अतिवृष्टी नुकसान भरपाई चा नवीन GR आला | Ativrushti Nuksan Bharpai Maharashtra New GR

Ativrushti Nuksan Bharpai Maharashtra 2022-23: राज्यात नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकर्‍यांच्या पिकांचे नुकसान झाल्यास राज्य शासनाकडून शेतकर्‍यांना नुकसानीपोटी अतिवृष्टी नुकसान भरपाई (Ativrushti Nuksan Bharpai Maharashtra) देण्यात येत असते. राज्य शासनाने नुकताच या अतिवृष्टी नुकसान भरपाई बाबत एक नवीन GR जाहीर केला आहे. या पोस्ट मधून आम्ही तुम्हाला Ativrushti Nuksan Bharpai Maharashtra New GR बद्दल संपूर्ण माहिती सांगणार आहोत तरी विनंती आहे की आमची ही पोस्ट शेवट पर्यंत वाचावी.

Ativrushti Nuksan Bharpai Maharashtra 2023

अतिवृष्टी नुकसान भरपाई (Ativrushti Nuksan Bharpai) शेतकर्‍यांना दिली जात असताना तलाठी हा लाभार्थी शेतकर्‍यांची वैयक्तिक माहिती जसे आधार नंबर, बँक खाते क्रमांक, जमिनीचा तपशील इत्यादी माहिती यादी बनवून तहसिलदार यांना सादर करतो आणि तलाठी यांनी दिलेल्या यादी नुसार लाभार्थी शेतकर्‍यांच्या खात्यात तहसिलदार अतिवृष्टी नुकसान भरपाई ची रक्कम जमा करतात.

परंतू ही अतिवृष्टी नुकसान भरपाई ची रक्कम जमा करत असताना बर्‍याच शेतकर्‍यांचा तपशील चुकतो, बँक खाते क्रमांक चुकतो, यामुळे शेतकर्‍यांना मदत मिळण्यात विलंब होतो. म्हणूनच आता अतिवृष्टी नुकसान भरपाई ची रक्कम (Ativrushti Nuksan Bharpai Maharashtra) शेतकर्‍यांच्या बँक खात्यात नव्या पद्धतीने जमा करण्यात येणार आहे. यासाठी राज्य शासनाकडून नवीन शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.

अतिवृष्टी नुकसान भरपाई नवीन GR

अचानक उद्भवणाऱ्या नैसर्गिक आपत्तीमुळे (Atuvrushti) झालेल्या नुकसानीचे पंचनामे होऊन त्याबाबतच्या निधी उपलब्धतेकरिता प्रस्ताव विभागीय आयुक्त यांच्यामार्फत शासनाला सादर करण्यात येतो. प्रचलित कार्यपध्दतीमध्ये विविध बाबीकरिता शासनाकडून निधी वितरणास मान्यता दिल्यानंतर सदर निधी अर्थसंकल्पिय वितरण प्रणालीवर (बीडीएस) विभागीय आयुक्त यांना वितरीत करण्यात येतो. विभागीय आयुक्त हा निधी जिल्हाधिकाऱ्यांना वितरीत करतात. जिल्हाधिकारी हा निधी संबंधित तहसीलदार यांना वितरीत करतात.

आणि तहसीलदार हे कोषागारात देयक सादर करून रक्कम आहरीत करतात. ही रक्कम तहसीलदारांकडे असलेल्या बँक खात्यात जमा करण्यात येते. त्यानंतर मदतीचा निधी अतिवृष्टी मुळे नुकसान झालेल्या (Ativrushti Nuksan Bharpai) व्यक्तींच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येतो. सदर प्रकियेमध्ये शासनास प्रस्ताव प्राप्त होणे, प्रस्तावास शासन मान्यता मिळाल्यानंतर त्याबातचा निधी प्राप्त होऊन बाधितांना मदत वितरीत करे पर्यंत बराच वेळ निघून जातो.

नुकसान भरपाई थेट बँक खात्यात जमा होणार

महात्मा जोतिराव फुले ‘शेतकरी कर्जमाफी योजना 2019‘ (Shetari Karj Mafi Yojana) अंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजना सुरू करण्यात आली आहे. ही योजना ऑनलाईन पध्दतीने राबविण्यात येत असून MAHAIT यांची Portal साठी तांत्रिक सेवा पुरवठादार म्हणून सरकार कडून नियुक्ती करण्यात आली आहे. सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना ज्या पध्दतीने प्रोत्साहनपर लाभ देण्यात येतो.

त्याच धर्तीवर नैसर्गिक आपत्तीमध्ये नुकसान झालेल्या पात्र बाधित व्यक्तींना द्यावयाच्या मदतीचा निधी प्रचलित कार्यपध्दतीनुसार वितरीत न करता MAHAIT यांचेकडून यासाठी संगणकीय प्रणाली विकसित करुन निधी वितरीत करण्याच्या प्रस्तावास विभागीय प्रकल्प अंमलबजावणी समितीच्या दिनांक 04/11/2022 रोजी झालेल्या बैठकीमध्ये मान्यता देण्यात आली आहे.

शेतीपिकांच्या व शेतजमिनीच्या नुकसानीकरिता पात्र शेतकऱ्यांना द्यावयाचा मदतीचा निधी आधार क्रमांकाद्वारे ओळख पटवून त्यांच्या बँक खात्यात थेट जमा करण्यासाठी सुधारित कार्यपध्दती विहित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. म्हणून दिनांक 24 जानेवारी 2023 रोजी त्याबाबत शासन निर्णय जाहीर करण्यात आला आहे.

अतिवृष्टी नुकसान भरपाई नवीन शासन निर्णय (GR)

नैसर्गिक आपत्तीमध्ये शेतीपिकांचे व शेतजमिनीचे नुकसान झालेल्या पात्र शेतकऱ्यांना मदतीचा निधी यापुढे जुन्या कार्यपध्दतीनुसार वितरीत न करता MAHAIT यांचेकडून यासाठी विकसित करण्यात येणाऱ्या संगणकीय प्रणालीवर आधारित खालीलप्रमाणे सर्वसाधारण कार्यपध्दतीनुसार शेतकर्‍यांच्या बँक खात्यात वितरीत करण्यास शासनाची मान्यता देण्यात आली आहे.

अतिवृष्टी नुकसान भरपाईची रक्कम शेतकर्‍यांच्या बँक खात्यात हस्तांतरित करण्याची नवीन पद्धत

  • सर्व तहसीलदार हे शासन निर्णयासोबतच्या विवरणपत्रामधील रकान्यात नमूद केलेल्या नमुन्यात पात्र शेतकऱ्यांची सर्व माहिती Excel format मध्ये भरून, MAHAIT या कंपनीकडून त्यांना उपलब्ध करून दिलेल्या लॉगीनद्वारे याकरिता विकसित केलेल्या नवीन पोर्टल वर पाठवतील. तहसीलदार यांचेकडून संगणकीय प्रणालीवर उपलब्ध करुन दिलेल्या लाभार्थ्यांच्या याद्या जिल्हाधिकारी यांचे वतीने त्यांनी प्राधिकृत केल्यानुसार संबंधित प्रांतअधिकारी किंवा निवासी उप जिल्हाधिकारी यांच्याकडून अनुमोदीत करण्यात येतील. या याद्या शासनाने यासाठी मंजूर केलेल्या जिल्हानिहाय निधीच्या मर्यादेत अनुमोदीत करण्यात येतील.
  • तहसीलदार यांनी उपलब्ध करुन दिलेल्या माहितीचे संगणकीय ऑनलाइन प्रणालीवर संस्करण करण्यात येईल. ज्या माहितीमध्ये त्रुटी आहेत अशी माहिती त्रुटी दूर करण्यासाठी तहसीलदार यांना संगणकीय प्रणालीवर दर्शविण्यात येईल. यामुळे एकाच व्यक्तीच्या नावे दोघांना अथवा एकाच बाधित क्षेत्राकरिता दोन व्यक्तींना होणारे रकमेचे प्रदान टाळता येईल. तहसिलदार यांना या माहितीमध्ये आवश्यक असेल ती दुरूस्ती करता येईल आणि ही माहिती पुन्हा संगणकीय प्रणालीवर अपलोड करता येईल. तहसिलदार व प्रांतअधिकारी किंवा निवासी उप जिल्हाधिकारी यांचेकरिता Standard Operating Procedure (SOP) संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येईल.(Ativrushti Nuksan Bhaipai maharashtra)
  • अशा रितीने संस्करीत झालेल्या माहितीच्या आधारे लाभार्थ्यांचे नाव, बाधीत क्षेत्र, मदतीची रक्कम इ. तपशील दर्शविणारी विशिष्ट क्रमांक यादी संगणकीय प्रणालीवर तयार करण्यात येईल. ही यादी तहसीलदार यांना पोर्टल वरुन डाऊनलोड करून घेता येईल. ही यादी ग्रामपंचायनिहाय देखील उपलब्ध असेल व ती प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये जाहीररित्या प्रसिध्द करण्यात येईल. या विशिष्ट क्रमांक यादीचे वाचन करण्यासाठी संबंधित तलाठी/ग्रामसेवक शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतील.
  • विशिष्ट क्रमांक यादी मधील लाभार्थी यांना नजिकच्या Common Service Centre अथवा ‘आपले सरकार सेवा केंद्र’ येथे जाऊन त्यांची आधार क्रमांकाद्वारे बायोमेट्रिक ओळख पटविणे आवश्यक राहिल. लाभार्थ्यांनी ओळख पटविल्यानंतर विभागाने यासाठी खाते उघडलेल्या बँके मार्फत (SBI) रक्कम थेटरित्या लाभार्थ्याच्या बँक खात्यात जमा होईल. जर विशिष्ट क्रमांक यादी मधील लाभार्थी नजिकच्या Common Service Centre अथवा ‘आपले सरकार सेवा केंद्र’ येथे बायोमेट्रिक ओळख पटविण्यासाठी गेल्यानंतर त्यांना विशिष्ट क्रमांक यादीमध्ये काही माहिती चुकीची आढळल्यास, त्यांना त्याबाबत Common Service Centre अथवा ‘आपले सरकार सेवा केंद्र’ यांना अवगत करण्याची सुविधा असेल. तद्नंतर Common Service Centre अथवा ‘आपले सरकार सेवा केंद्र सदर माहिती दुरुस्तीसाठी संबंधित तहसिलदार यांना पाठवेल. तहसिलदार यांचेकडून सदर माहिती दुरुस्ती झाल्यानंतरच संबंधित लाभार्थ्यांना Common Service Centre अथवा ‘आपले सरकार सेवा केंद्र’ येथे जाऊन त्यांची आधार क्रमांकाद्वारे बायोमेट्रिक ओळख पटविल्यानंतर SBI मार्फत रक्कम थेटरित्या शेतकर्‍यांच्या बँक खात्यात जमा होईल.

मित्रांनो, माहिती आवडली असेल तर नक्की शेअर करा. आणी दररोज नवनवीन सरकारी योजनांची माहिती मिळवण्यासाठी आम्हाला टेलिग्राम वर नक्की फॉलो करा आणि https://www.krushiyojana.in या आमच्या वेबसाइट ला भेट देत रहा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.