राज्यात या जिल्ह्यात पुढील २ दिवसात पावसाची जोरदार शक्यता: Maharashtra Hawaman Andaj

 राज्यातील शेतकरी गेल्या आठवड्याभरापासून दडी मारलेल्या पावसाकडे आतुरतेने डोळे लावून बसलेले होते.मात्र आता पुन्हा राज्यात पाऊस सक्रिय झाल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. (Maharashtra Hawaman Andaj)

Maharashtra Hawaman Andaj

{tocify} $title={Table of Contents}

राज्यात पुढच्या दोन ते तीन दिवस मुसळधार पाऊस होणार असल्याची शक्यता हवामान विभागाने दर्शवली आहे. 

Table of contents

Maharashtra Hawaman Andaj

या पार्श्वभूमीवर पालघर,मुंबई,गडचिरोली,आणि भंडारा हे जिल्हे वगळता आज संपूर्ण महाराष्ट्रात सर्व ठिकाणी येलो अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. पुढच्या दोन ते तीन दिवस मराठवाडा मध्य महाराष्ट्र आणि घाट परिसरात मुसळधार पाऊस होणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. त्याच बरोबर उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातील काही भागात चांगला पाऊस होण्याची शक्यता आहे.

दरम्यान मुंबई वगळता पालघर,ठाणे,रायगड,रत्नागिरी,सिंधुदुर्ग तसेच विदर्भातील काही जिल्हे या भागात जोरदार पाऊस होणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली. आणि या नंतर राज्यात पुन्हा एकदा पाऊस ब्रेक घेण्याची शक्यता आहे. प्रादेशिक हवामान विभागाच्या पूर्वानुमनांनुसार मुंबई सह पालघर,ठाणे,रत्नागिरी,रायगड,सिंधुदुर्ग येथे मंगळवार पर्यन्त हलक्या ते माध्यम सरींची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

तसेच 2 ते 8 जुलै दरम्यान विदर्भामध्ये तसेच लगतच्या मराठवाड्यात काही भागात पावसाची शक्यता आहे. आणि या पावसाचे प्रमाण 9 ते 15 जुलै दरम्यान वाढण्याची सुद्धा शक्यता आहे. विशेष म्हणजे या काळात महाराष्ट्रात सर्वदूर पाऊस होईल तसेच कोकणात सुद्धा पुन्हा पावसाचा जोर वाढेल असा हवामान खात्याचा अंदाज आहे म्हणून या जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.

मित्रांनो माहिती आवडली असल्यास नक्कीच शेअर करा. इतर शेतकरी मित्रांना सुद्धा फायदा होईल. आणि दररोज हवामान विषयक माहिती साठी आमच्या टेलिग्राम चॅनल ला जॉइन करा. {alertSuccess}

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.