Maharashtra Weather Report: ढगाळ वातावरण असून सुद्धा पुढील 5 दिवस अवकाळी पावसाची शक्यता नाही

Maharashtra Weather Report Update: शेतकरी मित्रांनो, आजपासून म्हणजे 1 एप्रिल पासून राज्यभर ढगाळ वातावरण राहील परंतु कोठेही पाऊस पडण्याची शक्यता नसल्याचे हवामान तज्ञ माणिकराव खुळे यांनी संगितले.

उन्हाळा लागला असून सुद्धा राज्यभर ढगाळ वातावरण दिसत आहे. शेतकरी सुद्धा चिंतेत आहे. राज्यात कुठे उन्हाचा तडाखा बसत आहे तर कुठे ढगाळ वातावरण निर्माण होऊन अवकाळी पावसाची शक्यता जाणवत आहे. या बदलत्या वाटवरणाचा शेतीवर आणि शेतकर्‍यांवर परिणाम होत आहे. मागील दोन दिवस हवामान विभागाणे अवकाळी पावसाचा अंदाज वर्तविला होता, परंतु आज पासून म्हणजे 1 एप्रिल पासून ते 5 एप्रिल पर्यन्त राज्यात ढगाळ वातावरण राहील पण कुठेही अवकाळी पाऊस पडणार नाही अशी माहिती हवामान विभागाचे जेष्ठ तज्ञ श्री माणिकराव खुळे यांनी दिली. (Weather Report Maharashtra)

ढगाळ वातावरण असले तरी शेतकर्‍यांना घाबरण्याची गरज नाही कारण राज्यात सध्या अवकाळी पावसाची शक्यता नाही असे ते म्हणाले.

शेतकर्‍यांनी पिकांची काढणी सुरू ठेवावी

हवामान विभागणे 30 आणि 31 मार्च ला अवकाळी पावसाचा अंदाज वर्तविला होता परंतु कोठेही पाऊस आला नाही आणि येणारे 5 दिवस म्हणजे 5 एप्रिल पर्यन्त अवकाळी पावसाची शक्यता नाही त्यामुळे शेतकर्‍यांना अवकाळी पावसाला न घाबरता आपल्या शेत पिकांची काढणी सुरू ठेवावी असा सल्ला हवामान विभागाणे दिला आहे.

6 एप्रिल ते 9 एप्रिल राज्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता

6 एप्रिल पासून 9 एप्रिल हे तीन चार दिवस सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर सह मराठवाडा आणि विदर्भातील बुलढाणा, वर्धा, नागपुर जिल्हे वगळता बाकीच्या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता आहे. मुंबई सह कोकणातील 4 जिल्हे व नंदुरबार, नाशिक, धुळे, जळगाव, अहमदनगर, पुणे जिल्ह्यात अवकाळी पावसाचे वातावरण जाणविल परंतु पाऊस पडण्याची शक्यता अत्यंत कमी आहे. (Weather Report Maharashtra)

15 एप्रिल पर्यंत राज्यात उष्णतेची लाट नाही

2 एप्रिल पासून राज्यात उष्णतेत काही प्रमाणात वाढ होत असली तरी 15 एप्रिल पर्यंत उष्णतेची लाट महाराष्ट्रात येणार नसल्याचं खुळे यांनी स्पष्ट केल.

मित्रांनो, माहिती आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि दररोज नवनवीन सरकारी योजनांची माहिती मिळवण्यासाठी आम्हाला Whatsapp वर नक्की फॉलो करा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.