खरिप हंगामासाठी किमान आधारभूत किमती जाहीर : पहा कोणत्या पिकाची MSP सर्वाधिक वाढली

आजचे बाजारभाव दिनांक: पहा
मोफत शेत जमीन मोजणी मोजणी करा
WhatsApp ग्रुप Join Now

पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांच्या अध्यक्षतेखाली पार पाडलेल्या आर्थिक बाबींवरील मंत्रिमंडळाच्या समितीने 2021-22 च्या सर्व हंगामातील खरेदीसाठी खरीप पिकासाठी किमान आधारभूत किंमत (MSP) मध्ये वाढ करण्यास मान्यता दिली आहे. MSP 2021-22 (किमान आधारभूत किंमत 2021-22)

MSP 2021-22
MSP 2021-22


पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक बाबींवरील मंत्रिमंडळाच्या समितीने सन 2021-22 च्या सर्व हंगामातील खरेदीसाठी खरीप पिकासाठी किमान आधारभूत किंमती (MSP) मध्ये वाढ करण्यास मान्यता दिलेली आहे. शेतकरी उत्पादकांना त्यांच्या उत्पन्नाच्या मोबदल्याची रास्त किंमत मिळावी, या उद्देशाने सरकारने खरीप पिकांचा एमएसपी वाढवला आहे. मागील वर्षांच्या तुलनेत एमएसपीमध्ये सर्वाधिक वाढीची शिफारस तीळ 452 रुपये प्रति क्विंटल आणि त्यानंतर तूर आणि उडीद 300 रुपये प्रति क्विंटलसाठी करण्यात आली आहे.

भूईमूग किंवा शेंगदाणा आणि नाचणी बाबतीत मागच्या वर्षीच्या तुलनेत अनुक्रमे 275 आणि 235 रुपयांची वाढ करण्यात आली आहे.विविध प्रकारच्या पिकांची लागवड व्हावी म्हणून वेगवेगळ्या पिकांसाठी वेगळी एमएसपी (MSP) मोदी सरकार द्वारे जाहीर करण्यात आली आहे.

किमान आधारभूत किंमत 2021-22 (MSP 2021-22) 

पीक2020-21 ची किमान आधारभूत किंमत2021-22 ची किमान आधारभूत किंमत2021-22 साठी उत्पादन खर्चकिमान आधारभूत किंमत वाढ
उडीद600063003816300
कापूस मध्यम551557263817211
कापूस मोठा58256025200
कारळे669569604620235
ज्वारी मालदांडी26402758118
ज्वारी संकरीत262027381825118
तीळ685573074871452
तूर600063003886300
नाचणी32953377225182
बाजरी215022501213100
भात18681940129372
भात ग्रेड अ1888196072
भूईमूग527555503699275
मका18501870124620
मूग71967275485079
सूर्यफूल588560154010130
सोयाबीन38803950263370

सन 2021-22 साठी खरीप पिकांसाठी एमएसपीमधील वाढ अखिल भारतीय स्तरावरील सरासरी उत्पादन खर्चाच्या (COP) किमान 1.5 पट पातळीवर MSP निश्चित करण्यात आली आहे. केंद्रीय अर्थसंकल्प सन 2018-19 च्या घोषणेनुसार एमएसपी निश्चित करण्यात आली आहे. शेतकर्‍यांना वाजवी मानधन मिळावे या उद्देशाने एएमसपीमध्ये वाढ करण्यात आली आहे. उत्पादन खर्चाच्या तुलनेत शेतकऱ्यांना अपेक्षित सर्वाधिक परतावा बाजरी (85%), उडीद (65%) आणि तूर (62%) या पिकांवर अंदाज आहे.

आजचे बाजारभाव दिनांक: पहा
मोफत शेत जमीन मोजणी मोजणी करा
WhatsApp ग्रुप Join Now

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

🔥 Trending Now
आता 'NA' साठी परवानगीची गरज नाही; सरकारचा ऐतिहासिक निर्णय! | Non Agricultural