किसान क्रेडिट कार्ड वर घेतलेल्या कर्जाची 30 जून पूर्वी परतफेड करा अन्यथा बसेल फटका

केंद्र सरकारनं किसान क्रेडिट कार्डद्वारे घेतलेले पैसे परत करण्यासाठी मुदत ही 30 जूनपर्यंत वाढवली होती. ही मुदत संपण्यासाठी फक्त अवघे पाच दिवस शिल्लक राहिले आहेत. (Kisan Credit Card Loan)

kcc

{tocify} $title={Table of Contents}

केंद्र सरकारनं किसान क्रेडिट कार्डद्वारे घेतलेले पैसे परत करण्यासाठी मुदत ही 30 जूनपर्यंत वाढवली होती. ही मुदत संपण्यास फक्त अवघे पाच दिवस राहिले आहेत. ज्या शेतकऱ्यांनी किसान क्रेडिट कार्डवरुन पैसे घेतले असतील त्यांना कोणत्याही परिस्थिती मध्ये ते 30 जूनपूर्वी परत करावे लागतील. जे शेतकरी किसान क्रेडिट कार्ड वरील घेतलेली रक्कम परत करणार नाहीत त्यांना ती रक्कम 3 टक्के अधिक व्याजानं परत करावी लागेल. केंद्रातील मोदी सरकारनं कोरोना संकटामुळे किसान क्रेडिट कार्ड वर घेतलेली रक्कम परत करण्याची मुदत वाढवली होती.

किसान क्रेडिट कार्डवर घेतलेलं कर्ज हे दरवर्षी 31 मार्चपूर्वी व्याजासह परत करावं लागते. त्यानंतर शेतकऱ्यांना नवीन कर्ज मिळते. किसान क्रेडिट कार्डवरील कर्जावर केंद्र सरकारकडून व्याज माफी देखील देण्यात येत असते. 30 जूनपर्यंत कर्जाची रक्कम जमा केल्यानंतर शेतकऱ्यांना 3 किंवा 4 जुलैपर्यंत व्याज परतावा मिळू शकतो. किसान क्रेडिट कार्डवरील कर्ज व्यापारी बँका, सहकारी बँका आणि प्रादेशिक ग्रामीण बँकांकडून घेतलं जातं.

कोरोना मुळे कर्ज परतफेड करण्यासाठी मुदतवाढ

भारतात कोरोना विषाणू संसर्ग सुरु झाल्यानंतर मार्च 2020 मध्ये लॉकडाऊन सुरू करण्यात आलं होतं. कोरोना आणि लॉकडाऊनमुळं प्रत्येक क्षेत्राला खूप मोठा फटका बसला आहे. केंद्र सरकारनं यामुळे किसान क्रेडिट कार्डवरील कर्ज परत करण्याची मुदत 31 मार्चवरुन 31 मे पर्यंत वाढवली होती. त्यानंतर आता ही मुदत 30 जूनपर्यंत वाढवण्यात आली आहे.

किसान क्रेडिट कार्ड कर्जावरील व्याज

किसान क्रेडिट कार्डद्वारे शेतकऱ्यांना 3 लाख रुपयांपर्यंतचं कर्ज 9 टक्के व्याजानं मिळतं. केंद्र सरकार कडून यावर 2 टक्के सूट मिळते. वेळेत कर्ज फेड केल्यास 3 टक्के आणखी सूट मिळते. शेतकऱ्यांना या प्रकारे किसान क्रेडिट कार्डद्वारे 4 टक्के व्याजदरानं कर्ज मिळत असते.

किसान क्रेडिट कार्ड साठी लागणारे कागदपत्र

वेगवेगळ्या बँका केसीसीसाठी अर्जदाराकडे वेगवेगळी कागदपत्रे मागतात, परंतु काही मूलभूत कागदपत्रे अर्जदाराकडे असणे आवश्यक आहे. आधार कार्ड, पॅनकार्ड, मतदार ओळखपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स असावेत.  याशिवाय अर्जासाठी अर्जदाराचा पासपोर्ट फोटोदेखील आवश्यक आहे.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.