Type Here to Get Search Results !

PM-KISAN योजनेत झाला मोठा बदल - लाभर्थ्यांची यादी जाहीर होणार जाणून घ्या काय होईल फायदा

 नमस्कार शेतकरी मित्रांनो, प्रधानमंत्री किसान सन्मान निधि योजना ही पंत प्रधान श्री. नरेंद्र मोदी जी यांनी डिसेंबर 2018 मध्ये सुरू केली होती आणि या योजनेचा पहिला हप्ता शेतकर्‍यांना फेब्रुवारी 2019 ला मिळाला होता. आता पर्यन्त या योजनेचे 7 हफ्ते शेतकर्‍यांच्या बँक खात्यात जमा झाले आहेत आणि 8 वा हप्ता हा एप्रिल 2021 च्या पहिल्या हप्त्यात जमा होण्याची शक्यता आहे. या बद्दल आम्ही आधीच एक पोस्ट लिहिली आहे ते तुम्ही येथे क्लिक करून वाचू शकता.आणि जर तुम्ही अजून पण प्रधानमंत्री किसान सन्मान निधि योजनेसाठी नोंदणी केलेली नसेल तर तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने घरी बसून करू शकता त्या बद्दल अधिक माहिती तुम्हाला येथे क्लिक करून मिळेल. 


PM KISAN योजना ही मोदी सरकारची एक महत्वकांक्षी योजना आहे. या योजने अंतर्गत पैसे थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा केले जातात. दरम्यान या योजनेत असेक गैरव्यवहार पाहायला मिळाले आहेत.आणि आता या गैरव्यवहाराला लगाम घालण्यासाठी आणि जे खरे शेतकरी आहेत त्यांना लाभ मिळवून देण्यासाठी PM KISAN योजनेत मोठा बदल करण्यात आला आहे. मोदी सरकारने सर्व ग्रामपंचायतींमध्ये या योजनेच्या लाभ घेणार्‍या लाभार्थ्यांची यादी जाहीर करण्याचे आदेश दिले आहेत. राज्य सरकारांमार्फत हे काम केले जाईल. जेणेकरुन बनावट शेतकरी आळा बसेल.आणि कोण-कोण या योजनेचा लाभ घेत आहे हे लोकांना सुद्धा कळेल.आता सरकारच्या या नव्या निर्णयामुळे कोण-कोण प्रधानमंत्री किसान सन्मान निधि योजनेचा लाभ घेत आहे हे प्रत्येक ग्रामस्थांना कळेल. यामुळे जे खोटे लाभार्थी आहेत त्यांची ओळख पटणे सोपे होईल. एवढेच नव्हे तर या योजनेचे SOCIAL AUDIT करण्याचे आदेशही देण्यात आलेले आहेत. जेणेकरून अपात्र शेतकऱ्यांना या यादीतून वगळण्यास मदत होईल. हे ऑडिट तलाठी व तहसीलदार यांच्या सूचनेवरून ग्रामपंचायत स्तरावर पूर्ण केले जाईल.

पंतप्रधान श्री.नरेंद्र मोदी यांची PM KISAN योजना आतापर्यंतची सर्वात मोठी शेतकरी योजना आहे. ज्यावर दरवर्षी 75 हजार कोटी रुपये खर्च करण्याचे लक्ष्य निर्धारित आहे. केंद्र सरकारच्या सर्व तरतुदी असूनही या योजनेत अजून सुद्धा 33 लाख बनावट लाभार्थी आहेत. आनी या लोकांनी जवळपास 2326 कोटी रुपयांची सरकारची फसवणूक केलेली आहे.

हेही वाचा - या तारखेला जमा होईल किसान सन्मान निधि योजनेचा 8वा हप्ता.

केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार 231 कोटी रुपयांची वसुली पूर्ण झाली आहे. आणि अजून सुद्धा 17 राज्यांतून एक रुपयाचीही वसूली झालेली नाही. बिहार सरकारने बनावट शेतकर्‍यांची RECOVERY LIST यापूर्वीच जाहीर केली होती. ज्याद्वारे प्रत्येक गावातील शेतकऱ्याची नावे आणि फोन नंबर देण्यात आले होते, ज्यांनी पंतप्रधान किसान योजनेचा बेकायदेशीरपणे लाभ घेतला आहे. परंतु 34 कोटी ऐवजी केवळ 70 हजार रुपयेच वसूल करण्यात यश आले आहे.


या राज्यांमधून अजून काहीच वसूली झालेली नाही. 

उत्तर प्रदेशात 1,78,398 शेतकर्‍यांनी या योजनेचा चुकीच्या पद्धतीने फायदा घेतला आहे. परंतु भाजप शासित सरकार असूनही अद्याप कोणत्याही प्रकारची वसुली झालेली नाही. 171 कोटींची वसुली करावी लागणार आहे. ओडिशामध्ये 4.68 कोटी ऐवजी अद्याप एक रुपयाही वसूल झालेला नाही. आसाममध्ये 5,81,652 शेतकर्‍यांनी प्रधानमंत्री किसान सन्मान निधि योजनेचा चुकीचा वापर केलेला आहे. राज्य सरकारने 377 कोटी रुपयांऐवजी केवळ 4000 रुपये वसूल करण्यात यश आलेले आहे.


कोणत्याही परिस्थितीत पैसे परत घेतले जातील.

फसवणूक रोखण्यासाठी गुजरात, कर्नाटकमध्ये अनेक FIR दाखल झाले आहेत. तामिळनाडूमध्ये 100 हून अधिक जणांना अटक सुद्धा झाली आहेत. त्यामुळे सरकारच्या पैशांची पूर्ण वसुली ही होणारच यात काही शंका नाही. नाहीतर FIR नोंदविला जाईल आणि जेल मध्ये जावे लागेल. सरकारचा संदेश स्पष्ट आहे कि, जे या योजनेसाठी पात्र नाहीत त्यांना लाभ मिळणार नाही. एवढेच नव्हे निष्काळजीपणा दाखविणाऱ्या अधिकारी व कर्मचार्‍यांवरही सुद्धा कारवाई होऊ शकते.


हेही वाचा - महाभूलेख । अश्या प्रकारे पाहता येईल ऑनलाइन डिजिटल ७/१२

 हेही वाचा - शेतातून जाणारे रस्ते रोकल्यास होऊ शकते कारवाई

 हेही वाचा - महाभूलेख । अश्या प्रकारे पाहता येईल ऑनलाइन डिजिटल ७/१२

 हेही वाचा - किसान सन्मान निधि योजेनेचा लाभ घेणर्‍या शेतकर्‍यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी


मित्रांनो, माहिती आवडली असल्यास आपल्या मित्रांसोबत नक्कीच शेअर करा. आणि अश्याच प्रकारे दररोज नव-नवीन माहिती मिळवण्यासाठी आजच आमच्या Telegram चॅनल ला जॉइन व्हा.

Top Post Ad

Below Post Ad

close