मित्रांनो, शहर आणि ग्रामीण भागातील गरीब, बेरोजगार कुटुंबांना काम शोधण्यात मदत करण्यासाठी भारत सरकारने NREGA Job Card List 2025 जारी केली आहे. देशातील प्रत्येक राज्याला लोकांना ही यादी ऑनलाइन तपासता येते आणि pdf Download सूद्धा करता येते. या यादीत ज्यांची नावे असतील त्यांना NAREGA Job Card 2025 दिले जाईल. ज्यामध्ये लाभार्थीच्या कुटुंबातील सदस्यांची नावे सूचीबद्ध केल्या जातील. या कार्डामुळे ग्रामपंचायत स्तरावर विकासकामे करताना लाभर्थ्याला 100 दिवसांचे काम मिळणार आहे. या पोस्ट मधून आम्ही तुम्हाला Narega Payment List 2025 Online कशी तपासावी किंवा डाऊनलोड करावी या बद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत तरी विनंती आहे की आमची ही पोस्ट अगदी शेवट पर्यंत वाचावी.
NREGA Payment List 2025
शहरी आणि ग्रामीण भागातील गरीब बेरोजगार कुटुंबांना मदत करण्यासाठी भारत सरकारने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा 2005 अंतर्गत NREGA Job Card New List 2025 प्रकाशित केली आहे. प्रत्येक राज्याची यादी वेगळी आहे. या योजनेंतर्गत जवळपास 34 राज्ये आधीच सूचीबद्ध झाली आहेत. ज्या व्यक्तीकडे हे कार्ड असेल त्याला ग्रामपंचायत स्तरावर विकास कामे करताना 100 दिवसांचे काम मिळेल.
Narega Payment List 2025 च्या मदतीने लाभार्थी त्यांना मिळालेला कामाचा मोबदला ऑनलाइन तपासू शकतात. तसेच नरेगा जॉब कार्ड अंतर्गत किती लोकांना काम मिळाले आणि किती पैसे जमा झाले हे देखील ऑनलाइन पाहता येईल.
Narega Payment List 2025 मध्ये खालील माहिती दिलेली आहे:
- लाभार्थीचे नाव, गाव, जॉब कार्ड क्रमांक
- कामाचा कोड, एकूण कामाचा मिळालेला मोबदला
नरेगा पेमेंट लिस्टची उद्दिष्टे
MANREGA Payment List 2025 चा प्राथमिक उद्देश हा आहे की ज्या पात्र अर्जदारांनी या कार्यक्रमात आधीच नावनोंदणी केली आहे त्यांना त्यांची नावे सरकारने जारी केलेल्या पेमेंटच्या यादीमध्ये शोधण्याची परवानगी देणे. भारत सरकार ग्रामीण भागातील बेरोजगार व्यक्तींना 100 दिवसांचे काम मिळावे या उद्देशाने Narega जॉब कार्ड जारी करते.
Narega Payment List Pdf मध्ये खालील माहिती दिलेली आहे
- Work Code
- Job Card No
- Applicant Name
- Muster Roll No
- To Date Form Date
- Wage Per Day
- Total Attendance
- Total Cash Payment
- Data Entry
- Date Delay in Data Entry
NAREGA Payment Yadi 2025 चे फायदे
या कार्यक्रमांतर्गत अनेक फायदे गरीब लोकांना पुरविले जातात काही फायदे खाली दिले आहेत:
- Narega Payment List Maharashtra अंतर्गत लोकांना पैसे मिळाले आहेत की नाही हे तपासता येते आणि त्यासाठी संबंधित वेबसाइट वर ही यादी pdf मध्ये डाऊनलोड करण्याची सुविधा देखील उपलब्ध आहे.
- लाभार्थ्यांना RTGS किंवा NEFT द्वारे पैसे त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केले जातात. आणि ह्या दोन्ही पैसे हस्तांतरित करण्यासाठी वापरल्या जाणार्या डिजिटल पद्धती आहेत.
- अधिकृत वेबसाइट च्या माध्यमातून लोकांना कोणत्या राज्यात किती लोकांना काम मिळाले आणि किती लोकांना कामाचा मोबदला मिळाला हे देखील तपासल्या जाते.
Narega Payment List Maharashtra 2025 कशी तपासावी
- सर्वात आधी तुम्हाला Narega च्या अधिकृत वेबसाइट वर जावे लागेल.
- नंतर तुमच्या समोर पुढील मुखपृष्ठ उघडेल
-
- मुखपृष्ठावर तुम्हाला राज्य निवडावे लागेल जसे की “महाराष्ट्र”
- नंतर पुढील पृष्ठावर तुम्हाला तुमचा जिल्हा आणि तालुका निवडावा लागेल.
- नंतर तुम्हाला work-wise consolidated payment to worker या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
- पुढील पृष्ठावर तुम्हाला तुमची ग्रामपंचायत निवडावी लागेल.
- नंतर काम आणि कामाचा कोड निवडला की तुमच्या समोर Narega Payment List 2025 Maharashtra उघडेल.
- या यादीत तुम्ही तुमचे नाव शोधू शकता आणि Narega Payment List 2025 pdf देखील डाऊनलोड करू शकता.
