ह्या योजनेसाठी जिल्हा परिषद देत आहे ७५% अनुदान – लवकर अर्ज करा

नमस्कार शेतकरी मित्रहो, जिल्हा परिषेदे अंतर्गत अनुसूचीत जाती म्हणजे SC कॅटेगरी मध्ये मोडण्यार्‍या शेतकर्‍यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. शेळीपालण हे या योजनेचे नाव आहे या साठी तुम्हाला ७५% अनुदान हे  सरकार कडून  मिळणार आहे आणि उर्वरित २५% तुम्हाला भरायचे आहे. . परंतु या साठी काही अटी सुद्धा आहेत त्या अटींची पूर्तता तुम्हाला करणे आवश्यक आहे, त्या अटी पुढील प्रमाणे दिल्या आहेत.

कोणत्या अटी आहेत?

१) सर्वात महत्वाची अट म्हणजे अर्जदार हा अनुसूचीत जाती प्रवर्गात म्हणजेच SC कॅटेगरी चाच असावा.

२) अर्जदारणे किंवा त्याच्या कुटुंबातील सदस्याने या योजनेचा लाभ या आधी घेतलेला नसावा.

३) अर्जदाराची पंचायत समिति कडे कुठल्याही प्रकारची थकबाकी नसावी.

४) अर्जदाराला १ मे २००१ ते २८ फेब्रुवारी २०२१ पर्यन्त तिसरे अपत्य नसावे.

५) अर्जदार हा दरिद्ररेषेखालील असावा.

अश्या प्रकारे वरील काही अटी आहेत त्याची पूर्तता अर्जदारणे पूर्ण करणे आवश्यक आहे.

सादर योजने मध्ये ३% आरक्षण हे अपंगासाठी राखीव आहे व ३०% आरक्षण हे महिलांसाठी आहे. उर्वरित सर्व आरक्षण हे सर्वसाधारण अनुसूचीत जाती साठी असेल. 

अर्ज कसा करावा?

१) तुमच्या कडे सात-बारा व आठ अ असणे आवश्यक आहे.

२) अर्ज घेऊन तो भरून त्याला आवश्यक कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे.

३) अर्जाचा नमूना हा तुमच्या पंचायत समितीच्या पशूसंवर्धन विभागात उपलब्ध आहे.

४) सर्वात महत्वाचे म्हणजे अर्ज करण्याची शेवटची तारीख ही २८ फेब्रुवारी आहे.

आपल्याला आणखी काही माहिती हवी असल्यास खाली कमेन्ट करा किंवा तुमच्या पंचायत समितीच्या   पशूसंवर्धन विभागाला भेट द्या.

मित्रांनो, माहिती आवडली असल्यास आपल्या मित्रांसोबत नक्कीच शेअर करा. आणि अश्याच प्रकारे दररोज नव-नवीन माहिती मिळवण्यासाठी आजच आमच्या Telegram चॅनल ला जॉइन व्हा.




Tags :- शेळीपालन योजना २०२१, शेळीपालन योजना माहिती, शेळीपालन योजना ऑनलाइन अर्ज 

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.