रेशन कार्ड ला आधार कार्ड कसे लिंक करावे? संपूर्ण माहिती | Online Ration Card to Aadhar Link Maharashtra 2023

Online Ration Card to Aadhar Link Maharashtra 2023 | Ration Card Aadhar Link Check | Aadhar Card Link With Ration Card | Aadhar Link To Ration Card Online Maharashtra | Ration Card Aadhar Link Form

आजच्या काळात सर्व कागदपत्रांसोबत आधार कार्ड लिंक करणे गरजेचे झाले आहे हे आपणा सर्वांना माहीत आहे. मग तो तुमचा फोन नंबर असो किंवा बँक खाते किंवा इतर कोणतेही कागदपत्रे, त्यामध्ये तुमचा आधार कार्ड नंबर लिंक असणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे आता शासनाकडून दिल्या जाणाऱ्या रेशनचा लाभ मिळण्यासाठी आधार कार्ड रेशनकार्डशी लिंक करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

सरकारकडून देण्यात येत असलेल्या मोफत रेशनचा लाभ मिळवण्यासाठी तुम्ही सर्व नागरिकांना तुमचे रेशन कार्ड आधार लिंक करावे लागेल. तुम्ही तुमचे आधार कार्ड शिधापत्रिकेशी लिंक केले नाही, तर तुम्ही सरकारकडून दिल्या जाणाऱ्या विविध लाभांपासून वंचित राहाल. म्हणूनच तुम्ही तुमचे Aadhar Card Ration Card Link करणे महत्त्वाचे आहे. आज आम्ही तुम्हाला या लेखातून आधार कार्ड रेशन कार्ड सोबत ऑनलाइन कसे लिंक करावे या बद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत तरी विनंती आहे की आमची ही पोस्ट शेवट पर्यंत वाचावी. (Online Ration Card to Aadhar Link Maharashtra)

रेशन कार्ड हे एक सरकारी दस्तऐवज आहे जे आपल्याला कमी दरात रेशन पुरवते. आता केंद्र सरकारने रेशन कार्ड आधार कार्डशी लिंक (Ration Card to Ration Card Link) करण्यासाठी लिंकिंगची तारीख ३१ ऑगस्ट 2023 पर्यंत वाढवली आहे. ज्यांनी अद्याप सुद्धा त्यांचे आधार कार्ड रेशनकार्डशी लिंक केलेले नाही, ते लवकरात लवकर पूर्ण करा. कारण शासनाकडून रेशनकार्डच्या माध्यमातून विविध सुविधांचा लाभ नागरिकांना दिला जातो. जर तुमचे रेशन कार्ड आधार कार्डशी लिंक नसेल तर तुम्हाला सरकारकडून देण्यात येणाऱ्या कोणत्याही सुविधांचा लाभ मिळणार नाही. त्यामुळे सरकारने नागरिकांनी त्यांची शिधापत्रिका त्यांच्या आधारकार्डशी लिंक करण्याची विनंती केली आहे. तुम्ही घरी बसून तुमचे आधार कार्ड शिधापत्रिकेशी लिंक करू शकता. या बद्दल सविस्तर माहिती आम्ही खाली सांगितली आहे. ( हे देखील वाचा – महाराष्ट्र नवीन रेशन कार्ड यादी 2023 )

रेशन कार्ड आधार कार्ड लिंक  

लेखाचे नाव रेशन कार्ड ला आधार कार्ड कसे लिंक करावे?
विभाग ग्राहक व्यवहार मंत्रालय
लाभार्थी देशातील सर्व रेशन कार्ड धारक
उद्देश भ्रष्टाचाराला आळा घालणे
लिंक करण्याची प्रक्रिया ऑनलाइन
अधिकृत वेबसाइट येथे क्लिक करा

 • दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना रेशनकार्डद्वारे लाभ देण्यासाठी बनावट शिधापत्रिकाधारकांची खात्री करणे.
 • आधार कार्ड लिंक केल्याने रेशनमध्ये होणारी फसवणूक रोखली जाईल.
 • बायोमेट्रिकद्वारे रेशनचे वितरण करणारी पीडीएस दुकाने खरे लाभार्थी ओळखण्यास सक्षम असतील.
 • ज्या लोकांनी बेकायदेशीररीत्या रेशनकार्ड बनवले आहेत त्यांना आधार कार्ड लिंक करून थांबवले जाईल.
 • देशातील गरीब जनतेला योग्य प्रमाणात रेशनचा लाभ मिळू शकेल.
 • शिधापत्रिका आधार कार्डशी लिंक केल्यास कोणत्याही कुटुंबाला एकापेक्षा जास्त रेशनकार्ड मिळू शकणार नाहीत.
 • आधार कार्ड लिंक केल्याने रेशन चोरीला आळा बसेल.
 • याद्वारे देशातील भ्रष्टाचार कमी होण्यास मदत होईल.

आधार कार्ड रेशन कार्डशी लिंक करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

 • कुटुंब प्रमुखाच्या आधार कार्डाची छायाप्रत
 • सर्व सभासदांच्या आधार कार्डाची छायाप्रत
 • कुटुंब प्रमुखाचा पासपोर्ट आकाराचा फोटो
 • मूळ शिधापत्रिका आणि शिधापत्रिकेची छायाप्रत
 • तुमचे बँक खाते आधारशी लिंक केलेले नसल्यास बँक खात्याचे पासबुक

 • रेशन कार्ड ला आधार कार्ड लिंक करण्यासाठी सर्वात आधी तुम्हाला महाराष्ट्र सरकारच्या Mahafood या अधिकृत वेबसाइट वर जावे लागेल.
 • वेबसाइट वर गेल्यानंतर तुमच्या समोर मुखपृष्ठ उघडेल.
 • मुखपृष्ठावर तुम्हाला Link Aadhar With Ration Card Maharashtra या लिंक वर क्लिक करावे लागेल.
 • या पृष्ठावर प्रथम तुम्हाला तुमच्या रेशन कार्डची श्रेणी निवडावी लागेल.
 • आता तुम्हाला तुमचा रेशन कार्ड नंबर टाकावा लागेल.
 • यानंतर तुम्हाला सर्चच्या ऑप्शनवर क्लिक करावे लागेल.
 • तुम्ही क्लिक करताच तुमच्या शिधापत्रिकेची माहिती येईल. तुमच्या नावाप्रमाणे कुटुंबप्रमुखाचे नाव आणि आधार कार्ड क्रमांक इत्यादी दिसेल
 • तुम्हाला या पेजवर आधार आणि मोबाईल नंबर लिंक या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
 • यानंतर तुम्हाला दिलेल्या बॉक्समध्ये तुमचा आधार क्रमांक टाकावा लागेल.
 • आधार क्रमांक टाकल्यानंतर तुम्हाला सेंड ओटीपीच्या पर्यायावर क्लिक करावे लागेल. त्यानंतर तुमच्या आधार कार्डशी लिंक केलेल्या मोबाईल नंबरवर एक ओटीपी येईल.
 • शेवटी तुम्हाला Do-eKYC च्या पर्यायावर क्लिक करावे लागेल. यानंतर तुमच्या समोर पुढील पेज उघडेल, ज्यावर तुम्हाला आधार कार्डची माहिती दिसेल.
 • तुम्हाला सर्व माहिती काळजीपूर्वक तपासावी लागेल आणि रेशन कार्ड आधारशी लिंक करण्यासाठी Verify आणि Save या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
 • अशा प्रकारे तुमचे रेशन कार्ड आधारशी लिंक केले जाईल.

मित्रांनो, आम्हाला खात्री आहे की Online Ration Card to Aadhar Card Maharashtra Link कसे करावे ही माहिती तुम्हाला आवडली असेल. दररोज नवनवीन सरकारी योजनांची माहिती मिळवण्यासाठी आम्हाला टेलिग्राम वर नक्की फॉलो करा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.