शेतकर्‍यांवर दुबार पेरणीचे संकट? : Maharashtra Weather Report

 महाराष्ट्रातील बर्‍याच शेतकर्‍यांची पेरणी झाली आहे, परंतु पेरणी होऊन सुद्धा पावसाचा पत्ता नाही त्या मुळे जगाचा पोशिंदा म्हणजेच शेतकरी राजा संकटात आला आहे. Maharashtra Weather Report

Maharashtra Weather Report
Maharashtra Weather Report


{tocify} $title={Table of Contents}

राज्यातील शेतकऱ्यांवर संकटाची मालिका सुरुच आहे. गेल्यावर्षी खरीप आणि रब्बी दोन्ही हंगामात गेलेली पिकं, कोरोनामुळे पडलेले शेतमालाचे भाव आणि झालेल्या नुकसानीचं ओझं घेऊन यंदा शेतकऱ्यांनी खरीप पेरणी केली तर खरी… पण पावसानं शेतकर्‍यांना पुन्हा दगा दिला. आणि शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट आलं आहे. पेरलेलं बी बियाणं गेलं तसेच खतही वाया गेली या संकटात पान्हावलेल्या डोळ्यांनी शेतकरी सरकारकडे तसेच आभाळाकडे आस लावून बसला आहे.

दुबार पेरणीचे संकट?

राज्यात अपेक्षेपेक्षा लवकर मान्सून दाखल झाला. सर्वदूर पावसाला सुरुवात सुद्धा झाली आणि बळीराजा पेरणीच्या कामाला लागला. कुणी उसनवारी करुन, तर कुणी कर्ज काढून तर काहींनी आपल्या पत्नीचे दागिने गहाण ठेवून मोला महागाईचे बियाणं आणलं आणि पेरणीचं सौंग साजरं केले. पण पाऊसच गायब झाला आणि शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट आलं. राज्यातील कोकण, औरंगाबाद, पुणे, नागपूर, अमरावती सर्वच महसूल विभागात कुठे ना कुठे दुबार पेरणीचं संकट आहे. त्यामुळे जगाचा पोशिंदा हवालदील झाला आहे. महाराष्ट्र हवामान अंदाज

सरासरी पेक्षाही कमी पाऊस

राज्यात आतापर्यंत सरासरी 40 टक्क्यांच्या जवळपास खरीप पिकांची लागवड झाली आहे. यात सर्वाधिक 56 टक्के सोयाबीनची पेरणी झाली आहे, त्यापाठोपाठ 47 टक्क्यांच्या वर कापूस लागवड झाली आहे. पण बऱ्याच भागात गेल्या 12 ते 15 दिवसांपासून पावसानं दांडी मारली आणि शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट आलं. राज्यात मान्सून दाखल झाल्यानंतर काही जिल्ह्यात आणि बऱ्याच तालुक्यात सरासरी इतकाही पाऊस पडलेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट ओढवलं आहे. काय कराव हे शेतकर्‍यांना सुचेनास झाल आहे.

जून अखेर पावसाची टक्केवारी

तालुक्याची संख्या  –  पावसाची टक्केवारी

1 तालुका                     0 ते 25 टक्के पाऊस
09 तालुके                   20 ते 50 टक्के पाऊस
25 तालुके                   50 ते 75 टक्के पाऊस
34 तालुके                   75 ते 100 टक्के पाऊस
286 तालुके                100 टक्क्यांपेक्षा जास्त पाऊस

राज्यात जून अखेरपर्यंत पडलेल्या पावसाची टक्केवारी पाहली असता राज्यातील 35 तालुक्यात जून महिन्यात सरासरी पेक्षा ७५ टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झाला आहे. यातील नंदुरबार, नाशिक, धुळे, गडचिरोली आणि अकोला जिल्ह्यातील परिस्थिती खूपच चिंताजनक आहे. राज्यात धान, कापूस आणि सोयाबीन ही खरीपातली प्रमुख पिकेआहेत. मान्सूनच्या सुरुवातीच्या पावसामुळे शेतकऱ्यांनी पेरणीला सुरुवात केली. राज्यात जून अखेरपर्यंत झालेल्या पेरणीत सोयाबीन आणि धानाचं म्हणजेच तांदळाच सर्वाधिक क्षेत्र आहे. पावसात खूप मोठा खंड पडल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट ओढवलं. त्यामुळे चिंतातूर शेतकऱ्यांच्या डोळ्यात पुन्हा एकदा अश्रूंचा महापूर आला आहे.

शेतकरी मित्रांनो, माहिती आवडली असल्यास नक्कीच शेअर करा आणि अश्याच नवनवीन ताज्या माहिती साठी आम्हाला टेलिग्राम वर जॉइन करा. {alertSuccess}

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.