शेतीचे उत्पन्न वाढवणारे सेंद्रिय खत आणि त्यांचे प्रकार । Types of Organic Fertilizers

 नमस्कार शेतकरी मित्रांनो, वनस्पती व प्राणी यांच्या अवशेषापासून जे खत तयार केले जाते त्याला सेंद्रिय खत म्हणतात. सेंद्रिय खतांमध्ये महत्वाचे प्रकार म्हणजे शेणखत, कंपोस्ट खत, हिरवळीची खते, गांडूळ खते, माश्यांचे खत, खाटिकखान्याचे खत, हाडांचे खत, तेलबियांची पेंड इत्यादी. सध्या अशा प्रकारच्या सेंद्रिय शेतीकडे शेतकरी शेतकर्‍यांचा कल जास्त आहे.

Types of organic fertilisers
Types of organic fertilizers

सेंद्रिय शेतीमुळे शेतातील शेतमालााला चांगला दर मिळत असतो. शिवाय सेंदिय खतांमुळे रासायनिक खतांवरील खर्चदेखील कमी होतो.

सेंद्रिय खतांचे प्रकार । Types of Organic Fertilizers

१) शेणखत : गाईम्हशींचे शेण, मूत्र, गोठ्यातील पालापाचोळा इत्यादी घटकांपासून तयार होणाऱ्या खताला शेणखत म्हणतात. त्यामध्ये नत्र, स्फुरद व पालाश असते. शेणाचा महत्त्वाचा उपयोग बायोगॅसमध्ये ऊर्जा निर्मितीसाठी सुद्धा होतो आणि शिल्लक राहिलेले पातळ शेण पिकांच्या वाढीसाठी पोषक अन्नद्रव्य म्हणून शेतकरी वापरू शकतात. 

२) हिरवळीची खते :- लवकर वाढणाऱ्या पिकांची निवड करून, त्यांची दाट पेरणी करून पीक फुलोऱ्यावर येण्याच्या आधी ते नांगराच्या सहाय्याने जमिनीत गाडतात. त्यापासून जमिनीला नत्र मिळते, जमिनीचा पोत सुधारतो व ती सुपीक बनते. अशा खतांना हिरवळीचे खत म्हणतात.

हेही वाचा – निंभोळी अर्क तयार करण्याची सोपी पद्धत

३) कंपोस्ट खत :- शेतातील गवत, पिकांचे कापणीनंतर उरलेले अवशेष, भुसा, उसाचे पाचट, कापसाची धसकटे इ. सेंद्रिय पदार्थांचे सूक्ष्मजीवजंतूंमुळे विघटन होऊन त्यातील कार्बन नत्राचे प्रमाण कमी होते व चांगला कुजलेला पदार्थ तयार होतो त्याला कंपोस्ट म्हणतात. यामध्ये नत्र, स्फुरद आणि पालाश असते.

गाडलेल्या पिकांना कुजण्य़ासाठी दीड ते दोन महिन्यांचा कालवधी लागतो. ताग, धैच्या, मूग, चवळी, गवार, शेवरी, बरसीम, ग्लीिरिसिडीया तागापासून नत्राचा पुरवठा ५ ते ६ आठवड्यात होतो. मुगाचा पालापाचोळा जमिनीत गाडल्यामुळे गव्हाच्या उत्पादनात चांगली वाढ होते.

४) गांडूळ खत – ह्या खतात गांडुळाची विष्ठा, नैसर्गिकरीत्या कुजलेले पदार्थ, गांडुळाची अंडीपुंज, बाल्यावस्था आणि अनेक उपयुक्त जीवाणूंचा समावेश असलेल्या खताला गांडूळ खत म्हणतात.

हेही वाचा – शेणा पासून रंग तयार करा आणि महिन्याला लाखो कमवा

५) माशाचे खत – समुद्रकिनारी वाया गेलेल्या माशांपासून तसेच माशाचे तेल काढल्यानंतर उरलेल्या अवशेषापासून जे खत तयार होते ते. ह्यात नत्र, स्फुरद आणि पालाश यांचे प्रमाण भरपूर असते.

६) खाटीकखान्याचे खत – खाटीकखान्यात जनावरांचे रक्त व अवशेषापासून जे खत बनवितात त्याला खाटीकखान्याचे खत म्हणतात यात नत्र आणि स्फुरद चांगल्या प्रमाणत असते.

मित्रांनो, माहिती आवडली असल्यास आपल्या शेतकरी मित्रांसोबत नक्कीच शेअर करा. आणि अश्याच प्रकारे दररोज नव-नवीन माहिती मिळवण्यासाठी आजच आमच्या Telegram चॅनल ला जॉइन व्हा.


Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.