या तारखेला येईल किसान सन्मान निधि चा ८ वा हप्ता

 नमस्कार शेतकरी मित्रांनो, किसान सन्मान निधि योजनेच्या ८ व्या हप्त्याची आपण आतुरतेने वाट पाहत असाल, सर्वांनाचा उत्सुकता असेल की केव्हा येईल ८ व हप्ता ? तर आजच्या पोस्ट मध्ये आपण हे पाहणार आहोत की किसान सन्मान निधि योजनेचा ८ वा हप्ता केव्हा येईल कृपया ही पोस्ट शेवट पर्यन्त वाचा आणि आवडली तर नक्कीच आपल्या इतर शेतकरी बांधवांना सुद्धा शेअर करा.

देशातल्या करोडो अल्पभूधारक शेतकर्‍यांना मदत मिळवी या उद्देशाने आपले पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी फेब्रुवारी २०१९ ला किसान सन्मान निधि ही योजना सुरू केली, या योजने ला डिसेंबर २०१८ लाच पूर्ण देशात प्रभावी रूपात लागू केले होते. या योजने नुसार अल्पभूधारक शेतकरी बांधवांना दरवर्षी ६००० रुपये आर्थिक मदत देण्याचे ठरवले आहे.

हेही वाचा – महाभूलेख । अश्या प्रकारे पाहता येईल ऑनलाइन डिजिटल ७/१२

तुम्ही पण या योजनेचा लाभ घेत असाल तर आम्ही आपल्याला सांगू इच्छितो की PMKISAN पोर्टल वर प्रदर्शित केलेल्या आकड्या नुसार आज पर्यन्त म्हणजे फेब्रुवारी २०२१ ११ कोटी  ६१ लाख शेतकरी बांधवांनी या योजने साठी रजिस्ट्रेशन केलेले आहे.

प्रधान मंत्री किसान सन्मान निधि योजने नुसार दिल्या जाणारी २००० रुपयाची मदत ही आज पर्यन्त ७ हप्त्यात शेतकर्‍यांना मिळाली आहे. आणि ८ वा हप्ता हा लवकरच शेतकर्‍यांच्या खात्यात जमा होणार आहे. 

हेही वाचा – शेतातून जाणारे रस्ते रोकल्यास होऊ शकते कारवाई

कोणत्या तारखेला येईल ८ वा हप्ता? 

प्रधान मंत्री किसान सन्मान निधि योजने अंतर्गत दरवर्षी ६००० रुपयाची मदत ही दर ३ महिन्यांनी शेतकर्‍यांच्या बँक खात्यात जमा केली जाते. या योजने नुसार पहिला हप्ता हा १ एप्रिल ते ३१ जुलै, दूसरा हप्ता १ ऑगस्ट ते ३० नोव्हेंबर आणि तिसरा हप्ता हा १ डिसेंबर ते ३१ मार्च च्या मधात वितरित केल्या जातो. आज पर्यन्त मिळालेल्या सर्व हप्त्यांची माहिती ही आही खाली दीलेली आहे, 

 हेही वाचा –  ह्या योजनेसाठी जिल्हा परिषद देत आहे ७५% अनुदान – लवकर अर्ज करा

पीएम किसान योजनेचा हप्ता

हप्ता जमा होण्याची वेळ

पहिला हप्ता

फेब्रुवारी २०१९

दूसरा हप्ता

एप्रिल २०१९

तिसरा हप्ता

ऑगस्ट २०१९

चौथा हप्ता

जानेवारी २०२०

पाचवा हप्ता

१ एप्रिल २०२०

सहावा हप्ता

९ ऑगस्ट २०२०

सातवा हप्ता

२५ डिसेंबर २०२०

आठवा हप्ता

१ ते ७ एप्रिल २०२१ (अंदाजे)

तर मित्रांनो वरील प्रकारे निरीक्षण केले असता असे आढळते की प्रधान मंत्री किसान सन्मान निधि योजनेचा ८ व हप्ता हा १ ते ७ एप्रिल २०२१ या कलावधीत शेतकर्‍यांच्या बँक खात्यात जमा होऊ शकतो, परंतु आपल्याला माहितीच आहे की सध्या करोना विषाणू मुळे लॉकडाउन ची परिस्थिति निर्माण झालेली आहे. त्यामुळे या मध्ये थोडा वेळ सुद्धा लागू शकतो परंतु शेतकरी मित्रांनो निश्चिंत रहा लवकरच प्रधान मंत्री किसान सन्मान निधि योजनेचा ८ वा हप्ता तुमच्या बँक खात्यात जमा होईल.

मित्रांनो, माहिती आवडली असल्यास आपल्या मित्रांसोबत नक्कीच शेअर करा. आणि अश्याच प्रकारे दररोज नव-नवीन माहिती मिळवण्यासाठी आजच आमच्या Telegram चॅनल ला जॉइन व्हा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.