Mahabhulekh: भूमी अभिलेख ऑनलाइन 7/12, Digital Signature 7/12 Online Maharashtra

Mahabhulekh 7/12 in Marathi | Bhumi Abhilekh Maharashtra Online 7/12 | Mahabhulekh Nakasha | Mahabhulekh Ferfar | Mahabhulekh Aapli Chavdi | भूमी अभिलेख महाराष्ट्र | Online Satbara | digital signature 7 12 online maharashtra

महाराष्ट्रातील शेतकार्‍यांसाठी जमिनी संबंधी माहिती व जमीन नोंदी म्हणजेच ऑनलाइन सातबारा (Online Satbara) उपलब्ध करुन देण्यासाठी Mahabhulekh म्हणजेच महाराष्ट्र भूमी अभिलेख नावाचे पोर्टल राज्य सरकारने सुरू केले आहे. या पोर्टलच्या माध्यमातून पुणे, नाशिक, औरंगाबाद, नागपूर, कोकण आणि अमरावती या प्रशासकीय विभागातील सर्वच जिल्ह्यातील आणि गावातील सातबारे राज्य सरकारकडून उपलब्ध करून दिले आहेत.

पोर्टलच्या मदतीने आपल्याला या प्रमुख ठिकाणांचा भू-नकाशा (MahaBHU Naksha), ऑनलाइन भूमी अभिलेख मिळू शकेल तसेच  खतौनी क्रमांक, खेवात नंबर, खासरा क्रमांक इत्यादी बद्दल सर्व माहिती मिळू शकेल. आणि आजच्या लेखात  आम्ही तुम्हाला महाभुलेखेशी संबंधित सर्वच माहिती सांगणार आहोत, तरी विनंती आहे की हा लेख शेवटपर्यंत वाचावा. (digital signature 7 12 online maharashtra)

शेळी पालन अनुदान योजना 2024

Mahabhulekh Online Satbara Maharashtra 2024

पुणे, नाशिक, औरंगाबाद, नागपूर, कोकण आणि महाराष्ट्रातील अमरावती या प्रशासकीय विभागात राहणार्‍या नागरीकांना जमिनीशी संबंधित माहिती व भूमी अभिलेख इत्यादी उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने “महाभुलेख” (Mahabhulekh Portal) नावाचे पोर्टल सुरू केले आहे. महाराष्ट्र राज्यातील जमिनीबद्दल जाणून घ्यायचे असेल तर कोणालाही या पोर्टलच्या माध्यमातून सर्व जमीन संबंधित माहिती ऑनलाइन मिळू शकेल. महाभुलेख पोर्टलच्या माध्यमातून राज्यातील शेतकर्‍यांना जमिनीशी संबंधित माहितीच मिळणार आहे जसे की Digital Satbara, Online Satbara आणि Satbara Utara त्यामुळे राज्यातील शेतकर्‍यांना नेहमी-नेहमी सरकारी कार्यालयात जाण्याची गरज राहणार नाही घरी बसूनच ते आपल्या शेती विषयी संपूर्ण माहिती ऑनलाइन पद्धतीने मिळवू शकतील.

Maharashra Satbara Utara Online

महाभूलेख पोर्टल च्या माध्यमातून राज्य सरकार कडून शेतकर्‍यांना शेती संबंधित सर्व माहिती उपलब्ध देण्यात आली आहे, तुम्ही Online Satbara, पाहू शकता तसेच ऑनलाइन 8 अ देखील पाहू शकता, तसेच तुम्ही डाऊनलोड करून त्यांची प्रिंट सुद्धा घेऊ शकता पण लक्षात ठेवा की महाभूलेख वर उपलब्ध करून दिलेला Maharashtra Online Satbara, 8A, Digital Satbara सरकारी कामा साठी वैध नसतील तुम्ही पण वैयक्तिक कामा साठीच याचा वापर करू शकता.
योजना महाभूलेख
राज्य महाराष्ट्र
लाभार्थी महाराष्ट्रातील नागरिक
विभाग महाराष्ट्र कृषी विभाग
अधिकृत वेबसाइट येथे क्लिक करा

भूमी अभिलेख महाराष्ट्र पोर्टल चा उद्देश

महा भूमी अभिलेख पोर्टल हे राज्यातील शेतकर्‍यांना ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र सरकार ने सुरू केले आहे, ज्यावेळेस Mahabhulekh Portal नव्हते तेव्हा राज्यातील लोकांना जमीन संबंधित कागदपत्रे जसे की, Online Satbara, Online 8A तसेच जमिनीचा नकाशा या साठी सरकारी कार्यालयांना फेर्‍या घालाव्या लागल्या, त्यामध्ये शेतकर्‍यांचा खूपच वेळ जात होता आणि वेळेवर काम सुद्धा होत नव्हते या अडचणी लक्षात घेता आणि या समस्यांवर मात करण्यासाठी राज्य सरकारने महाभूलेख पोर्टल विकसित केले आहे. आणि या महाभुलेख पोर्टलच्या सहाय्याने जमीनीशी संबंधित सर्व माहिती राज्यातील नागरिक ऑनलाइन पाहु शकतात, ज्यामुळे त्यांचा वेळ वाचतो तसेच Digital India चा एक उपक्रम म्हणून देखील तुम्ही महाभूलेख पोर्टल कडे पाहू शकता.

मुख्यमंत्री सौर कृषि पंप योजना 2021

महाभूलेख पोर्टल चे फायदे

 • official website mahabhulekh 7-12 च्या माध्यमातून महाराष्ट्रातील शेतकर्‍यांना राज्य सरकार कडून ऑनलाइन सातबारा, जमिनीच्या नोंदी उपलब्ध करून दिल्या जात आहेत.
 • शेतकर्‍यांना सातबारा काढण्यासाठी सरकारी कार्यालयात जाण्याची गरज आता राहली नाही, तुम्ही घरी बसूनच 7/12 mahabhulekh portal च्या माध्यमातून Online Satbara काढू शकता तसेच Online Satbara Download करून त्याची प्रिंट देखील काढू शकता आणि वेग-वेगळ्या कामांसाठी त्याचा उपयोग घेऊ शकता.
 • इंटरनेट च्या माध्यमातून तुम्ही Maharashtra Satbara Portal ला भेट देऊ शकता. महाराष्ट्र Satbara Portal वर सातबारा पहाण्यासाठी किंवा डाऊनलोड करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जात नाही.

महाभूलेख पोर्टल वर सातबारा कसा पाहायचा

जर तुम्ही ऑनलाइन सातबारा किंवा शेतीचा नकाशा शोधत आहात तर आम्ही तुम्हाला खाली संगितले आहे की Mahabhumi Portal वर ऑनलाइन सातबारा कसा पाहायचा आणि डाऊनलोड करायचा.

 • ऑनलाइन सातबारा पहाण्यासाठी सर्वात आधी तुम्हाला Maharashtra Satbara Online Portal ↗️ वर जावे लागेल.
 • Mahabhulekh पोर्टल वर गेल्यानंतर तुमच्या समोर मुखपृष्ठ उघडेल.
 • मुखपृष्ठावर तुम्हाला विभाग निवडा असा पर्याय दिसेल तुम्हाला त्या पर्यायावर क्लिक करून तुमचा प्रशासकीय विभाग निवडा लागेल.
 • प्रशासकीय विभागाची निवड केल्यानंतर तुमच्या समोर जिल्हा निवडा असा पर्याय असेल, त्या वर क्लिक करून तुम्हाला जिल्ह्याची निवड करावी लागेल.
 • जिल्हा निवडी नंतर लगेच तुम्हाला तुमचा तालुका निवडून गाव निवडावे लागेल.
 • नंतर तुमच्या समोर नवीन पर्याय उघडेल या पर्यायामध्ये तुम्हाला तुमचं सर्वे नंबर/गट नंबर, किंवा नाव असा पर्याय निवडावा लागेल. आणि तुमचं सर्वे नंबर टाकून सबमिट बटन वर क्लिक करावे लागेल.
 • पुढच्या पृष्ठावर तुम्हाला तुमचा चालू स्थितीत असलेला मोबाइल क्रमांक टाकून खाली दिलेला Captcha Code भरावा लागेल आणि पुन्हा सबमिट या बटन वर क्लिक करावे लागेल.
 • नंतर तुमच्या समोर एक नवीन पृष्ठ उघडेल या पृष्ठावर तुम्ही तुमच्या शेती विषयी संपूर्ण माहिती पाहू शकता.

प्रशासकीय विभाग जिल्हा अधिकृत लिंक
अमरावती अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ येथे क्लिक करा
नागपुर नागपुर, भंडारा, वर्धा, चंद्रपुर, गडचिरोली, गोंदिया येथे क्लिक करा
औरंगाबाद औरंगाबाद, जालना, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, बीड, परभणी येथे क्लिक करा
पुणे पुणे, सातारा, सोलापूर, सांगली, कोल्हापूर येथे क्लिक करा
नाशिक नाशिक, अहमदनगर, जळगाव, धुळे, नंदुरबार येथे क्लिक करा
कोकण पालघर, ठाने, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मुंबई, येथे क्लिक करा

Maharashtra Land Record App Download

Maharashtra Land Record App Download डाऊनलोड करण्यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाइल मध्ये असलेल्या Google Play Store ला ओपन करावे लागेल. नंतर सर्च बार मध्ये Maharashtra Land Record App Download असे सर्च करावे लागेल नंतर इंस्टॉल बटन वर क्लिक करून तुम्ही Maharashtra Land Record App Download करू शकता.

किसान सन्मान निधि लिस्ट 2021

Digital Satbara Mahabhumi डाऊनलोड कसा करायचा

राज्य सरकारच्या नवीन नियमांनुसार Digitally Verified म्हणजेच ज्या सरकारी कागदपत्रावर डिजिटल सिग्नेचर असेल ते सर्वच सरकारी कामांसाठी चालेल. महाराष्ट्र सरकार ने नुकतेच Digital Signed Satbara Portal लॉंच केले आहे या पोर्टल च्या माध्यमातून तुम्ही Digitally Signed असलेले सातबारा किंवा 8 अ काढू शकता त्यासाठी तुमच्या कडून 20 रुपयांपर्यंत शुल्क आकारले जाईल. Digital Satbara कसा काढायचा त्याबद्दल खाली आम्ही संगितले आहे.

 • Mahabhulekh Digital Satbara काढण्यासाठी सर्वात आधी तुम्हाला Mahabhumi Digital Satbara Portal ↗️ वर जावे लागेल. पोर्टल वर गेल्यानंतर तुमच्या समोर मुखपृष्ठ उघडेल.
 • मुखपृष्ठावर तुम्हाला New Registration या लिंक वर क्लिक करावे लागेल, म्हणजे Mahabhumi Digital Satbara Portal वर तुम्हाला सातबारा काढण्यासाठी खाते तयार करावे लागेल. एकदा खाते तयार झाले की तुम्ही कोणाचाही Digital Satbara काढू शकता.
 • New Registration वर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर नवीन पृष्ठ उघडेल, या पृष्ठावर तुम्हाला विचारलेली सर्व माहिती अचूक भरायची आहे.
 • संपूर्ण माहिती भरून झाल्यानंतर तुम्हाला Register Button वर क्लिक करावे लागेल.
 • त्या नंतर लगेच तुम्हाला ईमेल किंवा एसएमएस येईल त्यामध्ये Login ID आणि पासवर्ड असेल.
 • नंतर तुम्हाला Mahabhumi Digital Satbara Portal वर जाऊन Login ID आणि पासवर्ड टाकून लॉगिन करावे लागेल.
 • नंतर तुमच्या समोर तीन पर्याय उघडतील Digital 7/12, Digital 8A आणि Property Card या पैकी तुम्हाला हव्या असलेल्या पर्यायावर क्लिक करून तुम्ही तो डाऊनलोड करू शकता.

Mahabhumi Portal FAQ

Q. 1 महाराष्ट्रातील जमिनीची माहिती ऑनलाइन कशी तपासायची?

जर तुम्हाला तुमच्या जमिनीची माहिती ऑनलाइन पाहायची असेल तर तुम्हाला महाभुलेख पोर्टल वर जावे लागेल, महाभूलेख पोर्टलचा वापर करुन जमिनीची माहिती ऑनलाईन तपासण्याची प्रक्रिया या लेखात आम्ही सविस्तरपणे सांगितली आहे.

Q. 2 महाराष्ट्र भूमी नोंदीचे किती विभाग आहेत?

महाराष्ट्रचे सहा प्रशासकीय विभागात रूपांतर केले आहे म्हणून जमिनीच्या नोंदी सुद्धा सहा प्रशासकीय विभागात उपलब्ध करून दिल्या आहेत.

Q. 3 महाभूलेख पोर्टल वर आपण काय करू शकतो?

महाभूलेख पोर्टल च्या माध्यमातून सरकार ने शेतकर्‍यांसाठी ऑनलाइन जमिनीच्या नोंदी पाहण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे जेणे करून शेतकर्‍यांच्या सरकारी कार्यालयात जाण्याच्या फेर्‍या वाचतील.

मित्रांनो, माहिती आवडली असल्यास नक्कीच शेअर करा. आणि अश्याच प्रकारच्या नव-नवीन महितीसाठी आम्हाला टेलिग्राम वर जॉइन करा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.