किसान सन्मान निधि योजेनेचा लाभ घेणर्‍या शेतकर्‍यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी

आजचे बाजारभाव दिनांक: पहा
WhatsApp ग्रुप Join Now

नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्याला माहीतच आहे की अल्पभूधारक शेतकर्‍यांना अर्थसाहाय्य मिळावे या हेतूने केंद्र सरकार ने प्रधानमंत्री किसान सन्मान योजना सुरू केली होती. मात्र या योजनेचा अनेकांनी गैरफायदा घेतला, काही शेतकरी आयकर भारतात आणि तरी सुद्धा या योजनेचा लाभ घेतात हे केंद्र सरकारच्या लक्षत आले आहे.

Shet Jamin Mojani App Icon
शेती जमीन मोजणी App
4.9 ★ 10,000+ Downloads
डाउनलोड करा

उस्मानाबाद जिल्ह्यात भूम तालुक्यात हा प्रकार उघडकीस आला आहे या मध्ये आयकर भरणारे जे शेतकरी आहेत आणि ज्यांनी  या योजेनेसाठी रजिस्ट्रेशन केले होते त्यांना मिळालेली रक्कम ही परत करण्याचे आदेश केंद्र सरकार कडून शेतकर्‍यांना देण्यात आले आहेत.

हे सुद्धा वाचा – PMKisan – Installment Payment Stopped by State – म्हणजे काय? काय करायला पाहिजे?

यात दिरंगाई करण्यार्‍यांवर कायदेशीर कारवाई करून तलाठी कार्यालयातून त्यांना नोटिस पाठवण्यात आली आहे. यामध्ये ७६१ बोगस शेतकरी आढळून आले त्यांच्या कडून तब्बल ३१ लाख रुपये वसूलण्याचे आदेश सरकारने तहसील कार्यालयाला दिलेआहेत.  

तर शेतकरी मित्रांनो तुम्ही पण आयकर भरत असाल आणि प्रधान मंत्री किसान सन्मान निधि योजनेचा लाभ घेत असाल तर ते त्वरित बंद करा. कारण त्यामुळे तुम्ही संकटात सापडू शकता. ही योजना फक्त अल्पभूधारक शेतकर्‍यांसाठीच सरकार राबवत आहे कृपया त्यांना त्याचा फायदा घेऊ द्या 

मित्रांनो, माहिती आवडली असल्यास आपल्या मित्रांसोबत नक्कीच शेअर करा. आणि अश्याच प्रकारे दररोज नव-नवीन माहिती मिळवण्यासाठी आजच आमच्या Telegram चॅनल ला जॉइन व्हा.
आजचे बाजारभाव दिनांक: पहा
WhatsApp ग्रुप Join Now

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

🔥 Trending Now
खरिपाची तयारी: फळबाग लागवडीसाठी १००% अनुदान! खड्डे खोदण्यापूर्वी हे नवीन नियम नक्की वाचून घ्या