शेतातून जाणारे रस्ते रोकल्यास होऊ शकते कारवाई

 सदर बातमी ही अहमदनगर जिल्ह्यातील आहे. जिल्हयात शेतकर्‍यांच्या शेतात जाण्यासाठि रस्ते, पाणंद, रस्त्यांचे अतिक्रमण काढणे, घरकुलसाठी जागा नसणार्‍यांना जागा देणे स्मशानभूमी नसणार्‍या गावांना स्मशानभूमीसाठी जागा देणे या साठी ‘अहमदनगर महसूल विजय सप्तपदी‘ हे अभियान  राबवण्यात येणार आहे. 

हे नवीन अभियान 7 फेब्रुवारी ते 31 मार्च या कलावधीत अहमदनगर जिल्ह्यात राबवले जाणार आहे. अशी माहिती अहमदनगर चे जिल्हा अधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी पत्रकार परिषदेत दिली.

हेही वाचा – महाभूलेख । अश्या प्रकारे पाहता येईल ऑनलाइन डिजिटल ७/१२

जिल्ह्यातील जे सैनिक लष्करात आहेत त्यांच्या जमिणीबाबतची अनेक प्रकरणे पुढे आली आहेत असे जिल्हा अधिकारी म्हणाले, सैनिकांच्या कुटुंबांना शेतात जाण्यासाठि रस्त्यांची अडवणूक होणे, रस्त्यांवरच अतिक्रमण करणे अश्या अनेक प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी ‘अहमदनगर महसूल विजय सप्तपदी‘ हे अभियान  राबवण्यात येणार आहे. 

अहमदनगर जिल्ह्यातील सर्वच तालुक्यातील गावांमध्ये हे अभियान 7 फेब्रुवारी ते 31 मार्च या कलावधीत राबवले जाणार आहे. यासाठी प्रत्येक तालुक्यात एक उपजिल्हाधिकारी नोडल अधिकारी म्हणून नेमण्यात येणार आहे.तहसिलदार, नायब तहसिलदार, तलाठी हे या वेळी गावातील प्रश्नांची सोडवणूक करतील. श्रीरामपूर ल 7 फेब्रुवारी ला या अभियानाचा प्रारंभ करण्यात आला आहे. आणि ग्रामीण भागातील लोकांचा सुद्धा चांगला प्रतिसाद या अभियानाला मिळत आहे. 

हेही वाचा – किसान सन्मान निधि योजेनेचा लाभ घेणर्‍या शेतकर्‍यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी

तर शेतकरी मित्रांनो, तुमच्या पण शेतातून कोणाचा रास्ता जात असेल तर त्याची अडवणूक करू नका जवळच्या तहसिलदार किंवा तलाठी यांना भेटा ते हा प्रश्न मार्गी लावतील

मित्रांनो, माहिती आवडली असल्यास आपल्या मित्रांसोबत नक्कीच शेअर करा. आणि अश्याच प्रकारे दररोज नव-नवीन माहिती मिळवण्यासाठी आजच आमच्या Telegram चॅनल ला जॉइन व्हा.

 

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.