पंतप्रधान नरेंद्र मोदी 80 कोटी जनतेला गरीब कल्याण योजनेअंतर्गत मोफत धान्य पुरवठा करण्याची घोषणा केली होती. | Pradhan Mantri Garib Kalyan Anna Yojana | Garib Kalyan Anna Yojana | PM Garib Kalyan Yojana
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 23 एप्रिलला देशातील 80 कोटी जनतेला गरीब कल्याण योजनेअंतर्गत मोफत धान्य पुरवठा करण्याची घोषणा केली होती. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वात झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेचा तिसरा टप्पा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या योजनेंअतर्गत पात्र नागरिकांना दोन महिन्याचं धान्य मोफत देण्यात येणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या कॅबिनेटनं धान्य वितरीत करण्यास मंजुरी दिली आहे.
राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेच्या लाभार्थ्यांना फायदा
केंद्र सरकारनं जाहीर केलेल्या निर्णयाचा फायदा देशातील 79 कोटी 88 लाख जनतेला होणार आहे. या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना तीन किलो गहू आणि दोन किलो तांदूळ मोपत देण्यात येणार आहे. देशातील विविध राज्यातील अन्नपुरवठा आणि सार्वजनिक वितरण विभागांद्वारे याच वितरण करण्यात येणार आहे.
पियुष गोयल यांचं ट्विट
25 हजार कोटींचा खर्च
केंद्र सरकारनं दोन महिन्यांचं धान्य 79 कोटी 88 लाख लोकांना देण्याचं जाहीर केलेले आहे. या योजनेसाठी केंद्र सरकारवर 25 हजार 333 कोटी रुपयांचा बोजा पडणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्यावर्षी कोरोना विषाणू संसर्ग सुरु झाल्यानंतर गरीब कल्याण योजनेची घोषणा केली होती. प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेच्या तिसऱ्या टप्प्याअंतर्गत धान्य वितरण सुरु कऱण्यात आलं आहे.
महाराष्ट्र सरकारकडून यापूर्वीच घोषणा
महाराष्ट्र राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या वाढळ्यानं कडक निर्बंध लागू करतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गोर गरीबांसाठी 5476 कोटींचं पॅकेज जाहीर केलं होतं. राज्यातील गोरगरीबांना निर्बंध लागू झाल्यापासून एक महिना 3 किलो गहू, आणि 2 किलो तांदूळ देण्यात येणार. तसेच शिवभोजन थाळीही महिनाभर मोफत देण्याची घोषणा केली होती.