इफकोकडून नॅनो यूरिया लॉंच : शेतकर्‍यांचे पैसे वाचणार | Iffco Launch Nano Liquid Urea

नुकताच इफकोनं शेतकऱ्यांसाठी नॅनो लिक्विड यूरिया (Nano Liquid Urea) लाँच केला आहे. इफकोच्या 50 व्या वार्षिक बैठकीत नॅनो लिक्विड यूरिया लाँचिंग करण्यात आले. सामान्य यूरियाची मागणी 50 टक्केहून कमी करण्यासाठी नॅनो लिक्विड यूरिया चे लाँचिगं करण्यात आहे. नॅनो लिक्विड यूरिया शेतकऱ्यांना लिक्विडच्या स्वरुपात उपलब्ध होईल. नॅनो यूरियाच्या 500 मिलीमध्ये 40 हजार पीपीएम नायट्रोजन असतो. त्यामुळे यूरीयाच्या 50 किलोच्या बॅग इतकी पोषणतत्वे यामाध्यमातून पिकांना मिळतील. | Iffco Nano Urea

Nano Liquid Urea
Nano Liquid Urea


नॅनो यूरियाची किंमत |
Nano Urea Price

नॅनो लिक्विड यूरिया हे स्वदेशी तंत्रज्ञानाच्या आधारावर तयार करण्यात आला असून कलोल येथील नॅनो जैवतंत्रज्ञान संशोधन संस्थेमध्ये नॅनो लिक्विड यूरिया ची निर्मिती करण्यात आली आहे. नॅनो यूरिया शेतकऱ्यांना येणार्‍या मंगळवार पासून उपलब्ध होईल. नॅनो लिक्विड यूरियाची 500 मिली बॉटल 240 रुपयांना उपलब्ध होणार आहे. सामान्य यूरियाच्या दहा टक्के किमतीला शेतकऱ्यांना नॅनो यूरिया उपलब्ध होईल. नॅनो यूरियाच्या वापरासाठी शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

अलीकडच्या काळात रासायनिक खतांच्या किमती झपाट्याने वाढत आहेत. या काळात तसेच भविष्यात नॅनो यूरिया हा शेतकऱ्यांसाठी सामान्य यूरियाला चांगला पर्याय ठरणार आहे. बॉटलमध्ये द्रवरुपात नॅनो यूरिया उपलब्ध झाल्यानं वाहतुकीचा खर्चावर देखील आळा बसेल. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी देखील नॅनो यूरियाचा वापर फायेदशीर ठरेल.

हे पण वाचा – Hydroponic Technology 

हे पण वाचा – निंभोळी अर्क तयार करण्याची सोपी पद्धत

९४ पिकांवर यशस्वी चाचणी

राष्ट्रीय कृषी संशोधन प्रणालीच्या अंतर्गत 20 ICAR, देशातील कृषी विद्यापीठे तसेच कृषी विज्ञान केंद्रांमध्ये 43 पिकांवर चाचणी करण्यात आली. यानंतर संपूर्ण भारतातील पिकांवरील परिणामकारकता तपासण्यासाठी 94 पिंकावर यशस्वीरीत्या चाचणी करण्यात आली. नॅनो यूरियाच्या वापरामुळे पिकांच्या उत्पन्नात 8 टक्के वाढ नोंदवण्यात आली आहे.

नॅनो यूरियाची निर्मिती आत्मनिर्भर भारत, आत्मनिर्भर शेती यांच्या अंतर्गत करण्यात आली आहे. इफको नॅनो लिक्विड यूरिया पिकांवर प्रभावी ठरला आहे. नॅनो यूरियाचा जमिनीतील पाण्याची गुणवत्ता सुधारण्यासाठी देखील फायदा होणार आहे. Global Warming कमी करण्यासाठी देखील नॅनो यूरिया प्रभावी ठरणार आहे. शेतकऱ्यांनी नॅनो यूरियाचा वापर केल्यास मातीची गुणवत्ता सुधारण्यास देखील मदत होईल. नॅनो यूरियामुळे पिकांची गुणवत्ता वाढवण्यास देखील शेतकर्‍यांना मदत होणार आहे.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.