Post Office New Scheme: पोस्टाच्या या नवीन योजनेत मिळणार 7.5% चक्रवाढ व्याज, पहा कोणती आहे ही योजना

Post Office Launched New Scheme : मित्रांनो, संपूर्ण देशभरात पोस्टाने एक नवीन बचत योजना सुरू केलेली आहे. ही योजना खास महिलांसाठी आहे आर्थिकदृष्ट्या सक्षम बनावे या उद्देशाने केंद्र सरकार ने 1 एप्रिल 2023 रोजी ही योजना सुरू केली आहे.

या योजनेअंतर्गत महिला आता पोसतातून महिला सन्मान बचत प्रमाणपत्र खरेदी करू शकणार आहेत. अर्थ मंत्रालयाने Mahila Sanman Bachat Patra 2023 साठी नवीन अधिसूचना जाहीर करतांना हे बचत प्रमाणपत्र देशभरातील 1 लाख 59 हजार पोस्ट ऑफिस मध्ये त्वरित उपलब्ध करून दिले आहेत.

या योजनेची घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी २०२३-२४ च्या अर्थसंकल्पात ‘स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा’च्या निमित्ताने केली होती आणि आर्थिक समावेशन आणि मुलींसह महिलांच्या सक्षमीकरणाच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल आहे. योजनेमध्ये 2 वर्षांच्या कालावधीसह लवचिक गुंतवणूक आणि आंशिक पैसे काढण्याचे पर्याय आहेत. यामध्ये जास्तीत जास्त 2 लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर 7.5 टक्के चक्रवाढ व्याज तिमाही दराने मिळेल. ही योजना ३१ मार्च २०२५ पर्यंत दोन वर्षांच्या कालावधीसाठी वैध राहणार आहे.

महिला सन्मान बचत पत्र योजने बद्दल सविस्तर महितीसाठी येथे क्लिक करा

तुम्ही जर एप्रिल 2023 मध्ये महिला बचत प्रमाणपत्रामध्ये गुंतवणूक केल्यास, तुम्ही या योजनेतून मार्च 2025 पर्यंत पैसे काढू शकता.

मासिक उत्पन्न खाते (MIS) योजना 2019 मध्ये राष्ट्रीय बचत (मासिक उत्पन्न खाते) (सुधारणा) योजना, 2023 द्वारे सुधारणा करण्यात आली आहे आणि एकल खाते आणि संयुक्त खात्यासाठी कमाल गुंतवणूक मर्यादा 4.5 लाख रुपयांवरून 9 लाख रुपये करण्यात आली आहे. 1 एप्रिल 2023 पासून लागू रू. 9 लाख ते रु. 15 लाखांची वाढ करण्यात आली आहे. तसेच ज्येष्ठ नागरिक बचत योजनेतील गुंतवणुकीची मर्यादा 15 लाखांवरून 30 लाख रुपये करण्यात आली आहे.

PPF वगळता सर्व लहान बचत योजनांवरील व्याजदर 1 एप्रिल 2023 पासून वाढवून सुधारित करण्यात आले आहेत. पोस्ट ऑफिसच्या लहान बचत ग्राहकांना या योजनाचा अधिक फायदा होईल. यासोबतच या योजनांमध्ये पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून विशेषत: ग्रामीण भागातील मुली, महिला, शेतकरी, कारागीर, ज्येष्ठ नागरिक, कारखानदार, सरकारी कर्मचारी, छोटे व्यापारी आणि समाजातील इतर घटकांमध्ये अधिक गुंतवणूक आकर्षित होईल. त्यांना छोट्या बचत योजनांमध्ये केलेल्या गुंतवणुकीवर चांगला परतावा मिळेल.

मित्रांनो, माहिती आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि दररोज नवनवीन सरकारी योजनांची माहिती मिळवण्यासाठी आम्हाला Whatsapp वर नक्की फॉलो करा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.