(नवीन यादी) महाराष्ट्र रेशन कार्ड लिस्ट 2024: Online Ration Card List 2024 Maharashtra

Online Ration Card Maharashtra | Ration Card List Maharashtra 2024 | MH Ration Card | Online Ration Card Download Maharashtra 2024 | Ration Card Form Maharashtra Pdf | Mahafood Ration Card List 2024 | Ration Card Maharashtra in Marathi | Maharashtra Ration Card App

महाराष्ट्र रेशन कार्ड लिस्ट 2024 (Ration Card List) शी संबंधित सर्व सुविधा महाराष्ट्र शासनाने ऑनलाईन उपलब्ध करुन दिल्या आहेत. आज आम्ही तुम्हाला या लेखाद्वारे महाराष्ट्र रेशनकार्डशी संबंधित सर्व महत्वाची माहिती देणार आहोत. महाराष्ट्र रेशन कार्ड लिस्ट म्हणजे काय ?, महाराष्ट्र रेशनकार्ड लिस्ट पाहण्याची प्रक्रिया, त्याचे फायदे, उद्दीष्ट, वैशिष्ट्ये, पात्रता इ. तर मित्रांनो, महाराष्ट्र रेशनकार्ड लिस्ट 2024 शी संबंधित तुम्हाला संपूर्ण माहिती मिळवायची असेल तर आमचा हा लेख शेवटपर्यंत वाचावा.

हे नक्की वाचा – Aaple Sarkar Sewa Kendra

रेशन कार्ड यादी महाराष्ट्र 2024

खाद्य विभाग महाराष्ट्रातर्फे Maharashtra Ration Card List 2024 ऑनलाईन जाहीर करण्यात आली आहे. राज्यातील नागरिक आता घरी बसून महाफूड च्या अधिकृत संकेतस्थळावरून रेशन कार्ड यादीमध्ये आपले नाव तपासू शकतात. आता महाराष्ट्रातील ज्या सर्व नागरिकांनी रेशनकार्डसाठी अर्ज केले (Online Ration Card Application Maharashtra) आहेत त्यांना रेशन कार्ड यादीमध्ये त्यांचे नाव पाहण्यासाठी कोणत्याही सरकारी कार्यालयात भेट देण्याची गरज भासणार नाही. त्याला घरी बसून शिधापत्रिका यादीमध्ये त्याचे नाव पाहता येईल. दरवर्षी रेशन कार्ड यादीतील नावे लाभार्थीच्या वयाच्या आधारे महाराष्ट्र शासन अद्ययावत करतात. यावर्षीसुद्धा महाराष्ट्र सरकारने रेशनकार्ड यादी रेशनकार्ड लाभार्थ्यांची नावे अद्ययावत केली आहेत. अद्ययावत रेशनकार्ड यादी पाहण्याची प्रक्रिया आम्ही पुढे सांगितली आहे.

पीक विमा योजना ऑनलाइन नोंदणी 

Maharashtra APL and BPL Ration Card List 2024

रेशन कार्ड हे राज्य सरकारने दिलेला अधिकृत दस्तऐवज आहे. APL Ration Card, BPL Ration Card, AAY Ration Card अशी प्रत्येक राज्य सरकारतर्फे तीन प्रकारचे रेशन कार्ड दिले जातात. दारिद्र्य रेषेच्या वर येणा-या लोकांसाठी एपीएल रेशन कार्ड देण्यात आले आहे, दारिद्र्य रेषेखालील राहणार्‍या लोकांसाठी बीपीएल रेशन कार्ड जारी करण्यात आले आहे आणि त्या लोकांसाठी तृतीय एएवाय रेशन कार्ड देण्यात आले आहे. जे खूप जास्त गरीब आहेत.

Key Highlight of Maharashtra Ration Card List 2024

योजनेचे नाव महाराष्ट्र रेशन कार्ड यादी 2024
कोणी लॉंच केली महाराष्ट्र सरकार
लाभार्थी महाराष्ट्रातील नागरिक
उद्देश्य घरी बसून ऑनलाइन रेशन कार्ड यादी पहा
अधिकृत वेबसाइट येथे क्लिक करा
वर्ष 2024

महाराष्ट्र रेशन कार्ड 2024

रेशन कार्ड एक महत्त्वपूर्ण दस्तऐवज आहे ज्याद्वारे धान्य खरेदी करण्यासाठी जे पात्र आहेत त्यांना सरकार कडून अनुदानाच्या स्वरुपात धान्य उपलब्ध करून दिली जाते. महाराष्ट्र रेशनकार्ड 2024 साठी नागरिक संबंधित प्राधिकरणाच्या अधिकृत संकेतस्थळावरुन ऑनलाइन पद्धतीने अर्ज करुन लाभ घेऊ शकतात.राज्यातील ज्या लोकांना अद्याप रेशन मिळालेले नाही ते ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात, परंतु लक्षात घ्या ऑनलाइन अर्ज करत असतांना आपण त्या साठी पात्र आहोत की नाही हे तुम्हाला बघावे लागेल- गरीब जनतेच्या मदतीसाठी सरकार डीपीओमार्फत रेशनकार्डद्वारे रेशन वितरण स्वस्त दरात करत असते.

कुक्कुट पालन योजना ऑनलाइन अनुदान

लक्ष्यित सार्वजनिक वितरण प्रणाली

धान्याने नाव एएवाय बीपीएल एपीएल
गहू 3.00 3.00
तांदूळ 2.00 2.00
रुखरे दाने 1.00 1.00
साखर 20.00

महाराष्ट्रातील रेशन कार्डाचे प्रकार

महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्र रेशन कार्ड चे तीन प्रकारात विभाजन केले आहेत. लोकांची आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन ही विभागणी केली गेली आहे.

 1. एपीएल रेशन कार्ड: – दारिद्र्य रेषेच्या वर येणार्‍या सर्व लोकांना हे रेशन कार्ड देण्यात आले आहे. एपीएल रेशन कार्ड मिळविण्यासाठी तुमचे वार्षिक उत्पन्न ₹ 100000 किंवा त्यापेक्षा कमी असणे आवश्यक आहे. हे रेशन कार्ड पांढर्‍या रंगाचे आहे.
 2. बीपीएल रेशन कार्ड: –  दारिद्र्य रेषेच्या खाली येणार्‍या या सर्व लोकांना बीपीएल रेशन कार्ड दिले जाते. बीपीएल रेशन कार्ड मिळविण्यासाठी आपले वार्षिक उत्पन्न 15000ते ₹ 100000 दरम्यान असावे. हे रेशन कार्ड पिवळ्या रंगाचे आहे.
 3. अंत्योदय रेशन कार्ड: – अत्यंत गरीब असलेल्या सर्वांना अंत्योदय रेशन कार्ड दिले जाते. हे रेशन कार्ड केशरी रंगाचे असते. जे लोक आपला उदरनिवराह योग्य रित्या करू शकत नाहीत त्यांना हे कार्ड दिले जाते.

महाराष्ट्र रेशन कार्ड चे फायदे

 • रेशन कार्ड चा उपयोग ओळखपत्र म्हणून आपण करू शकतो.
 • हे एक दस्तऐवज आहे ज्यात तांदूळ, गहू, साखर, केरोसिन, तीळ इत्यादी अनुदानाची खाद्य सामग्री महाराष्ट्रातील नागरिकांना सवलतीच्या दरात राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत उपलब्ध करू दिल्या जाते.
 • परवडणार्‍या दराने धान्य मिळवून राज्यातील जनता आपले जीवन जगू शकेल.
 • आता शिधापत्रिका अर्जदार अधिकृत वेबसाइटवर भेट देऊन जिल्हावार, नावनिहाय व नवीन महाराष्ट्र रेशन कार्ड यादी डाउनलोड करू शकतात.
 • एपीएल, बीपीएल रेशन कार्डमुळे राज्यातील लोकांना अत्यल्प दरात खाद्यपदार्थ मिळू शकतात जेणेकरून त्यांच्यावरील आर्थिक भार कमी होऊ शकेल.

Maharashtra Ration Card Documents

 • आधार कार्ड
 • पॅन कार्ड
 • उत्पन्न प्रमाणपत्र
 • पासपोर्ट आकाराचा फोटो
 • गॅस कनेक्शन (असल्यास)
 • मोबाइल नंबर

महाराष्ट्र रेशन कार्ड यादी 2024 ऑनलाइन कशी पहायची?

तुम्हाला जर तुमचे रेशन कार्ड ऑनलाइन पहायचे असेल तर त्या साठी काही स्टेप्स फॉलो कराव्या लागतील नंतर तुम्ही ते पाहू शकता. त्या साठी आम्ही खाली काही स्टेप्स दिल्या आहेत.

 • सर्वात आधी तुम्हाला महाराष्ट्र सरकार च्या MAHAFOOD या अधिकृत वेबसाइट वर जावे लागेल. नंतर तुमच्या समोर महाफूड चे मुखपृष्ठ ओपन होईल.
 • मुखपृष्ठ ओपन झाल्या वर तुम्हाला Public Distribution System चे ऑप्शन दिसेल तुम्हाला त्या ऑप्शन वरती क्लिक करायचे आहे.
  Maharashtra-Ration-Card-List
 • ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर पुढचे पान तुमच्यासमोर उघडेल, या पानावर तुम्हाला रेशन कार्ड चा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा.
 • नंतर नवीन पेज ओपन होईल या पेज वर तुम्हाला District Wise Classification and Number of Ration Card Holder या वर क्लिक करावे लागेल.
 • वरील ऑप्शन वर क्लिक केल्या नंतर तुमच्या समोर Ration Card List Maharashtra 2024 ओपन होईल, अश्या प्रकारे तुम्ही रेशन कार्ड यादी 2024 (Maharashtra Ration Card List) ऑनलाइन पद्धतीने पाहू शकता.

Maharashtra Ration Card Details 2024

 • सर्वात आधी तुम्हाला Maharashtra Ration Card Details 2024 च्या अधिकृत वेबसाइट वर जावे लागेल. नंतर तुमच्या समोर मुखपृष्ठ ओपन होईल.
 • मुखपृष्ठावर तुम्हाला Online Services चा बॉक्स दिसेल या बॉक्स मध्ये तुम्हाला Online Fair Price Shops च ऑप्शन दिसेल त्या ऑप्शन वर क्लिक करा.
 • जस तुम्ही या ऑप्शन वर क्लिक कराल तस तुमच्या समोर नवीन पृष्ठ ओपन होईल या पेज वर तुम्हाला AEPDS – All Details या पर्यायावर क्लिक करावे लागेल लगेच नवीन पेज ओपन होईल त्या वर तुम्हाला RC Details या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
 • नंतर तुमच्या समोर आणखी नवीन पृष्ठ ओपन होईल या पृष्ठावर तुम्हाला एक बॉक्स दिसेल त्या बॉक्स मध्ये तुम्हाला तुमचा रेशन कार्ड नंबर भरून सबमिट बटन वरती क्लिक करायचे आहे.
 • नंतर लगेच तुमच्या समोर नवीन पृष्ठावर Maharashtra Ration Card Online Details दिसेल.
तर मित्रांनो वरील प्रकारे तुम्ही Maharashtra Ration card online details check करू शकता.

नेहमी विचारल्या जाणारे प्रश्न

महाराष्ट्र रेशन कार्ड लिस्ट 2024 कशी पाहायची?

महाफूड च्या अधिकृत वेबसाइट वर जाऊन तुम्हाला महाराष्ट्र रेशन कार्ड लिस्ट ऑनलाइन पाहता येईल.

महाराष्ट्र रेशन कार्ड चे फायदे काय आहेत?

महाराष्ट्र रेशन कार्ड चे बरेचसे फायदे आहेत जसे की, या रेशन कार्ड वर तुम्हाला मोफत धान्य मिळेल, वेगवेगळ्या सरकारी कामासाठी सुद्धा तुम्ही रेशन कार्ड चा उपयोग करू शकता.

माहिती आवडली असल्यास नक्कीच शेअर करा. आणि अश्याच प्रकारे नाव-नवीन माहिती दररोज मिळवण्यासाठी आताच आमच्या टेलिग्राम चॅनल ला जॉइन करा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.