महादेव गोविंद रानडे: Mahadev Govind Ranade

 महादेव गोविंद रानडे (Mahadev Govind Ranade) यांची माहिती (Information in Marathi). महादेव गोविंद रानडे यांचा जन्म 18 जानेवारी 1842 मध्ये नाशिक जिल्ह्यात निफाड या गावी झाला. त्यांचे कुटुंब भारद्वाजगोत्री चित्पावन ब्राह्मण होते. महादेव गोविंद रानडे यांची संपूर्ण माहिती (Mahadev Govind Ranade Family Information) आपण. Justice Mahadev Govind Ranade

Mahadev Govind Ranade Information In Marathi

{tocify} $title={Table of Contents}

कौटुंबिक पार्श्वभूमी

महादेव गोविंद रानडे यांच्या आईचे नाव गोपिकाबाई होते आणि त्यांच्या वडिलांचे नाव गोविंद रानडे होते. महादेव गोविंद रानडे लहान असतांनाच त्यांच्या आईचे निधन झाले. नंतर त्यांचे वडील गोविंद रानडे यांनी दुसरे लग्न केले. आणि स्वत: महादेव रानडे व त्यांच्या बहिणीचे लग्न हे बालविवाह होते.

शिक्षण

रानडे यांचे प्राथमिक शिक्षण कोल्हापूरला झाले. (तिथेच ते इंग्रजी शिकले). 1856 मध्ये ते शिक्षणासाठी मुंबईला आले (मुंबईत त्यांनी एल्फिस्टन हायस्कूल मध्ये शिक्षण घेतले). 1858 मध्ये त्यांनी  एल्फिस्टन कॉलेज मध्ये प्रवेश घेतला. 1862 मध्ये त्यांनी इतिहास व अर्थशास्त्र विषयात बीए ची पदवी घेतली. 1865 मध्ये त्यांनी एलएलबी पूर्ण केले. महादेव गोविंद रानडे यांनी विद्यार्थी दशेत खूप एसझेड एचझेडएन केले.

हे पण वाचा – गोपाळ हरी देशमुख यांच्या संपूर्ण जीवन प्रवास {alertInfo}

नोकरी

रानडेंनी त्यांचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ओरीएंटल ट्रान्स्ललेटर म्हणून 2 वर्षे काम केले. 1868 मध्ये ते एल्फिस्टन महाविद्यालयात इतिहास व इंग्रजी चे प्राध्यापक झाले. 1871 साली ते Advocate ची परीक्षा पास झाले. 1879 मध्ये ते सरकारी न्यायालयात कनिष्ठ न्यायाधीश झाले. 1885 मध्ये त्यांची मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून निवड झाली. 1885 मध्ये त्यांची मुंबई कायदे कौन्सिलर कायद्याचे सल्लागार पडी निवड. 1890 ते 1893 या कलावधीत ते पुन्हा मुंबई प्रांताच्या कौन्सिल चे सदस्य झाले.

न्यायमूर्ती रानडे यांचा जीवन प्रवास

संपूर्ण नाव महादेव गोविंद रानडे
टोपण नाव न्यायमूर्ती रानडे
जन्म 18 जानेवारी 1842
विभाग  मराठी बायोग्राफी
मृत्यू 16 जानेवारी 1901
वडील महादेव रानडे
आई गोपिकाबाई
पत्नी रमाबाई रानडे

वाङ्मयीन कार्य

  • ग्रँड डफ च्या इतिहासाच्या चुका निदर्शनास आणण्यासाठी – Rise of the Maratha Power म्हणजे मराठी सत्तेचा उदय हा ग्रंथ लिहिला.
  • मिसलेनियस राईटिंग ऑफ मिस्टर जस्टिस रानडे
  • Ages in Indian Economics by M.G.Ranade हा ग्रंथ लिहिला
  • 1878 मध्ये सार्वजनिक सभेची सुरुवात केलेल्या नियतकालिकात रानडे यांनी 17 वर्षे लेख लिहिले.
  • 1862 मध्ये इंदुप्रकाश चे संपादक म्हणून काम पहिले.

महादेव गोविंद रानडे यांचे लेख

  • देवस्थांची व्यवस्था 
  • सेंट्रल एशियन क्वेस्चन (मध्य आशियाचा प्रश्न)
  • देशी संस्थांनांचा कारभार 
  • इलबर्ट बिल 
  • मुंबई प्रांताच्या प्रशासकीय सुधारणा
1848 मध्ये स्थापन झालेल्या ज्ञानप्रसारक सभा पुढे रानडे यांनी पुढील निबंध सादर केले. 
  • मराठी राजेराजवाडे 1860
  • तरुण शिकलेल्या लोकांची कर्तव्ये
  • प्रजावृद्धीचे दुष्परिणाम 1864 
  • मराठी व बंगाली लोकांच्या भावी उटकरशाची चिन्हे व तुलना.
इत्यादि लेख आणि ग्रंथाचे लिखाण महादेव गोविंद रानडे यांनी केले.

वसंत व्याख्यानमाला 1875

वसंत व्याख्यान माला महादेव गोविंद रानडे यांनी सुरू केली, त्यात अनेक विद्वानांनी व्याखाने दिली. 1885 मध्ये पदवीधर मंडळ स्थापन झाले. या मंडळापुढे त्यांनी आमचे पदवीधर लवकर का मरतात? यावर व्याख्यान दिले. या व्याख्यानपूर्वी त्यांनी 400 पदवीधरांना पत्रे पाठविली, त्यातील 140 जणांनी उत्तरे पाठविली. त्या आधारे त्यांनी वरील करणे दिली.

मराठी ग्रंथोतेजक मंडळी

रानडे यांनी याच्या स्थापणात पुढाकार घेतला. इतिहास, शास्त्रे, देशाची सुधारणा, उपयुक्त कथा आणि धर्माच्या संदर्भातील पुस्तके प्रसिद्ध करणे हा संस्थेचा उद्देश होते. 

प्रार्थना समाजाची स्थापना

31 डिसेंबर 1867 मध्ये मुंबईत केशवचंद्र सेन यांच्या पुढाकारातून  प्रार्थना समाजाची स्थापना झाली. (आत्माराम तरखडकर यांच्या घरी). मुंबईतील गिरगावात समाजाने स्वत:ची इमारत बांधली. समाज स्थापन करण्यासाठी प्रेरणा ब्रम्हो समाजाकडून घेतली. समाजातील कार्यकर्त्यांवर ख्रिश्चन धर्म व पाच्यात्य विचारांचा प्रभाव निर्माण झाल्याने प्रार्थना समाज हिंदू धर्म सुधारणावादी पंथ म्हणून पुढे प्रचारात आला. love of god, in the service of man – हे प्रार्थना समाजाचे घोषवाक्य होते.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.