत कमी दिवस राहिलेले आहेत मान्सून सुद्धा भारतामध्ये दाखल झालेला आहे त्यामुळे येत्या काही दिवसात पेरणी ला सुरुवात होणार आहे. शेतकरी दरवर्षी बियानांच्या चिंतेत असतात. आणि बियानांचे भाव दरवर्षी वाढतच राहतात, त्यामुळे राज्य सरकार ने ह्या सर्व गोष्टी विचारात घेऊन शेतकर्‍यांसाठी खास बियाणे अनुदान योजना 2024 सुरू केली आहे या योजनेत तुम्हाला बियानांच्या खरेदीवर 50% अनुदान मिळेल म्हणजे अर्ध्या किमतीत तुम्ही बियानांची खरेदी करू शकाल.

हे नक्की वाचा – महाराष्ट्र सरकारच्या विविध सरकारी योजना

या बियानांच्या खरेदीवर मिळेल 50% अनुदान

कापूसभुईमुंग
उडीदभात
तूरमका
नाचणीमूग
बाजारीसोयाबीन

वरील बियाणे तुम्ही Biyane Anudan Yojana 2024 साठी ऑनलाइन अर्ज करून 50% सवलतीसह खरेदी करू शकता.

बियाणे अनुदान योजना 2024 ऑनलाइन अर्ज

शेतकरी मित्रांनो, बियाणे अनुदान योजनेचा लाभ तुम्हाला घ्यायचा असेल तर MahaDBT Portal वर तुम्हाला Online अर्ज करावा लागेल. ऑनलाइन अर्ज करण्यापूर्वी तुमच्या तालुक्यातील कृषी विभागाशी संपर्क साधल्यास अधिक सोयीचे होते. कारण त्यांच्याकडे वाण कोणते उपलब्ध आहे हे आपल्याला कळू शकते आणि त्यानुसार बियाणे अनुदान योजना 2024 साठी अर्ज केला तर अधिक सोयीचे ठरू शकते. खालील प्रमाणे ऑनलाइन अर्ज सादर करावा:

  • सर्वात आधी Mahadbt पोर्टल ला भेट द्या. (येथे क्लिक करा)
  • महाबीडीटी पोर्टल ची होमेपेज ओपन झाल्यानंतर “Farmer” या पर्यायावर क्लिक करून तुमचा User ID आणि Password टाकून Login करा. (तुम्ही OPT चा पर्याय वापरुन सुद्धा लॉगिन करू शकता).
  • लॉगिन झाल्यावर “अर्ज करा” हा पर्याय शोधा आणि त्यावर क्लिक करा.
  • आता तुम्हाला वेगवेगळे पर्याय दिसतील त्यापैकि “बियाणे औषधे व खते” पर्यायासमोरील बाबी निवडा या लिंक वर क्लिक करा.
  • अर्ज करतांना एक बाब लक्षात असू द्या कि Biyane Anudan 2024 दोन पद्धतीने मिळते एक म्हणजे प्रात्यक्षिक आणि दुसरी म्हणजे प्रमाणित. प्रात्यक्षिक बियाण्यासाठी १०० टक्के अनुदान असते तर प्रमाणित बियाण्यासाठी ५० टक्के अनुदान मिळते.
  • नंतर तुमच्या समोर Biyane Anudan Yojana 2024 चा अर्ज उघडेल.
  • अर्जामध्ये विचारलेली संपूर्ण माहिती भरा आणि अर्ज सबमिट करा.

हे नक्की वाचा – शेतकरी अनुदान योजना 2024 (List)

वरील प्रकारे तुम्ही बियाणे अनुदान योजना महाराष्ट्र 2024 साठी ऑनलाइन अर्ज करू शकता.

ऑनलाइन अर्ज सादर करतांना खालील माहिती भरणे आवश्यक आहे

  • तुम्ही आधीच MAHADBT Portal वर नोंदणी केलेली असेल तर तुमचा तालुका, गाव, शहर, सर्वे क्रमांक इत्यादी माहिती अगोदरच पोर्टल वर उपलब्ध असेल.
  • बाब निवडा: या पर्यायामध्ये बियाणे असेल. पिक निवडल्यावर ज्यासाठी अनुदान हवे आहे ती बाब निवडायची आहे जसे कि प्रमाणित बियाण्यांचे वितरण किंवा पिक प्रात्यक्षिक.
  • बियानांचा प्रकार निवडा: तुम्हाला जुने बियाणे हवे आहे की नवे ते निवडावे लागेल.
  • किती क्षेत्रावर पिकाची लागवड करायची आहे ते क्षेत्र दिलेल्या बॉक्स मध्ये भरा. आणि सर्वात शेवटी जतन करा (Submit) या पर्यायावर क्लिक करा.

ऑनलाइन अर्ज भरतांना तुम्हाला खालील Error येवू शकतो

जेव्हा मी माझा अर्ज सबमिट करण्याचा किंवा “जतन करा” या पर्यायावर क्लिक करण्याचा प्रयत्न केला तेव्हा मला एक सूचना प्राप्त झाली – “असे दिसते की एक घटक आधीच जोडला गेला आहे” याचाच अर्थ असा होतो की माझा अर्ज जतन झालेला नाही. जर एखादा घटक आधीच जोडला गेला असेल, तर त्याचा अर्थ असा आहे की तुम्ही मागील वर्षी बियाने अनुदान योजनेसाठी अर्ज केला होता, आणि तुम्ही तो अर्ज रद्द करण्याचे विसरले.

या वर उपाय म्हणजे मागील वर्षी Biyane Anudan Yojana साठी केलेला अर्ज रद्द करणे होय. त्यासाठी तुम्हाला “अर्ज रद्द करा” या पर्यायावर क्लिक करून मागील वर्षीचा अर्ज रद्द करावा लागेल. नंतर दूसरा अर्ज भरावा लागेल.

Biyane Anudan Yojana Application Fee

बियाणे अनुदान योजना 2024 साठी ऑनलाइन अर्ज जतन केल्यावर तुम्हाला ऑनलाइन अर्जाची फी म्हणून 26.60 रुपये ऑनलाइन पेमेंट करावे लागेल:

  • अर्ज जतन केल्यावर “घटक यशस्वीपणे समाविष्ट केला आहे” अशी सूचना तुमच्या स्क्रीन वर येईल. या ठिकाणी तुम्हाला अजून एखादा अर्ज करायचा असल्यास “Yes” या बटनावर क्लिक करा.अन्यथा तुम्ही “NO” या बटन वर क्लिक करा.
  • तुम्हाला आणखी अर्ज करायचा नसेल आणि तुम्ही “NO” या बटन वर क्लिक केले तर तुमच्या समोर एक सूचना प्राप्त होईल. ती सूचना काळजीपूर्वक वाचुन घ्या. नंतर “पहा” या बटन वर क्लिक करून योजनेसाठी प्राधान्य क्रम निवडा.
  • नंतर Terms & Conditions (अटी व शर्ते) या समोरील बॉक्स वर टिक करा.
  • नंतर तुम्हाला “अर्ज सादर करा” या बटन वर क्लिक करावे लागेल. त्यानंतर “Make Payment” असा पर्याय तुमच्यासमोर उघडेल तुम्हाला त्यावर क्लिक करावे लागेल.
  • आता Online Payment करण्यासाठी तुमच्या समोर विविध पर्याय दिसतील. तुम्हाला जो पर्याय योग्य वाटत असेल त्यावर क्लिक करून तुम्ही ऑनलाइन पेमेंट ची प्रोसेस पूर्ण करू शकता.

मित्रांनो, वरील प्रकारे तुम्ही Biyane Anudan Yojana 2024 Maharashtra साठी ऑनलाइन अर्ज सादर करून बियाणे अनुदानाचा लाभ घेऊ शकता. तुमचा अर्ज यशस्वीरित्या Submit झाला की नाही याची खात्री करण्यासाठी महाडीबीटी च्या मुखपृष्ठावर जा, नंतर डाव्या बाजूला असलेल्या “मी अर्ज केलेल्या बाबी” या पर्यायावर क्लिक करा. येथे तुम्ही ज्या योजनांसाठी अर्ज केला आहे ते सर्व अर्ज दिसतील. नंतर “छाननी अंतर्गत अर्ज” हा पर्याय निवडा, या मध्ये तुम्हाला बियाणे अनुदान योजना हा अर्ज दिसेल आणि तिथेच तुम्हाला पावती प्रिंट करा असा पर्याय दिसेल त्याची प्रिंट काढून घ्या.

नेहमी विचारल्या जाणारे प्रश्न (Faqs)

बियाणे अनुदान योजना 2024 वर किती टक्के अनुदान मिळणार आहे?

बियाणे अनुदान योजना 2024 वर 50% अनुदान मिळणार आहे.

बियाणे अनुदान योजनेसाठी अर्ज कसा करायचा?

MahaDBT Portal वर लॉगिन करून Biyane Anudan Yojana 2024 साठी अर्ज करता येतो.

बियाणे अनुदान योजनेसाठी अर्ज करतांना किती फी भरावी लागेल?

बियाणे अनुदान योजनेसाठी अर्ज करतांना 26.60 रुपये फी ऑनलाइन भरावी लागेल

बियाणे अनुदान योजनेअंतर्गत नवीन बियाणे उपलब्ध आहेत का?

हो, अर्ज भरतांना तुम्हाला कोणती बियाणे हवी आहेत (नवी की जुनी) असा पर्याय तुम्ही निवडू शकता.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.