अटल बांधकाम कामगार योजना (ग्रामीण) 2024: ऑनलाइन नोंदणी आणि PDF अर्ज डाऊनलोड | Bandhkam Kamgar Yojana Maharashtra

Atal Bandhkam Kamgar Yojana Form PDF | Maharashtra Atal Bandhkam Kamgar Yojana | Bandhkam Kamgar Yojana 2024 | बांधकाम कामगार योजना फायदे | बांधकाम कामगार स्मार्ट कार्ड | बांधकाम कामगार यादी | बांधकाम कामगार योजना ऑनलाइन फॉर्म | बांधकाम कामगार नोंदणी फॉर्म pdf | बांधकाम कामगार योजना फॉर्म | महाराष्ट्र कामगार नोंदणी

महाराष्ट्र शासनाने ग्रामीण भागात राहणाऱ्या बांधकाम मजुरांसाठी अटल बांधकाम कामगार आवास योजना (Atal Bandhkam Kamgar Yojana 2024) (ग्रामीण) 2024 सुरू केली आहे. महाराष्ट्रातील बांधकाम कामगार गृहनिर्माण योजना 2023 अंतर्गत महाराष्ट्रातील बांधकाम कामगारांना पक्के घरे बांधण्यासाठी महाराष्ट्र सरकार कडून 1.5 लाख रुपयाची मदत दिल्या जाते. ही रक्कम नवीन घर बांधण्यासाठी किंवा सध्याचे घर दुरुस्तीसाठी सुद्धा वापरली जाऊ शकते. या पोस्ट च्या माध्यमातून आम्ही तुम्हाला Atal Bandhkam Kamgar Yojana 2024 बद्दल संपूर्ण माहिती सांगणार आहोत जसे की- अटल बांधकाम कामगार योजना काय आहे? अटल बांधकाम कामगार योजनेचे उद्दीष्ट तसेच काय फायदे आहेत, या योजनेसाठी pdf अर्ज कसा करायचा तरी विनंती आहे की तुम्हाला जर अटल बांधकाम कामगार योजने विषयी संपूर्ण माहिती हवी असेल तर आमची ही पोस्ट शेवट पर्यंत वाचावी.

Atal Bandhkam Kamgar Yojana 2024

महाराष्ट्र कामगार विभागाने प्रमुख प्रधानमंत्री आवास योजना (PMAY) ग्रामीणचा एक भाग म्हणून बांधकाम मजुरांसाठी अटल बांधकाम कामगार आवास योजना सुरू केली आहे. अटल बांधकाम कामगार योजना – ग्रामीण गृहनिर्माण योजनेच्या अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र राज्याचा गृहनिर्माण विभाग नोडल एजन्सी असणार आहे. राज्य सरकार बांधकाम कामगार आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत जमीन खरेदीसाठी अतिरिक्त सहाय्य देण्यावर देखील सक्रियपणे विचार करत आहे. या योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील रहिवासी असणार्‍या बांधकाम कामगारांना नवीन पक्के घरे बांधण्यासाठी किंवा जुने घरे दुरूस्ती महाराष्ट्र सरकार कडून 1.5 लाख रुपयांची मदत केल्या जाणार आहे.

अटल बांधकाम कामगार योजनेसाठी पात्रता 

अटल बांधकाम कामगार आवास योजना 2024 अंतर्गत राज्यसरकार 1.5 लाख रु.ची आर्थिक मदत करणार आहे. नवीन घरे बांधण्यासाठी किंवा सध्याच्या घरांची पुनर्बांधणी करण्यासाठी पात्रतेचे निकष खाली दिले आहेत –

 • सर्व बांधकाम कामगारांनी महाराष्ट्र इमारत आणि इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळाकडे (MBOCWWB) नोंदणी केलेली असणे आवश्यक आहे.
 • कामगारांचे वय हे १८ ते ६० वर्ष असणे आवश्यक आहे.
 • गेल्या 12 महिन्यांत कामगाराने 90 दिवसांपेक्षा जास्त काळ काम केलेले असणे आवश्यक आहे.
 • MBOCWWB सह बांधकाम कामगारांची नोंदणी 1 वर्षापेक्षा जास्त कालावधीसाठी असणे आवश्यक आहे.
 • अर्ज करणाऱ्या बांधकाम मजुरांकडे आधीच पक्की घरे नसावीत. अन्यथा ते अपात्र  ठरविल्या जातील.
 • प्रधानमंत्री आवास योजनेतील पात्रतेबाबत सक्षम अधिकाऱ्याचे पत्र/प्रमाणित यादी असावी.

Atal Bandhkam Kamgar Yojana PDF Form Download 

अटल बांधकाम कामगार योजने 2024 साठी तुम्हाला जर अर्ज करायचा असेल तर आधी अधिकृत वेबसाइट वरून तुम्हाला Atal Bandhkam Kamgar Yojana pdf form Download करावा लागेल. त्यासाठी स्टेप्स आम्ही खाली दिल्या आहेत.

 • सर्वात आधी तुम्हाला Atal Bandhkam Kamgar Yojana च्या अधिकृत संकेतस्थळावर जावे लागेल.
 • संकेतस्थळावर गेल्यानंतर तुमच्या समोर मुखपृष्ठ उघडेल.
 • नंतर तुम्हाला Worker Section मध्ये जाऊन Welfare Schemes या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
 • नंतर तुमच्या समोर बांधकाम कामगार नोंदणी फॉर्म pdf असा पर्याय येईल तुम्हाला त्यावर क्लिक करून अर्ज डाउनलोड करावा लागेल.
 • तुम्ही डाउनलोड केलेला अर्ज खालील प्रकारे असेल –
Atal Bandhkam Kamgar Yojana pdf form Download
अर्ज डाउनलोड करतांना तुम्हाला जर काही अडचण येत असेल तर खाली आम्ही अर्ज डाउनलोड करण्याची डायरेक्ट लिंक दिलेली आहे तुम्ही त्यावर क्लिक करून सुद्धा बांधकाम कामगार नोंदणी फॉर्म pdf Download करू शकता.

तुम्हाला वरील अर्ज डाउनलोड करावा लागेल आणि त्याला आवश्यक कागदपत्रे जोडून संबंधित कार्यालयात जमा करावा लागेल.

हे सुद्धा वाचा – रमाई घरकुल योजना

Atal Bandhkam Kamgar Yojana 2024

वर नमूद केलेल्या पात्रता निकषांचे पालन करणारे सर्व पात्र बांधकाम मजूर या योजनेचा लाभ घेऊ शकतील. बांधकाम कामगार गृहनिर्माण योजना (ग्रामीण) महाराष्ट्रातील घरे चटईक्षेत्रात २६९ चौ.फूट असतील. सर्व लाभार्थी मोठी घरे बांधू शकतात परंतु यासाठी लाभार्थ्यांना स्वतःचा खर्च स्वतः उचलावा लागेल राज्य सरकार कडून केवळ १.५ लाख रुपयेच मदत मिळेल.

अधिकृत कामगार विभागाच्या अहवालानुसार, राज्यात एकूण अंदाजे 26 लाख बांधकाम कामगार आहेत. यापैकी सुमारे 12.5 लाख बांधकाम कामगार MBOCWWB मध्ये नोंदणीकृत आहेत. या नोंदणीकृत कामगारांपैकी सुमारे ग्रामीण भागातील ४ लाख बांधकाम कामगार ज्यांच्याकडे पक्के घर नाही. राज्य सरकार आता या बांधकाम कामगारांकडून अर्ज मागवत आहे.

महाराष्ट्र शासन या अर्जांना त्यांच्या कागदपत्रांची यशस्वी पडताळणी केल्यानंतर मंजुरी देतील. राज्य सरकार कडून  ही घरे ६ ते ८ महिन्यांत बांधली जातील अशी अपेक्षा आहे. शिवाय काही बांधकाम मजूर आहेत ज्यांच्याकडे स्वतःची जमीन नाही म्हणून महाराष्ट्र सरकार घर बांधण्यासाठी लागणारी जमीन खरेदी करण्यासाठी 50,000 रु. प्रदान करण्याच्या प्रस्तावावर सध्या विचार करत आहे.

महाराष्ट्र बांधकाम कामगार महासंघाने (MCWF) आर्थिक मदत अपुरी असल्याचे म्हटले आहे आणि कामगारांना त्या रकमेत घर बांधणे कठीण आहे. राज्य सरकार मोठ्या संख्येने बांधकाम कामगारांना अटल बांधकाम कामगार आवास योजना (ग्रामीण) 2024 चा लाभ मिळावा यासाठी एकूण रक्कम वाढवावी अशी अपेक्षा आहे.

मित्रांनो, अटल बांधकाम कामगार योजना 2024 (Bandhkam Kamgar Yojana Maharashtra) बद्दल तुमच्या मनात काही शंका असतील तर खाली कंमेंट टाकून आम्हाला विचारू शकता आणि दररोज नवनवीन योजनांची माहिती मिळवण्यासाठी आम्हाला टेलिग्राम वर नक्की फोल्लो करा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.