RTE Admission Maharashtra 2024-25: RTE प्रवेश 2024 साठी ऑनलाइन अर्ज सुरू

RTE Admission Maharashtra 2024 | RTE Admission 2024-25 Last Date | RTE Admission Process

Maharashtra RTE Admission 2024-25 या सत्रासाठी rte25admission.maharashtra.gov.in आणि student.maharashtra.gov.in वर ऑनलाइन अर्ज सुरू झालेले आहेत. महाराष्ट्र शासनाने आरटीई प्रवेशाची प्रक्रिया नुकताच सुरू केली आहे. RTE Maharashtra Admission Online अर्ज भरून प्रवेश घेता येतो. या पोस्टमधून आम्ही तुम्हाला RTE प्रवेश प्रक्रिया 2024-25 या सत्रासाठी ऑनलाइन अर्ज कसा करायचा, शेवटची तारीख काय आहे, कागदपत्रे कोणती लागतात इत्यादि बद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. तरी विनंती आहे की आमची ही पोस्ट शेवट पर्यंत वाचावी. [हे वाचा – अग्निपथ योजना 2022-23]

RTE Admission Maharashtra 2024-25

महाराष्ट्र सरकारने राज्यातील विद्यार्थ्यांसाठी आगामी सत्र 2024-25  साठी आरटीई महाराष्ट्र प्रवेश सुरू केला आहे. ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश घ्यायचा आहे त्यांना लवकरात लवकर ऑनलाइन अर्ज करावा लागेल. शिक्षण हक्क कायदा 2009 (Right to Education 2009) नुसार, रत्नागिरी, अमरावती, हिंगोली, परभणी, सोलापूर, रायगड या महाराष्ट्रातील विविध शहरांमध्ये असलेल्या काही नामांकित शाळांचा समावेश या मध्ये आहे. ठाणे, सातारा, नागपूर, पुणे, कोल्हापूर, पालघर, जालना, चंद्रपूर, अहमदनगर, औरंगाबाद, गडचिरोली, वर्धा, लातूर, यवतमाळ, नाशिक, अकोला, वाशीम, मुंबई, नांदेड आणि गोंदिया या जिल्हयांसाठी 25% जागा सरकारने राखीव ठेवल्या आहेत. या 25% आरक्षित जागांवर प्रवेश करण्यासाठी, विद्यार्थी काही प्रक्रियांचे अनुसरण करून ऑनलाइन अर्ज करू शकतात. [हे देखील वाचा- विमा सुरक्षा पोर्टल]

RTE Admission 2024 Overview

योजनेचे नाव RTE प्रवेश 2024-25
कोणी सुरू केली महाराष्ट्र सरकार
वर्ष 2024
लाभार्थी महाराष्ट्रातील विद्यार्थी
अर्जाची प्रक्रिया ऑनलाइन
वेबसाइट rte25admission.maharashtra.gov.in

आरटीई महाराष्ट्र प्रवेश प्रक्रिया 2024 चे उद्दिष्ट

राज्यातील सर्व विद्यार्थ्यांना शिक्षणाचा मूलभूत अधिकार मिळवून देणे हे सरकारचे मुख्य उद्दिष्ट आहे. RTE प्रवेश 2024 साठी 8 वी पर्यंतच्या शिक्षणाच्या अधिकारांतर्गत 25% जागा राखीव आहेत. महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थी या योजनेद्वारे त्यांचे शिक्षण घेऊ शकतात आणि या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला अधिकृत वेबसाइटद्वारे Maharashtra RTE प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज करावा लागेल. [ हे देखील वाचा – LIC चा धन वर्षा प्लान 866]

RTE महाराष्ट्र प्रवेशाचे फायदे आणि वैशिष्ट्ये

महाराष्ट्र राज्य सरकारने शालेय शिक्षण आणि सहाय्य विभागांतर्गत सुरू केलेल्या या योजनेशी संबंधित फायदे आणि वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे आहेत:-

  • या योजनेअंतर्गत, शिक्षण हक्क कायद्यानुसार 25% जागा आधीच राखीव आहेत.
  • राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना राखीव जागांचा लाभ दिला जाणार आहे.
  • इच्छुक विद्यार्थ्यांच्या पालकांनी आरटीई महाराष्ट्र प्रवेशाच्या अधिकृत वेबसाइटद्वारे अर्ज करणे बंधनकारक असेल.
  • या योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी अर्जदाराला कोणत्याही शाळेत किंवा कोणत्याही सरकारी कार्यालयात जाण्याची गरज नाही, तो घरी बसून ऑनलाइन अर्ज करू शकतात.
  • राज्य सरकारच्या या योजनेंतर्गत राज्यातील प्रतिष्ठित खासगी शाळांमध्ये नर्सरी ते आठवीपर्यंतच्या २५ टक्के जागा राखीव ठेवणे बंधनकारक असेल.
  • या योजनेच्या माध्यमातून राज्यातील प्रत्येक बालकाला शिक्षणाचा मूलभूत अधिकार मिळेल आणि त्याच बरोबर महाराष्ट्र राज्याच्या साक्षरतेच्या प्रमाणात आणि रोजगार दरातही वाढ होईल.

RTE Maharashtra Eligibility / पात्रता

  • अर्जदार विद्यार्थी हा महाराष्ट्र राज्याचा कायमचा रहिवासी असावा.
  • अर्जदार विद्यार्थ्याचे वय हे 6 वर्षापेक्षा जास्त नसावे.
  • अर्जदार विद्यार्थ्याकडे जातीचा दाखला आणि उत्पन्नाचा दाखला असावा.

RTE Maharashtra Document / कागदपत्रे

RTE Admission Document List Maharashtra

 

RTE Maharashtra Online Application 2024 / ऑनलाइन अर्ज प्रक्रिया

  • RTE Maharashtra Admission 2024 Online Application साठी सर्वात आधी तुम्हाला अधिकृत वेबसाइट वर जावे लागेल.  वेबसाइट वर गेल्यानंतर तुमच्या समोर मुखपृष्ठ उघडेल
https://rte25admission.maharashtra.gov.in/adm_portal/users/rteindex
  • मुखपृष्ठावर तुम्हाला Online Application या लिंक वर क्लिक करावे लागेल. नंतर तुमच्या समोर नवीन पृष्ठ उघडेल.
RTE Maharashtra New Registration
  • या पृष्ठावर तुम्हाला New Registration या लिंक वर क्लिक करावे लागेल. नंतर तुमच्या समोर Registration Form उघडेल या फॉर्म मध्ये तुम्हाला विचारलेली संपूर्ण माहिती भरून सबमिट या बटन वर क्लिक करावे लागेल

वरील प्रकारे तुमची RTE Maharashtra 2024 ची अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.

Download Self Declairation Form / हमीपत्र

RTE Maharashtra Hamipatra

Helpline Number

RTE Admission Process 2024 बद्दल तुम्हाला काही अडचण असेल तर खाली दिलेल्या हेल्पलाइन नंबर वर तुम्ही संपर्क साधू शकता.

  • 91-9158877431
  • Email – rtemh2018@gmail.com.

Instagram Photo आणि Video डाऊनलोड करण्यासाठी आमच्या Downloadgram आणि Saveinsta या वेबसाइट ला नक्की भेट द्या.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.