हे उद्योग करा दुप्पटीने नफा मिळेल

  नमस्कारशेतकरी मित्रांनो, कृषियोजना.इन वर आपले स्वागत आहे. खुपशे असे उद्योग homemade business ideas in marathi आहेत जे आपल्याला दुप्पटीने नफा मिळवून देऊ शकतात आणि महत्वाचे म्हणजे हे उद्योग आपण घरीच अगदी कमी खर्चात सुरू करू शकतो. त्या साठी लागणारे भांडवल सुद्धा सहज घरी उपलब्ध असू शकते किंवा ते अगदीच कमी दरात आपल्याला मिळू शकते. आजच्या पोस्ट मध्ये आपण असेच काही उद्योग पाहणार आहोत ते तुम्ही घरी सुरू करून खूप नफा कमवू शकता. (homemade business ideas in marathi)

Homemade business ideas in marathi

आम्ही या आधीच – या होळीला सुरू करा रंगाचा व्यवसाय आणि लखो कमवा   या बद्दल लिहिले आहे तुम्ही ते येथे क्लिक करून वाचू शकता.  तसेच शेंनापासून रंग बनवण्याचा उद्योग सुद्धा तुम्ही घरी सुरू करू शकता त्या बद्दल तुम्ही येथे क्लिक करून वाचू शकता.

हेही वाचा – ग्राम उजाला योजना – फक्त १० रुपयात मिळेल LED बल्ब

तर मित्रांनो खाली काही उद्योग दिले आहेत ते तुम्ही घरी अगदी कमी खर्चात सुरू करू शकता.

१) मेणबत्ती बनवण्याचा उद्योग


मेणबत्ती बनवण्याचा उद्योग

आपल्याला माहितीच आहे की सजावटीसाठी तसेच धार्मिक ठिकाणी मेणबत्तीचा वापर नेहमी केला जाते. तुम्ही तुमच्या घरीच हा मेणबत्ती बनवण्याचा उद्योग सुरू करू शकता. प्रथम तुम्हाला मेणापासून मेणबत्ती बनवण्याचे तंत्र  असते हे शिकाव लागेल. तुम्ही मेणबत्ती कशी बनवायची ह्याचे शिक्षण घेतल्या नंतर वेगवेगळ्या प्रकारच्या मेणबत्त्या बनवून जवळ च्या दुकाना मध्ये तसेच ऑनलाइन सुद्धा तुम्ही विकू शकता. घरगुती मेणबत्ती बनवण्याचा व्यवसाय करण्यासाठी साधारण १५ ते २० हजार रुपये खर्च येतो व या व्यवसाया मध्ये १५ ते ३० टक्के नफा तुम्हाला मिळू शकतो. बचत गटा द्वारे सुद्धा तुम्ही हा व्यवसाय सुरू करू शकता. 

२) केक बनवण्याचा उद्योग


केक बनवण्याचा उद्योग

केक आणि बेकरी च्या उत्पादनांची मागणी सतत वाढत आहे. वाढदिवसाचे कार्यक्रम असले की केक अति आवश्यक असतो तुम्हाला फक्त पिठात प्रयोग करायला आवडत असेल, तर बेकरीचा व्यवसाय सहजपणे घरीच सुरू केला जाऊ शकतो. आपला व्यवसाय रोलिंगमध्ये आणण्यासाठी फक्त आवश्यक असलेले थोडेफार कौशल्य आणि उपकरणांमध्ये थोडीफार गुंतवणूक करणे आवश्यक आहे. महिलांसाठी हा उद्योग अतिउत्तम ठरू शकतो. तुम्ही केक कसा बनवायचा या साठी यूट्यूब चा आधार घेऊ शकता. म्हणजे तुम्हाला कुठ शिकायला जाण्याची सुद्धा गरज नाही. 

३) दाल मिल उद्योग


दाल मिल उद्योगछोट्या दाल बनवण्याच्या मशीन ची किंमत ही साधारणत: 55000 रुपये आहे परंतु शासनाच्या योजनांच्या माध्यमातून शेतकरी अर्थसहाय्य मिळवू शकतात. दाल मिल उद्योग अतिशय कमी जागेत उभारता येवू शकतो यामध्ये विजेच्या सिंगल फेज वर चालणारी 3.0 HP ची  मोटार असते दिवसाला साधारणपणे आठ ते दहा क्विंटल डाळ प्रक्रिया करण्याची क्षमता मिनी डाळ मिल मध्ये असते या मध्ये तुम्हाला साधारणत: ३०% पर्यन्त नफा मिळू शकतो.या द्वारे तुम्ही हरभरा,तुर,मुग,उडीद इत्यादी पासून डाळ बनवू शकता.४) हळदीचा उद्योग


हळदीचा उद्योग


हळद हे एक शेतकर्‍यांसाठी अत्यंत महत्वाचे नगदी पीक म्हणून ओळखल्या जाते. हळदीचा कालावधी हा साधारणत: ९ ते १० महिन्यांचा असतो. हळदीचे उत्पादन हे प्रती हेक्टर ३५०-४०० क्विंटल पर्यन्त होऊ शकते. याला लागणारा खर्च सुद्धा येवडा जास्त नसतो त्यामुळे या पासून तुम्ही भरपूर नफा मिळवू शकता. 


५) मशरूम शेती


मशरूम शेती


कमी जागेत तुम्ही हा व्यवसाय सुरू करू शकता, आणि भांडवल सुद्धा येव्हडे लागत नाही मशरूम शेती सुद्धा नगदी पीक समजले जाते कमी वेळेत जास्त नफा मिळवायचा असेल तर मशरूम ची शेती हा योग्य पर्याय ठरू शकतो.


६) फळ आणि भाजीपाला उद्योग


फळ आणि भाजीपाला उद्योगतुम्हाला लॉकडाउन च्या काळात भाजीपाल्याचे महत्व कळलेच असेल. १० रुपयांना मिळणारी वस्तु ही ५० रुपयाला आपल्याला विकत घ्यावी लागली. फळ आणि भाजीपाला उद्योग हा कमी वेळेत खूप नफा तुम्हाला मिळवून देऊ शकतो. तुमच्या कडे जर शेती नसेल आणि तरी सुद्धा तुम्हाला हा व्यवसाय सुरू करायचा असेल तर तुम्ही ठोक विक्रेत्या कडून विकत घेऊन सुद्धा सुरुवात करू शकता.


 हेही वाचा – महाभूलेख । अश्या प्रकारे पाहता येईल ऑनलाइन डिजिटल ७/१२

 हेही वाचा – शेतातून जाणारे रस्ते रोकल्यास होऊ शकते कारवाई

 हेही वाचा – महाभूलेख । अश्या प्रकारे पाहता येईल ऑनलाइन डिजिटल ७/१२

 हेही वाचा – किसान सन्मान निधि योजेनेचा लाभ घेणर्‍या शेतकर्‍यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी
तर मित्रांनो वरील काही उद्योग आहेत त्याची सुरुवात तुम्ही करू शकता. पीएन कुठलाही व्यवसाय सुरुकरण्याआधी त्याची पूर्ण माहिती तुम्हाला असणे गरजेचे आहे. आम्ही फक्त या पोस्ट च्या माध्यमातून तुम्हाला एक प्रकारे कल्पना दिली. 


मित्रांनो, माहिती आवडली असल्यास आपल्या मित्रांसोबत नक्कीच शेअर करा. आणि अश्याच प्रकारे दररोज नव-नवीन माहिती मिळवण्यासाठी आजच आमच्या Telegram चॅनल ला जॉइन व्हा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.