8th Pay Commission: 8 व्या वेतन आयोगाबाबत मोठी बातमी, जाणून घ्या कधी लागू होणार आणि किती रुपयांनी वाढणार पगार

8th Pay Commission: मित्रांनो, ८व्या वेतन आयोगाबाबत हालचाली सुरू झाल्या आहेत. 8व्या वेतन आयोगाबाबत सरकारने आपले काय मत आहे हे स्पष्ट करावे, अशी मागणी तेलंगणापासून हैदराबादपर्यंतचे सर्व सरकारी कर्मचारी करत आहेत.

मात्र, कर्मचाऱ्यांनी 8 व्या वेतन आयोगासाठी थोडा संयम ठेवावा, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. कारण, ८व्या वेतन आयोगाबाबत सरकार सध्या काहीही बोलणार नाही. वास्तविक पाहता 8 व्या वेतन आयोगाच्या नियोजनाला अजून वेळ आहे. 24 च्या सार्वत्रिक निवडणुका झाल्यानंतर किंवा निवडणुकीपूर्वी सरकार 8 व्या वेतन आयोगाबद्दल विचार करू शकते. म्हणजेच नवीन वेतन आयोगाची स्थापना होऊ शकते आणि महागाई भत्त्यासह कर्मचार्‍यांच्या पगारात सुद्धा वाढ होईल. 2024 मध्ये 8th Pay Commission लागू होण्याची दाट शक्यता आहे.

सूत्रांच्या सांगण्यावर विश्वास ठेवला तर 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकांनंतरच नवीन वेतन आयोगाच्या स्थापनेवर चर्चा होऊ शकते. परंतु सध्या तरी हे शक्य नाही असे दिसते. मात्र 8 वा वेतन आयोग लवकर लागू व्हावा यासाठी कर्मचारी आंदोलने देखील करू शकतात.

सरकार कडून सध्या 8 व्या वेतन आयोगावर कोणतीही भूमिका स्पष्ट झालेली नाही. केंद्रीय अर्थ राज्यमंत्र्यांनीही याचा उल्लेख संसदेत केला आहे. परंतु, वेतन आयोगाच्या स्थापनेची वेळ अद्याप आलेली नसल्याचे सरकारी विभागातील सूत्रांचे म्हणणे आहे. आणि 2024 मध्ये 8 वा वेतन आयोग स्थापन होण्याची दाट चिन्हे आहेत असे सूत्रांचे म्हणणे आहे.

2024 च्या अखेरीस 8 वा वेतन आयोग तयार झाला तर तो पुढील दोन वर्षांतच लागू करावा लागेल. म्हणजे 2026 पासून त्याची अंमलबजावणी करण्याची परिस्थिती निर्माण होऊ शकते. असे झाल्यास केंद्रच्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ही सर्वात मोठी पगारवाढ ठरेल. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 7व्या वेतन आयोगानुसार 8व्या वेतन आयोगात अनेक बदल होऊ शकतात. 10 वर्षांतून एकदा वेतन आयोग स्थापन करण्याचा निर्णय बदलला जाऊ शकतो.

सातव्या वेतन आयोगाच्या स्थापनेनंतर केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या किमान वेतनात सर्वात कमी वाढ झाली होती. वास्तविक पाहता फिटमेंट फॅक्टरनुसार पगार वाढला होता. यामध्ये 2.57 पट वाढ ठेवण्यात आली होती. जर आपण विचार केला तर 8 व्या वेतन आयोगातील फिटमेंट फॅक्टरच्या कमाल श्रेणी अंतर्गत किमान वेतन 26000 रुपये असेल आणि दरवर्षी या मध्ये थोडी थोडी वाढ होईल.

मित्रांनो, माहिती आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि दररोज नवनवीन सरकारी योजनांची माहिती मिळवण्यासाठी आम्हाला Whatsapp वर नक्की फॉलो करा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.