महाराष्ट्रात दमदार पावसाची शक्यता : महाराष्ट्र हवामान अंदाज | Maharashtra Weather Update

महाराष्ट्रात आज सुद्धा विविध जिल्ह्यांमध्ये पाऊस हजेरी लावेल, असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. | Maharashtra Weather Update

Maharashtra Weather Update
Maharashtra Weather Update

मान्सूनचा पाऊस शनिवारीच महाराष्ट्रात (Maharashtra Monsoon) दाखल झाला असून त्यानंतर राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. भारतीय हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रात आज सुद्धा पाऊस हजेरी लावणार आहे. महाराष्ट्रातील उत्तर कोकण किनारपट्टीच्या भागात आज पाऊस होण्याची दाट शक्यता आहे. उत्तर कोकण किनारपट्टी भागातील रायगड, पालघर, ठाणे आणि मुंबईत ढगांच्या गडगडाटासह पाऊस होऊ शकतो. 

  हवामान तज्ञ के.एस. होसाळीकर यांचं ट्विट

  पालघर मध्ये सुद्धा पावसाची हजेरी

  पालघर जिल्ह्यात अनेक ठिकाणी पावसानं हजेरी लावली आहे.काही भागात दमदार तर काही भागात पावसाची संततधार सुरू होती. सकाळपासून पावसाने अचानक हजेरी लावल्याने नागरिकांची उकाड्या पासून सुटका झाली. | Maharashtra Weather Update

  कोकण तसेच पश्चिम महाराष्ट्रात पाऊस

  भारतीय हवामान विभागानं 4 जून रोजी वर्तवलेल्या अंदाजानुसार संपूर्ण राज्यामध्ये बहुतेक ठिकाणी गडगडासहित पावसाची शक्यता आहे. ठाणे, रायगड, दक्षिण कोकण, पुणे, कोल्हापूर,सातारा, सांगली जिल्ह्यामध्ये आजही जोरदार पाऊस होण्याची शक्यता दाट आहे.

  शनिवारीच मान्सून महाराष्ट्रात दाखल

  मान्सून पाऊस शनिवारी कोकणात दाखल झाला होता. त्यानंतर मान्सून राज्यभरात वेगाने आगेकूच करत आहे. कोकण परिसरात मान्सून अलिबागपर्यंत पोहोचला आहे. पुण्यातही रविवारी मान्सूनचे आगमन झाले होते. मान्सूनचा सध्याचा वेग पाहता तो अपेक्षेपेक्षा लवकर राज्य व्यापेल, असा अंदाज हवामान विभागान वर्तविला आहे. राज्यातील बहुतांश शेतकरी हे शेतीसाठी मान्सूनच्या पावसावर अवलंबून असतात. त्यामुळे मान्सूनच्या आगमनाने शेतकरी सुखावले आहेत. मान्सून राज्यात दाखल झाल्याने आता शेतीच्या कामांना वेग आला आहे.

  मान्सून सरासरी पेक्षा 101 टक्के बरसणार

  भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार मान्सून 3 जूनला केरळमध्ये दाखल झाला आहे. भारतीय हवामान विभाग म्हणजेच आयएमडीने यंदाचा मान्सून सरासरीच्या 101 टक्के असेल असा अंदाजानुसार यंदा मान्सून सामान्य राहणार आहे. यंदा पाऊस सरासरीच्या 101 टक्के पाऊस होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. 96 टक्के ते 104 टक्क्यांपर्यंतच्या पावसाला सामान्य मान्सून म्हटलं जातं

  Leave a Comment

  This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.