अल्पभूधारक शेतकर्‍यांसाठी ठाकरे सरकारचं “विकेल ते पिकेल” अभियान

 नमस्कार शेतकरी मित्रांनो. मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात कोंग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना यांनी महाआघाडीच सरकार स्थापन केले आहे. आणि त्या नंतर मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे यांनी शेतकर्‍यांसाठी महात्मा फुले कर्जमाफी ची योजना सुरू केली. आणि पुढचे पाऊल उचलत ठाकरे सरकारनं ऑक्टोबर २०२० मध्ये “विकेल ते पिकेल” अभियानाची सुरुवात केली आहे. Vikel te pikel abhiyan, vikel te pikel programme

vikel te pikel abhiyan

विकेल ते पिकेल अभियान नेमकं आहे तरी कुणासाठी? Vikel te pikel abhiyan

महाविकासआघाडी च्या ठाकरे सरकारनं विकेल ते पिकेल हे अभियान महाराष्ट्र राज्यातील अल्प भूधारक शेतकऱ्यांसाठी ऑक्टोबर २०२० मध्ये सुरु केले आहे. अल्प तसेच अत्यल्प भूधारक शेतकर्‍यांचे प्रमाण हे राज्यात ८१ टक्के आहे  तसेच ८३ टक्के शेतकरी कोरडवाहु शेती करतात. ही परिस्थिति लक्षात घेऊन शेतकरी आणि ग्राहकांच्या मागण्या निश्चित करणे व  शेतकऱ्यांचे बाजारभावातील अनिश्चिततेमुळे होणाऱ्या नुकसनापासून संरक्षण करणे असा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे.


विकेल ते पिकेल अभियानाचे मुख्य मुद्दे

  • मागणीप्रमाणे पिकांच्या पद्धतीत बदल करणे.
  •  शेतीमालाची गुणवत्ता सुधारणे आणि वाढवणे.
  • शेतीव्यवसाय आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य करणे.
  • शेतमालाची विक्री करण्यासाठी ब्रँड विकसित करणे.
  •  मूल्य साखळी विकसांच्या प्रकल्पांच्या माध्यमांतून विक्री वाढीव संधी शेतकर्‍यांना उपलब्ध करुन देणे.
  • शेती व्यवसाय सुलभतेसाठी नवीन धोरण तयार करणे.
  • कृषी क्षेत्रातील गुंतवणुकीचे प्रमाण वाढवणे.
  • शाश्वत शेतीचे उत्पन्न आणि उत्पादकता वाढवणे.
  • बाजाराशी संबंधित माहितीचे विश्लेषण करुण शेतकऱ्यांना माहिती देणे.

अभियानाचे नाव

“विकेल ते पिकेल”

सुरुवात

ऑक्टोबर २०२०

कोणी सुरू केले

श्री उद्धव ठाकरे सरकार

सहभागी राज्य

महाराष्ट्र

विकेल ते पिकेल अभियानाची अंमबलबजावणी कोण करणार?

विकेल ते पिकेल अभियानाची अंमलबजावणी ही राज्य शासनाचे विभाग आणि नाबार्ड यांच्या मार्फत केली जाणार असून संत शिरोमणी श्री सावतामाळी शेतकरी आठवडे बाजार अभियानांतर्गत सप्टेंबर 2020 पासून 76 आठवडे बाजार कार्यरत आहेत आणि हे अभियान विकेल ते पिकेल अभियानाअंतर्गतचं राबविले जाणार आहे.

हेही वाचा – PM KISAN योजनेत झाला मोठा बदल

विकेल ते पिकेल या अभियानांतर्गत ग्राहकांना व व्यापाऱ्यांना शेतमालाची विक्री केली जाणार असून प्रक्रिया केलेल्या शेतमालाच्या विक्रीसाठी पायाभूत सुविधा विकसित करण्याचा प्रयत्न केल्या जाणार आहे.

मित्रांनो, माहिती आवडली असल्यास आपल्या मित्रांसोबत नक्कीच शेअर करा. आणि अश्याच प्रकारे दररोज नव-नवीन माहिती मिळवण्यासाठी आजच आमच्या Telegram चॅनल ला जॉइन व्हा.

हेही वाचा – महाभूलेख । अश्या प्रकारे पाहता येईल ऑनलाइन डिजिटल ७/१२

 हेही वाचा – शेतातून जाणारे रस्ते रोकल्यास होऊ शकते कारवाई

 हेही वाचा – महाभूलेख । अश्या प्रकारे पाहता येईल ऑनलाइन डिजिटल ७/१२

 हेही वाचा – किसान सन्मान निधि योजेनेचा लाभ घेणर्‍या शेतकर्‍यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी


Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.