भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना 2024: ऑनलाईन अर्ज आणि संपूर्ण माहिती, Falbag Lagwad Yojana 2024

भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना 2024-25 भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना 2023 Bhausaheb Fundkar Falbag Lagwad Yojana 2024 Falbag Lagwad Yojana 2024 Online Form फळबाग लागवड योजना महाराष्ट्र Falbag Lagwad Anudan Yojana 2024 Maharashtra Mahadbt Yojana 2024

सन २०१८-१९ पासून महाराष्ट्र राज्यात Bhausaheb Fundkar Falbag Lagwad Yojana 2024 सुरु करण्यात आली आहे. या योजनेमध्ये केंद्र शासनाच्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतर्गत जे लाभार्थी फळबाग लागवड बाबीचा लाभ घेऊ शकत नाही, त्यांना लाभ देण्यात येणार आहे. सदर योजना शासनाच्या कृषी विभागामार्फत राबविली जात आहे. या पोस्ट मध्ये आम्ही तुम्हाला भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना 2024 विषयी संपूर्ण माहिती जसे की या योजनेसाठी पात्रता, कागदपत्रे, ऑनलाइन अर्ज कसा करायचा या बद्दल सविस्तर सांगणार आहोत, विनंती आहे की हे पोस्ट शेवट पर्यंत वाचावी.

Bhausaheb Fundkar Falbag Lagwad Yojana 2024

महाराष्ट्र सरकारने सन 2018 पासून Bhausaheb Fundkar Falbag Lagwad Yojana 2023-2024 सुरू केली आहे. या योजनेच्या माध्यमातून वेगवेगळ्या शेती विषयक योजनांना प्राधान्य देण्यात येते, आणि त्या साठी राज्य सरकार कडून अनुदान देखील देण्यात येते.

भाऊसाहेब फुंडकर योजना अनुदान 2024

भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना मध्ये भाग घेणाऱ्या शेतकऱ्यांना मंजूर अनुदान पहिल्या वर्षी ५०%, दुसऱ्या वर्षी ३०% आणि तिसऱ्या वर्षी २०% अश्या तीन वर्षात देण्यात येणार असून लाभार्थी शेतकऱ्याने दुसऱ्या व तिसऱ्या वर्षीच्या अनुदानाचा लाभ घेण्यासाठी लागवड केलेल्या झाडांचे जीविताचे प्रमाण बागायती झाडांसाठी ९०% तर कोरडवाहू झाडांसाठी ८०% ठेवणे आवश्यक आहे. हे प्रमाण कमी झाल्यास शेतकऱ्याने स्वखर्चाने झाडे आणून पुन्हा जिवंत झाडांचे प्रमाण विहित केल्याप्रमाणे राखणे आवश्यक आहे. तरच राज्य सरकारकडून शेतकर्‍यांना अनुदान देण्यात येईल.

कृषी यांत्रिकीकरण योजना

या योजनेत भाग घेण्यासाठी शेतकरी कोंकण विभागात कमीत कमी १० गुंठे तर जास्तीच जास्त १० हे. आणि इतर विभागात कमीत कमी २० गुंठे तर जास्तीच जास्त ६ हे. क्षेत्र मर्यादेत लाभ घेऊ शकतो. तसेच महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतर्गत पात्र लाभार्थांना प्रथम त्या योजनेतील निकषाप्रमाणे लाभ घेणे आवश्यक आहे, उर्वरित क्षेत्रासाठी (वरील क्षेत्र मर्यादेच्या अधीन राहून) लाभार्थी या Bhausaheb Fundkar Falbag Lagwad Yojana चा लाभ घेऊ शकतात. अल्प, अत्यल्प भूधारक, महिला आणि दिव्यांग शेतकऱ्यांना फळबाग लागवड योजनेत प्राधान्य देण्यात येईल.

भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना 2024 अंतर्गत लाभार्थ्याना ठिबक सिंचन संचाच्या उभारणीकरीता राज्य सरकार कडून 100 टक्के अनुदान देण्यात येईल. तसेच आणखी कोणत्या फळपिकासाठी किती अनुदान मिळेल याची माहिती तुम्ही खाली पाहू शकता.

Falbag Lagwad Yojana Key Points

योजना भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड अनुदान योजना
विभाग महाराष्ट्र सरकार
सुरुवात 2018-19
लाभार्थी महाराष्ट्र राज्यातील शेतकरी

अनुदान वितरित करण्याचे निकष

Bhausaheb Fundkar Falbag Lagwad Yojana 2024 अंतर्गत लाभर्थ्यांना 50:30:20 या प्रमाणात तीन वर्षामध्ये अनुदान देण्यात येईल. उदाहरणार्थ जर तुम्ही आंबा या पिकासाठी कलमे 10×10 मीटर वर लागवड केल्यास तुम्हाला खालील प्रमाणात अनुदान मिळेल.
 • 7/12 वर फळबाग लागवडीची नोंद करुन घेण्याची जबाबदारी ही लाभ घेण्यार्‍या शेतकर्‍यांची राहील.
 • लाभार्थी शेतकर्‍यांनी  लावलेली फळझाडे पहिल्या वर्षी कमीत कमी 80 टक्के व दुसर्‍या वर्षी कमीत कमी 90 टक्के जगवणे आवश्यक आहे.
 • लाभार्थी शेतकर्‍यांना अनुदानाची रक्कम ही त्याच्या आधार जोडलेल्या बँक खात्यात सरकार कडून जमा करण्यात येईल.

शेतात ठिंबक सिंचन बसवणे अनिवार्य

तुम्हाला जर Bhausaheb Fundkar Falbag Lagwad Yojana 2024 चा लाभ घ्यायचा असेल सर्वात आधी तुम्हाला ठिंबक सिंचन बसवणे अनिवार्य आहे त्या शिवाय तुम्हाला भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेचा लाभ मिळणार नाही. ठिंबक सिंचन संचा साठी तुम्हाला 100 टक्के अनुदान देखील मिळेल.

फळझाड लागवडी साठी मुदत

भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना 2024 फळझाड लागवडी साठीचा कालावधी हा 31 मे ते 30 नोव्हेंबर पर्यंत राहील. आणि Bhausaheb Fundkar Falbag Lagwad Yojana 2024 चा लाभ घेण्यासाठी शेतकर्‍यांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करणे अनिवार्य आहे.

Falbag Lagwad Yojana 2024 अंतर्गत समाविष्ट पिके

भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना 2024 अंतर्गत बहुवार्षिक फळपिकांचा समावेश शासनाने केला आहे. खाली आम्ही महाराष्ट्रातील कृषि विद्यापीठाने शिफारस केलेल्या पिकांची यादी देत आहे. तुमची जर इच्छा असेल तर तुम्ही यादीतील पिकांचे उत्पादन घेऊ शकता.

1) पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला

फळपीक लागवड योजना 2021

2) महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी

फळबाग लागवड योजना 2021

3) वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ परभणी

फळबाग लागवड योजना 2021

भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना 2024 साठी पात्रता

Bhausaheb Fundkar Falbag Lagwad Yojana 2024 साठी राज्य सरकारने पात्रता निश्चित केल्या आहेत, अर्जदार जर पात्रतेचे सर्व निकष पूर्ण करत असेल तरच तो फळबाग लागवड योजना 2024 साठी पात्र ठरेल.
 • लाभार्थ्यास फळबाग लागवडीसाठी ठिबक सिंचन संच शेतात बसवणे बसविणे अनिवार्य आहे.
 • सर्व प्रवर्गाअंतर्गत ज्या शेतकऱ्यांच्या कुटुंबाची उपजीविका केवळ शेतीवर अवलंबून आहे त्यांना प्रथम प्राधान्य देण्यात येईल व त्यानंतर अन्य शेतकऱ्यांचा विचार करण्यात येईल. (कुटुंबाची व्याख्या: पती, पत्नी, व अज्ञात मुले)
 • लाभ वैयक्तिक शेतकऱ्यांना देण्यात येईल. संस्थात्मक शेतकर्‍यांना कोणताही लाभ मिळणार नाही.
 • शेतकऱ्यास स्वतःच्या नावावर ७/१२ असणे आवश्यक आहे.
 • संयुक्त मालकी असल्यास इतर खातेदारांच्या संमतीने शेतकऱ्यास स्वतःच्या हिश्याच्या मर्यादेत लाभ घेता येईल.
 • ७/१२ वर कुळाचे नाव असल्यास कुळाची संमती आवश्यक आहे.
 • परंपरागत वन निवासी (वन अधिकार मान्यता)अधिनियम २००६ नुसार वनपट्टे धारक शेतकरी लाभ घेण्यास पात्र आहेत.
 • इतर शासकीय योजनेतून फळबाग लागवड केली असल्यास ते क्षेत्र वगळून वरील विभागानुसारच्या क्षेत्र मर्यादेत शेतकऱ्यास लाभ घेता येईल.

फळबाग लागवड योजना 2024 साठी आवश्यक कागदपत्रे

 • ७/१२ व 8-अ उतारा
 •  हमीपत्र
 • संयुक्त खातेदार असल्यास सर्व खातेदारांचे संमतीपत्र
 • जातीचे प्रमाणपत्र (अनु.जाती/अनु.जमातीशेतकऱ्यांसाठी)

Bhausaheb Fundkar Falbag Lagwad Yojana 2024 Online Application

तुम्ही जर भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड अनुदान योजना 2024 साठी अर्ज करण्यास इच्छुक असाल तर खाली आम्ही ऑनलाइन अर्ज कसा करायचा ते संगितले आहे, तुम्ही आमच्या स्टेप्स फॉलो करून ऑनलाइन अर्ज करू शकता.

 • सर्वात आधी तुम्हाला राज्य सरकारच्या अधिकृत वेबसाइट वर जावे लागेल.
 • वेबसाइट वर तुमच्या समोर मुखपृष्ठ उघडेल, त्यावर तुम्हाला ऑनलाइन अॅप्लिकेशन या लिंक वर क्लिक करावे लागेल,
 • नंतर तुम्हाला कोणत्या योजनेसाठी अर्ज करायचा आहे त्या वर क्लिक करावे लागेल जसे की तुम्हाला भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड अनुदान योजना 2024 या लिंक वर क्लिक करायचे आहे.
 • लिंक वर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर ऑनलाइन अर्ज उघडेल.
 • ऑनलाइन अर्जामध्ये विचारलेली संपूर्ण माहिती तुम्हाला व्यवस्थित भरावी लागेल.
 • माहिती भरून झाल्यानंतर तुम्हाला सबमिट या बटन वर क्लिक करावे लागेल.

महत्वाच्या लिंक्स

शेतकरी मित्रांनो, वरील प्रकारे तुम्ही फळबाग अनुदान योजना 2024 साठी ऑनलाइन अर्ज करू शकता. तुम्हाला Bhausaheb Fundkar Falbag Lagwad Yojana 2024 विषयी आणखी काही माहिती हवी असेल तर आम्हाला कमेन्ट विचारा, तुमची नक्कीच मदत केल्या जाईल.

1 thought on “भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना 2024: ऑनलाईन अर्ज आणि संपूर्ण माहिती, Falbag Lagwad Yojana 2024”

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.