महाराष्ट्र शासनाने नुकताच Sheli Palan Anudan Yojana 2025 चे नवीन अपडेट जाहीर केले आहे त्या नुसार शेतकर्यांना 20 शेळ्या आणि 2 बोकड यांच्यासाठी सरकार कडून अनुदान मिळणार आहे. हे अनुदान कसे मिळवायचे त्यासाठी कोण-कोणती कागदपत्र लागतात आणि Sheli Palan Anudan Yojana 2025 साठी नोंदणी कशी करायची याबद्दलची सविस्तर माहिती आम्ही या पोस्ट मध्ये सांगणार आहोत तरी विनंती आहे की तुम्हाला जर शेळी पालन अनुदान योजना 2025 अंतर्गत 20 शेळ्या आणि 2 बोकड साठी राज्य सरकार कडून अनुदान मिळवायचे असेल तर हा लेख शेवटपर्यंत वाचावा.
Sheli Palan Anudan Yojana Maharashtra 2025
शेळी पालन अनुदान योजना महराष्ट्र 2025 अंतर्गत शासनाने मराठवाड्याच्या पॅकेज च्या धर्तीवर पहिल्या टप्प्यात उस्मानाबाद, यवतमाळ गोंदिया, आणि सातारा तसेच दुसर्या टप्प्यात बीड व भंडारा या जिल्हयांसाठी 20 शेळ्या आणि 2 बोकड म्हणजे शेळी पालन अनुदान योजना 2025 महाराष्ट्र साठी सरकार अनुदान उपलब्ध करून देणार आहे. अशी प्रशासकीय मान्यता महाराष्ट्र सरकारकडून देण्यात आली आहे. त्या बाबत चा शासन निर्णय म्हणजे Sheli Palan GR Maharashtra 2021 देखील प्रसिद्ध करण्यात आला आहे.
मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना 2025
Sheli Palan Yojana GR 2025
पशुंसवर्धन विभागामार्फत Sheli Palan Yojana 2025 साठी शेळी गट वाटपाच्या राज्यस्तरीय नावीन्यपूर्ण व जिल्हा स्तरीय योजनेमधील शेळ्या आणि बोकडाची / मेंढ्या आणि नर मेंढ्याची आधारभूत किंमत वाढविण्यास दि.१२.०५.२०२१ रोजी पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मंत्रिमंडळाने मान्यता प्रदान केलेली आहे. त्यानुषंगाने खालीलप्रमाणे शासनातर्फे निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे.
महाराष्ट्र सरकारने जारी केलेला Sheli Palan GR Pdf मध्ये तुम्ही खाली दिलेल्या लिंक वरुण डाऊनलोड करू शकता.
शेळी पालन 2025 शासन निर्णय
शेळी पालन अनुदान योजना 2025 साठी निवड झालेल्या प्रत्येक लाभार्थीला वाटप करणे प्रस्तावित असलेल्या शेळी गटाचा एकूण अपेक्षित खर्च (शेळी गट व शेळयांसाठीचा वाडा) रू.२,३१,४००/ इतका आहे. गटाची स्थापना करताना सुरुवातीला लाभार्थ्यास १०० टक्के निधी स्वहिस्सा / वित्तीय संस्थांचे कर्ज याद्वारे उभा करावयाचा आहे. सर्व प्रवर्गासाठी प्रत्यक्ष खर्चाच्या ५० टक्के तथापि, प्रति गट कमाल मर्यादा रू. १,१५,७००/- या प्रमाणे अनुदान (Back ended Subsidy) देय राहणार आहे.
पीक नुकसान भरपाई अर्ज आणि यादी
महाराष्ट्र 20 शेळ्या आणि 2 बोकड योजना 2025
तपशील | दर (प्रती शेळी/बोकड) | गटाची एकूण किंमत |
---|---|---|
20 शेळी खरेदी | 6000 रुपये | 120000 रुपये |
2 बोकड खरेदी | 8000 रुपये | 16000 रुपये |
शेळयांचा वडा (450 चौ.फूट) | 212 रुपये प्रती चौ.फूट | 95000 |
Maharashtra Sheli Palan Yojana Anudan 2025
गटाचे स्वरूप | गटाची किंमत) | 50 टक्के अनुदानाची रक्कम |
---|---|---|
20+02 शेळी वाटप | 231400 रुपये | 115700 रुपये |
तर शेतकरी मित्रांनो, वरील प्रमाणे अनुदान लाभार्थी शेतकर्यांना Sheli Palan Anudan Yojana अंतर्गत Maharashtra Government कडून मिळणार आहे.
माहिती आवडली असल्यास नक्कीच शेअर करा. आणि अश्याच प्रकारे दररोज नवनवीन माहिती मिळवण्यासाठी आम्हाला टेलिग्राम वर जॉइन करा.