नवीन विहिरी मंजूर – येथे पहा आपल्या गावाची यादी (NANAJI DESHMUKH KRUSHI SANJIVANI PRAKALP)

 नमस्कार शेतकरी मित्रांनो, नानाजी देशमुख कृषि संजवणी प्रकल्पा अंतर्गत ज्या ज्या शेतकरी बांधवांनी अर्ज केले होते आणि त्या पैकी जे शेतकरी पात्र आहेत त्यांची यादी ही जाहीर झाली आहे. या पोस्ट च्या शेवटी आपल्याला यादी पाहण्यासाठी लिंक उपलब्ध करून दिलेली आहे.

नानाजी देशमुख कृषि संजीवणी प्रकल्पा अंतर्गत साधारणत: प्रत्येक गावासाठी 2 विहिरी ह्या मंजूर झाल्या आहेत. या साठी तब्बल 5142 गावातील शेतकर्‍यांनी अर्ज केले होते,  त्या आधारे सरकार अमलबजावणी करण्यासाठी प्रयत्न करत आहे. 

संदर्भ क्रमांक. 2 व 3 च्या निकषा नुसार प्रकल्पांतर्गत नवीन विहीरीचे वाटप करत असतांना सुधारित तांत्रिक निकष हे देण्यात आलेले आहेत आणि या निकशाच्या आधारे नवीन विहीर हा घटक फक्त सुरक्षित पाणलोट क्षेत्रामध्ये राबवणे आणि लाभर्थ्यांना भूजल विकास सर्वेक्षण या यंत्राने कडून पाणी उपलब्ध आहे असे प्रमाणपत्र प्राप्त करून देणे हे अभिप्रेत आहे. आणि या प्रकल्पांतर्गत सुरक्षित पाणलोट क्षेत्रांची यादी ही राज्य सरकार कडून पाठवण्यात आलेली आहे. 

निकष कोणता आहे?

वरील काही निकशाच्या आधारे नवीन विहिरी साठी नानाजी देशमुख हा प्रकल्प NANAJI DESHMUKH KRUSHI SANJIVANI PRAKALP राबवित असतांना, खाली दिलेले मुद्दे विचारात घेऊन सादर प्रकल्पाची अमलबजावणी अधिक गतीने आणि पारदर्शक होण्यासाठी खाली सुधारित कार्य पद्धती देण्यात आलेली आहे. 

१. संदर्भ क्र.२ नुसार, प्रकल्पांतर्गत देण्यात आलेला नवीन विहीर या घटकाचा लक्षांक हा फक्त सुरक्षित पाणलोट क्षेत्रातील गावांकरिता राबविणे अभिप्रेत आहे (संदर्भ क्रमांक ३ नुसार). म्हणजेच, भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा (GSDA) च्या व्याख्येप्रमाणे सेमी क्रिटीकल, क्रिटीकल, ओव्हर एक्स्प्लायटेड क्षेत्रातील गावामधून नवीन विहीर या घटकांचे प्रलंबित अर्ज डेस्क १,२ व ३ वरून रद्द करण्यात यावेत. NANAJI DESHMUKH KRUSHI SANJIVANI PRAKALP

२. सुरक्षित पाणलोट क्षेत्रातील समाविष्ट गावांची संख्या विचारात घेऊन सुरक्षित पाणलोटातील प्रत्येक गावासाठी प्रती गाव ३ विहिरींचा लक्षांक निर्धारित करण्यात येत आहे.

हेही वाचा – यांनाच मिळतील घरकूल (नवीन नियम)

 

३. विहिरींसाठी प्राप्त सर्व अर्जाची तांत्रिक निकषाच्या आधारे पडताळणी करून,तांत्रिकदृष्ट्या निकष पूर्ण करणारे सर्व अर्ज डेस्क-३ वर तात्काळ पाठविण्याची प्रक्रिया पूर्ण करावी व त्यानंतरच प्रती गाव ३ विहिरीप्रमाणे मान्यता देण्याची कार्यवाही करण्यात यावी.

४. विहीर या घटकास पूर्वसंमती देताना, उपविभागीय कृषी अधिकारी यांनी डेस्क -३ वर प्राप्त सर्व पात्र अर्ज अत्यल्प व अल्प भूधारक शेतकरी, अनुसूचित जाती व जमाती, महिला शेतकरी, दिव्यांग व इतर या प्राधान्यक्रमानुसार पोर्टलवर दिसत असल्याने त्याच क्रमाने एका गावासाठी ३ विहीर याप्रमाणे पात्र अर्जदारांना भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेकडील पाणी उपलब्धतेचे प्रमाणपत्र प्राप्त करून घेणेबाबत अवगत करावे व त्यानंतरच पूर्वसंमती देण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात यावी.

५. संबधित गावातील ३ नवीन विहिरीस पूर्वसंमती देत असताना,त्या गावात यापूर्वी दिलेली पूर्वसंमती संबधित गावासाठीच्या लक्षांकातून वजा करण्यात यावी.तसेच गावनिहाय दिलेल्या पुर्वसंमतीची स्वतंत्रपणे नोंद ठेवण्यात यावी.

६. संबधित गावातील ३ अर्जाना पूर्वसंमती दिल्यावर, उर्वरित अर्ज हे hold वर ठेवण्यात यावेत.

७. पूर्वसंमती दिलेल्या लाभार्थ्यांनी, विहित कालावधीत (पूर्वसंमती प्राप्त झाल्यापासून ३० दिवसाच्या आत) घटकाची अंमलबजावणी सुरु केली नसल्यास,संबधित शेतकऱ्याची पूर्वसंमती रद्द करण्यात येईल, याची लाभार्थ्यास जाणीव करून देण्यात यावी.

८. पूर्वसंमती प्राप्त लाभार्थ्यांनी “विहीर पूर्न:भरण” करणे बंधनकारक राहील. त्यासाठी विहीर पूर्न:भरण बाबीसाठी स्वतंत्रपणे अर्ज करण्यासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात यावे. “विहीर पूर्न: भरण” ही बाब पूर्ण केल्यानंतरच नविन विहीर या बाबीचे अंतिम प्रदान करण्यात यावे.

नानाजी देशमुख कृषि संजीवनी योजने ची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा. 

मित्रांनो, माहिती आवडली असल्यास आपल्या मित्रांसोबत नक्कीच शेअर करा. आणि अश्याच प्रकारे दररोज नव-नवीन माहिती मिळवण्यासाठी आजच आमच्या Telegram चॅनल ला जॉइन व्हा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.