Cow Dung Paint – गावात कंपनी सुरु करुन मोठी कमाई करा – सरकार शेणापासून रंग बनवण्यासाठी प्रशिक्षण देणार

 केंद्रीय मध्यम व लघू उद्योग मंत्रालय शेणापासून रंग COW DUNG PAINT करण्यासाठी प्रोत्साहन देण्याच्या तयारीत आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा प्रत्येक गावामध्ये शेणापासून रंग बनवण्याचा उद्योग सुरु करण्याचा प्रयत्न आहे. शेणापासून वेगवेगळे रंग बनवण्यासाठी आणि त्यासाठी एक प्लांट उभारण्यासाठी 15 लाखांचा खर्च येतो.जर नितीन गडकरीं यांचे स्वप्न पूर्ण झाले तर गावातून शहराकडे रोजगारासाठी वाढणारा लोंढा हा कमी होऊ शकतो. (Business opportunity to start cow dung paint factory in your village by investment 15 lakh)


हे ही वाचा- केळीपासून चिप्स बनवून कमवा लाखो ! जाणून घ्या किती येतो खर्च आणि लागणार्‍या साधनांची माहिती

 

शेणापासून बनवलेला रंग लाँच झाला Cow Dung Paint

नितीन गडकरी यांनी 12 जानेवारी 2021 ला खादी व ग्रामोद्योग आयोगानं शेणापासून बनवलेल्या पेंटचे लॉंच केले होते. त्यावेळी नितिन गडकरी यांनी हा रंग इकोफ्रेंडली, विष रहित आहे असे म्हटले होते. भारतीय प्रमाणीकरण संस्थेकडून शेणापासून बनवलेल्या रंगाला प्रमाणित सुद्धा करण्यात आलं आहे. मध्यम व लघू मंत्रालयाच्या अधिकाऱ्यानं सांगितलेल्या माहितीनुसार नितीन गडकरी यांनीच शेणापासून रंग बनवण्यासाठी प्रेरणा दिली होती. जयपूर येथील कुमरप्पा नॅशनल हँडमेड पेपर इनस्टिट्यूटने शेंनापासून रंग बनवण्याचे पेटंट मिळवले आहे. शेणामध्ये शिसे, पारा, क्रोमियम, आर्सेनिक आणि कॅडमियम याचा वापर केला आहे.

जयपूरमध्ये होणार प्रशिक्षण


नितीन गडकरी यांनी सांगितलेल्या माहितीनुसार पर्यावरणस्नेही रंगांची बाजारात खूप मागणी वाढली आहे.सध्या जयपूरमध्ये प्रशिक्षण देणे चालू आहे. या प्रशिक्षणासाठी अनेक जण प्रतीक्षेत आहेत. 350 जण प्रतीक्षा यादीत असल्याची देखील माहिती आहे. हे प्रशिक्षण फक्त 7 दिवसांचे असेल. आगामी काळात ट्रेनिंगमधील सुविधा आपण वाढवू अस श्री.नितिन गडकरी म्हणाले. यामुळे गावा-गावातील लोक शेणापासून रंग बनवण्याची कंपनी निर्माण करु शकतात.


‘शेणापासून पेंट तयार करणार’ Cow Dung Paint


“शेणापासून पेंट तयार करायचं, ही एक नवीनच योजना आहे. आणि शेणापासून ऑईलपेंट आणि डिस्टम्बर तयार केलं जाणार. विशेष म्हणजे मार्केटमध्ये जितके पेंट आहेत त्यापेक्षा हा पेंट चांगला असणार आहे. नितिन गडकरी म्हनाले की मी स्वत: माझ्या घरी हे पेंट लावलं आहे. मी तुम्हा सगळ्यांना सांगतो, तुम्हीदेखील हाच पेंट वापरा. आता तर या पेंटसाठी वेटिंगलिस्ट सुरु झालीय. विशेष म्हणजे 550 रुपयांचं पेंट अवघं 225 रुपयांत मिळेल”, अशी माहिती त्यांनी दिली.

हेही वाचा- या उन्हाळ्यात सुरू करा आरओ वाटर प्लांटचा व्यवसाय आणि लाखोंमध्ये कमवा

‘पेंटसाठी शेणाला 5 रुपये किलो भाव मिळणार’

“प्रत्येक गावात एक 15 लाखांची एक पेंटची फॅक्ट्री असावी, असं माझं स्वप्न आहे. पेंटसाठी जे शेण असेल त्याला 5 रुपये प्रती किलो भाव मिळणार. माझ्या घरी 25 जनावरं आहेत. गाय, बैल, म्हैस इत्यादि आहेत. मला त्यातून कमीतकमी 300 किलो शेण मिळेल. त्यातून मला 1500 रुपये दररोजचे मिळतील. आणि जर फक्त 1500 रुपये शेणाचे मिळतील तर 30 दिवसात तब्बल 45 हजार रुपये फक्त शेणातून मिळतील. ज्याच्याकडे दोन-तीन गाय, म्हैस आहेत त्यांना आठ-दहा हजार रुपये महिन्याचे फक्त शेणापासून मिळतील. मग कोण गरीब राहील? सगळ्यांना रोजी रोटी मिळेल”, असं नितीन गडकरी यावेळी म्हणाले.

शेतकऱ्यांची कमाई वाढणार

शेणापासून बनवलेल्या पेंटची विक्री वाढल्यानंतर प्रत्येक गावामध्ये शेणाची खरेदी केली जाईल. त्यामुळे शेतकऱ्यांना वर्षाकाठी 30 हजार रुपये शेणाच्या विक्रीतून मिळू शकतील. सध्या शेतकरी शेणाचा खत म्हणून वापर करतात. मात्र, रंगाच्या कंपन्या निर्माण झाल्यानंतर हे चित्र पुर्णपणे बदलणार आहे.


मित्रांनो, माहिती आवडली असल्यास आपल्या शेतकरी मित्रांसोबत नक्कीच शेअर करा. आणि अश्याच प्रकारे दररोज नव-नवीन माहिती मिळवण्यासाठी आजच आमच्या Telegram चॅनल ला जॉइन व्हा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.