Sukanya Samduddhi Yojana: सरकार ने सुकन्या समृद्धी योजनेच्या व्याज दरात केली एवढ्या टक्क्यांनी वाढ, पहा नवीन व्याज दर कह आहेत

मित्रांनो, तुम्ही Sukanya Samruddhi योजनेत गुंतवणूक करत आहात? किंवा गुंतवणूक करण्याचा तुमचा विचार असेल तर तुमच्या साठी आनंदाची बातमी आहे. सुकन्या समृद्धी योजनेच्या व्याज दरात सरकार नुकताच वाढ केली आहे. सरकार कडून प्रत्येक तीन महिन्यांनंतर लहान बचत योजनांवर व्याजदर जाहीर केल्या जातो. या पोस्ट मधून आम्ही तुम्हाला सुकन्या समृद्धी योजनेच्या व्याजदरात किती टक्क्यांची वाढ झाली या बद्दल सविस्तर सांगणार आहोत तरी विनंती आहे की आमची ही पोस्ट अगदी शेवट पर्यन्त वाचावी.

दिनांक 31 मार्च 2023 रोजी सरकार ने एप्रिल ते जून 2023 या तिमाहीचे व्याजदर जाहिर केले आहेत. केंद्र सरकार ने 2023-24 या आर्थिक वर्षाच्या प्रथम तिमाहीसाठी सूणक्या समृद्धी योजनेचे व्याजदर वाढवले आहेत. Sukanya Samruddhi Yojana 2023 च्या व्याज दरात 0.40% वाढ सरकार कडून करण्यात आली आहे. 7.6 टक्के व्याजदरावरून 8% व्याज दर वाढवण्यात आला आहे.

मुलींसाठी सरकारी योजना

केंद्र आणि राज्य सरकार दरवर्षी मुलींच्या उज्ज्वल भविष्यासाठी वेगवेगळ्या योजना राबवित असते. सुकन्या समृद्धी योजना ही शासनाची यशस्वी योजना आहे. बर्‍याच पालकांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. केंद्र सरकार ने Beti Bachao Beti Padhao या योजने अंतर्गत सुकन्या समृद्धी योजना सुरू केली होती. आर्थिक दृष्ट्या दुर्बल कुटुंबात जन्मलेल्या मुलींचे भविष्य उज्ज्वल करण्यासाठी ही योजना राबविली जाते. ही एक दीर्घकालीन बचत योजना आहे. सुकन्या समृद्धी योजनेविषयी सविस्तर वाचण्यासाठी आमचा हा लेख नक्की वाचा – सुकन्या समृद्धी योजना

हे वाचा – सुकन्या समृद्धी योजना ऑनलाइन नोंदणी आणि संपूर्ण माहिती

आयकरात सूट

सुकन्या समृद्धी योजनेत गुंतवणुकीसाठी आयकर सवलत देखील उपलब्ध आहे. आयकर कायद्याच्या कलम 80C अंतर्गत, या योजनेतील गुंतवणुकीवर 1.50 लाख रुपयांची कर सवलत उपलब्ध आहे. ही योजना EEE दर्जासह येते. म्हणजेच, या योजनेत गुंतवणूक, व्याज उत्पन्न आणि परिपक्वता रक्कम या तिन्ही करमुक्त आहेत.

हे वाचा – मुलींसाठी सरकारी योजना 2023

वयाच्या 10 वर्षापूर्वी खाते उघडा

सुकन्या समृद्धी योजनेत मुलींचे वय 10 वर्षे पूर्ण होण्यापूर्वी खाते उघडले जाते. या योजनेत कुटुंबातील जास्तीत जास्त दोन मुलींचे खाते उघडता येईल. या योजनेत गुंतवणूक करून तुम्ही मुलीच्या लग्नासाठी आणि उच्च शिक्षणासाठी चांगला फंड तयार करू शकता.

मित्रांनो, माहिती आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि दररोज नवनवीन सरकारी योजनांची माहिती मिळवण्यासाठी आम्हाला Whatsapp वर नक्की फॉलो करा.

1 thought on “Sukanya Samduddhi Yojana: सरकार ने सुकन्या समृद्धी योजनेच्या व्याज दरात केली एवढ्या टक्क्यांनी वाढ, पहा नवीन व्याज दर कह आहेत”

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.