खरीप हंगामासाठी बियाणांच्या किमती वाढवू नका – कृषिमंत्री दादाजी भुसे

 नमस्कार शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी महबीजला खरीप हंगामात बियाणांच्या किमती न वाढवण्याचे निर्देश दिले आहेत.

Krushimantri Dadaji Bhuse
Krushimantri Dadaji Bhuse

या वर्षीच्या खरीप हंगामासाठी राज्यातील शेतकऱ्यांना सोयाबीनसह अन्य पिकांचे गुणवत्तापूर्ण बियाणे पुरविताना त्यांची किमतीत वाढ करू नका, असे निर्देश कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी महाबीजला दिले आहेत. पालेभाज्यांचे बियाणे निर्मितीमध्ये सुद्धा महाबीजने मार्गक्रमण करावे, अशी सूचना दादाजी भुसे यांनी दिली. मंत्रालयात कृषिमंत्री श्री दादाजी भुसे यांच्या अध्यक्षतेखाली या वर्षीच्या खरीप हंगामासाठी बियाणे नियोजनाची बैठक पार पडली. यावेळी कृषी सचिव एकनाथ डवले सुद्धा उपस्थित होते.

राज्यात एकूण १ कोटी ४१ लाख हेक्टर खरीप क्षेत्र

राज्यात खरीप हंगामाचे एक कोटी 41 लाख 94 हजार हेक्टर क्षेत्र असून ज्वारी, बाजरी, भात, मका, तूर, मुग, उडीद, भूईमूग, सोयाबीन, कापूस हे प्रमुख पीके या क्षेत्रात घेतल्या जातात. राज्यात बियाणे बदल दरानुसार 16 लाख 67 हजार क्विंटल बियाण्यांची गरज असून महाबीज, राष्ट्रीय बीज निगम आणि खासगी कंपन्याच्या माध्यमातून बियाणे पुरविले जातात. राज्यामध्ये सोयाबीनचे क्षेत्र 42 लाख 22 हजार 165 हेक्टर आहे. त्यासाठी 31 लाख 66 हजार क्विंटल सोयाबीन बियाणांची आवश्यकता आहे. सोयाबीन बियाण्यांची कमतरता भासू नये यासाठी राज्यशासनामार्फत शेतकऱ्यांना स्वत:कडील बियाणे वापरण्याबाबत आवाहन केले गेले. त्याचा परिणाम म्हणून शेतकऱ्यांकडे स्वत:चे सुमारे 20 लाख क्विंटल बियाणे उपलब्ध असल्याचे कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी यावेळी बैठकीत सांगितले.

दादाजी भुसे कडून खरीप हंगामाच्या नियोजनाचा आढावा

कृषीमंत्री दादा भुसे यांनी यावेळी खरीप २०२१ हंगामाचे नियोजन करताना हेक्टरी बियाण्यांची आवश्यकता तसेच बीज उत्पादक कंपन्यांनी केलेले नियोजन याबाबतचा आढावा घेतला आहे. बियाणे विक्रीनंतर त्यासंदर्भात ट्रॅकींग यंत्रणा तयार करावी. त्यामध्ये पुरवठा, विक्री आणि उपलब्धता अशा प्रकारे बियाण्यांची माहिती उपलब्ध होईल, आणि अश्या प्रकारची यंत्रणा १ एप्रिलपर्यंत तयार केली जावी, असे निर्देश महाराष्ट्र राज्याचे कृषि मंत्री श्री दादाजी भुसे यांनी यावेळी दिले.

हेही वाचा – शेतकर्‍यांसाठी राज्यात स्थापन होणार दहा हजार कंपन्या

४२ लाख हेक्टर कापूस लागवडीचे क्षेत्र

सोयाबीनपाठोपाठ राज्यात कापसाचे क्षेत्रदेखील मोठ्या प्रमाणावर आहे सुमारे ४२ लाख हेक्टर एवढ्या मोठ्या क्षेत्रावर कापसचे पीक घेतल्या जाते. राज्यामध्ये सध्या 1 कोटी 60 लाख पाकीट बीटी कापूस बियाणे उपलब्ध असल्याचे यावेळी सांगण्यात आले. पारंपरिक बियाण्यांसोबतच भाजीपाल्याच्या वाणाकडे महाबीजने लक्ष द्यावे. पालेभाज्या बियाणे निर्मितीचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर हाती घ्यावा. त्यासाठी कृषी विद्यापीठांच्या बीज गुणन केंद्र आणि रोपवाटिकांच्या जागांचा वापर करावा, असे निर्देशही दादाभुसे यांनी यावेळी दिले.

सोयाबीन बियानांच्या बाबत तक्रार होणार नाही याची काळजी घ्यावी

मागच्या वर्षी सोयाबीन बियाण्यांबाबत लोकांकडून तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यातून बोध घेऊन या वर्षी बियाण्यांच्या उगवण क्षमतेबाबत तक्रार येणार नाही. बियाण्यांची कुठलीही कमतरता न भासता वाजवी दरात ते शेतकऱ्याला उपलब्ध व्हावे, यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन कृषीमंत्र्यांनी केले.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.