कांदा आनेल शेतकर्‍यांच्या डोळ्यात पाणी – कांद्याचे दर ५०० रुपयांपर्यंत घसरले

 देशातील किरकोळ बाजारपेठेत कांद्याचे दर हे २५ रुपये प्रती किलोपर्यंत खाली आले आहेत. Onion Rates Markets Maharashtra

onian rates in maharashtra

देशातील किरकोळ बाजारपेठेत कांद्याचे दर हे 25 रुपये प्रती किलोपर्यंत खाली आले आहेत तसेच महागाईला तोंड देणाऱ्या ग्राहकांसाठी ही दिलासा देणारी बातमी आहे.रब्बी हंगामातील कांदा बाजारपेठेत आल्यामुळे कांद्याचे दर कमी झाले आहेत. भारतातील सर्वात मोठं कांदा उत्पादक राज्य असणाऱ्या महाराष्ट्रातील कोल्हापूरमध्ये बाजार समितीमध्ये कांद्याचे दर हे 500 रुपये क्विंटलपर्यंत घसरला आहे. कांद्याचे दर घसरल्यानं शेतकरी अडचणीत आला आहे. शेतकऱ्यांनी एका किलो कांद्यांचे उत्पादन घेण्यासाठी 15 रुपये खर्च येतो असं सांगितलं जाते.

राष्ट्रीय कृषी बाजार नुसार महाराष्ट्रातील कांद्यांच्या प्रमुख बाजारपेठांमध्ये कांद्याचे दर घसरल्याच सांगतिलं. वैजापूर येथील कांद्याचा किमान दर 750 रुपये प्रती क्विंटल होता. तेलंगणातील सदाशिवपेट मार्केटमध्ये कांद्याचा दर हा 1139 रुपये होता. फरीदाबाद मार्केटमध्ये कांद्याचे दर 1500 रुपये तर राजस्थानच्या उदयपूरच्या मार्केटमध्ये 1300 रुपये इतका दर कांद्यांला सध्या मिळत आहे.

चारही बाजूंनी शेतकरीच संकटात

महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे अध्यक्ष भारत दिघोले यांनी कांद्याचे दर पडल्यानमुळे शेतकऱ्यांचं नुकसान झाल्याचं सांगतिले. पहिल्यांदा कांद्याचे बीज दर 2500 रुपये किलो ने मिळायचे. आता ते 5 हजार ते 6 हजार रुपयांपर्यंत खरेदी करावं लागते. अवकाळी पावसामुळे कांद्याचे नुकसान झालं आहे. जानेवारी,फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात गारपीट झाली त्यामुळे कांद्याला जोरदार फटका बसला असं भारत दिघोले म्हणाले.

कांदा उत्पादक शेतकऱ्यांना केंद्र आणि राज्य सरकारनं मदत करावी, अशी मागणी भारत दिघोले यांनी केली आहे. बाजारसमितीत कांद्याची आवक वाढल्यानं काद्यांचे दर घसरले असल्याच त्यांनी स्पष्ट केले.

देशातील कांदा उत्पादन

यंदा भारतात कांद्याचं उत्पादन जास्त झालं असून त्याची दुसर्‍या देशात निर्यात करण्यात येत आहे. 2018-19 मध्ये 22.82 मिलियन कांदा उत्पादित झाला होता. 2020-21 मध्ये कांद्याचं उत्पादन 26.09 मिलियन टन होण्याचा अंदाज आहे. 2018-19 मध्ये 14,31,000 हेक्टरवर कांद्याची शेती झाली होती. 2020-21 मध्ये यामध्ये वाढ झाली 15,95,000 हेक्टवर कांदा लागवड झाली होती.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.