पीएम किसान आणि नमो शेतकरी योजना: पुढचे ४००० रुपये नेमके कोणत्या बँकेत जमा होणार? मोबाईलवर २ मिनिटांत करा चेक

आजचे बाजारभाव दिनांक: पहा
WhatsApp ग्रुप Join Now
टेलिग्राम ग्रुप Join Now
Facebook पेज Follow

शेतकरी मित्रांनो, फेब्रुवारी महिना संपत आला आहे आणि आता सर्वांना वेध लागले आहेत ते पीएम किसान (PM Kisan) आणि नमो शेतकरी योजनेच्या (Namo Shetkari Yojana) पुढच्या हप्त्याचे. मार्चच्या पहिल्या आठवड्यात शासनाकडून हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची दाट शक्यता आहे.

पण इथेच खरी अडचण सुरू होते. मागच्या वेळी अनेक शेतकऱ्यांचे e-KYC पूर्ण होते, लिस्टमध्ये नाव होते, तरीही पैसे खात्यात आले नाहीत. किंवा काहींचे पैसे आले, पण ते कोणत्या बँकेत गेले हेच त्यांना समजले नाही.

याचे मुख्य कारण म्हणजे DBT (Direct Benefit Transfer). आता शासनाचे पैसे तुम्ही दिलेल्या बँक खात्यात येत नाहीत, तर तुमच्या आधार कार्डला जी बँक लिंक (Aadhaar Seeded Bank Account) असते, त्यात थेट जमा होतात.

म्हणूनच, हप्ता येण्यापूर्वी तुमचे पैसे नक्की कोणत्या बँकेत जाणार आहेत, हे मोबाईलवर चेक करणे खूप गरजेचे आहे. चला तर मग, याची सोपी स्टेप-बाय-स्टेप प्रोसेस पाहूया.

पैसे कोणत्या खात्यात जाणार हे पाहण्यासाठी तुम्हाला बँकेत जायची गरज नाही. तुमच्या स्मार्टफोनवर तुम्ही हे सहज पाहू शकता:

  • स्टेप १: सर्वात आधी मोबाईलमध्ये Google उघडा आणि UIDAI (आधार कार्डची अधिकृत वेबसाईट) सर्च करा.
  • स्टेप २: वेबसाईटवर गेल्यावर ‘My Aadhaar’ या सेक्शनमध्ये जा आणि तिथे ‘Login’ बटनावर क्लिक करा.
  • स्टेप ३: तुमचा १२ अंकी आधार नंबर टाका आणि खाली दिलेला कॅप्चा (Captcha) कोड भरून ‘Send OTP’ वर क्लिक करा.
  • स्टेप ४: तुमच्या आधारला लिंक असलेल्या मोबाईल नंबरवर एक OTP येईल, तो टाकून लॉगिन करा.
  • स्टेप ५: लॉगिन झाल्यावर तुमच्यासमोर अनेक पर्याय दिसतील. त्यापैकी ‘Bank Seeding Status’ या पर्यायावर क्लिक करा.

रिझल्ट: इथे तुम्हाला तुमच्या आधार कार्डला कोणती बँक लिंक आहे (उदा. SBI, Bank of Maharashtra, Post Office) तिचे नाव दिसेल आणि स्टेटस ‘Active’ दिसेल.

महत्त्वाची टीप: ज्या बँकेचे नाव इथे ‘Active’ दिसत आहे, त्याच बँकेत तुमचे पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेचे पैसे जमा होणार आहेत.

PM Kisan Beneficiary Status मधून e-KYC आणि FTO स्टेटस कसे पाहायचे?

बँक कोणती लिंक आहे हे पाहिल्यानंतर, तुमचा हप्ता पास झाला आहे की नाही हे पाहण्यासाठी:

  • १. गुगलवर PM Kisan सर्च करून अधिकृत पोर्टल (pmkisan.gov.in) ओपन करा.
  • २. खाली स्क्रोल करून ‘Know Your Status’ या पर्यायावर क्लिक करा.
  • ३. तुमचा रजिस्ट्रेशन नंबर (Registration No.) आणि कॅप्चा टाका. (रजिस्ट्रेशन नंबर माहीत नसेल तर तिथेच ‘Know your registration no.’ चा पर्याय असतो, त्यावर क्लिक करून मोबाईल नंबर टाकून तो मिळवा).
  • ४. ‘Get Data’ वर क्लिक करा.

आता तुमच्यासमोर तुमचे Beneficiary Status ओपन होईल. यामध्ये Eligibility Status वर क्लिक करा आणि खालील ३ गोष्टींवर हिरवी टिक (Yes) आहे का ते तपासा:

  • Land Seeding: Yes
  • e-KYC Status: Yes
  • Aadhaar Bank Account Seeding Status: Yes

जर या तिन्ही गोष्टी ‘Yes’ असतील आणि खाली FTO Processed – Yes असे दिसत असेल, तर तुमचे पैसे १००% तुमच्या आधार लिंक बँकेत येणार आहेत, तुम्हाला कोणतीही काळजी करण्याची गरज नाही.

आजचे बाजारभाव दिनांक: पहा
WhatsApp ग्रुप Join Now
टेलिग्राम ग्रुप Join Now
Facebook पेज Follow

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

🔥 Trending Now
महाराष्ट्र अर्थसंकल्प २०२६-२७: शेतकऱ्यांसाठी मोठ्या घोषणा! कर्जमाफी मिळणार का?